सर्वसाधारण माहिती

 • नोंदणी व मुद्रांक विभागाचे संकेतस्थळ (website) कोणते ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाचे संकेतस्थळ www.igrmaharashtra.gov.in असे आहे.
 • संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली (Computerised Document Registration) म्हणजे काय ?
   

  नोंदणी अधिनियम 1908 मध्ये रवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार दस्त नोंदणीची कार्यवाही केली जाते. या तरतुदींच्या चौकटीमध्ये राहून दस्त नोंदणी संदर्भातील कार्यवाही ( जसे की मूल्यांकन, मुद्रांक शुल्क पडताळणी, दस्तऐवजावरील शेरे, पावती, स्कॅनिंग, इंडेक्स इ. ) संगणकाच्या सहाय्याने पूर्ण करण्यासा ी वापरली जाणारी प्रणाली म्हणजेच संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली होय.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ई-सर्व्हिसेस कोणत्या आहेत ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ई-सर्व्हिसेस खालील प्रमाणे आहेत.
  अ.क्र. ई-सर्व्हिस वापर
  1 पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) नोंदणीला जाण्यापूर्वी दस्त विषयक माहिती भरणे.
  2 ई-स्टेप इन (e-Step-in) नोंदणीसा ी वेळ आरक्षित करणे
  3 ई-सर्च (e-Search) पूर्वी नोंदविलेल्या दस्तांची माहिती प्राप्त करणे
  4 पब्लिक डाटा एन्ट्री फॉर नोटीस फाईलिंग (PDE for Notice Filing) डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने झालेल्या कर्ज व्यवहाराची सूचना दुय्यम निबंधकांना देण्यासा ी माहिती भरणे
  5 ई-फायलिंग (e-filing) डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीच्या कर्ज व्यवहाराची सूचना दुय्यम निबंधकांना ऑनलाईन देण्यासा ी बॅकांना उपलब्ध करुन दिलेली सुविधा.
  6 ई-एएसआर (e-ASR) बाजारमूल्य दराची महिती शोधणे
  7 ई-रजिस्ट्रेशन (e-Registration) लिव्ह अँड लायसेन्सचा दस्त नोंदणीसा ी ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासा ीची सुविधा.
  8 रिफंड अँप्लिकेशन (Refund Application) परतावा अर्जाची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]