साधी पावती

 • साधी पावती म्हणजे काय ?
   

  साधी पावती म्हणजे आभासी कोषागारामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी फी आणि इतर रकमेचा भरणा केल्यावर प्राधिकृत सहभागी बँकेने अथवा पक्षकाराने साध्या कागदावर प्रिंट घेतलेली पावती होय. या पावतीवर आभासी कोषागाराव्दारे Government Reference Number (GRN) आणि बँकेकडून Challan Identification Number (CIN) असे दोन क्रमांक नमूद असतात.
 • साधी पावतीचा वापर कशासा ी करता येईल ?
   

  साधी पावतीचा वापर ज्या दस्ताची नोंदणी अनिवार्य आहे, अशा दस्तांसा ीचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी एकत्रितरित्या भरण्यासा ी किंवा स्वतंत्रपणे भरण्यासा ी करता येईल.
 • साधी पावती प्राप्त करुन घेण्यासा ी संकेतस्थळ कोणते ?
   

  सदयस्थितीत साधी पावती ही खालील ४ प्रा॑धिकृत सहभागी बँकामार्फत मिळू शकते. सदर बँकांची नावे व त्यांची संकेतस्थळे खालीलप्रमाणे— अ) IDBI Bank : https://etax.idbibank.co.in/IGR/ ब) Punjab National Bank : https://gateway.netpnb.com/mahastamp/home.html क) Bank of Maharashtra : https://www.mahaconnect.in/eSBTRExternal/ ड) Canara Bank : https://epayment.canarabank.in/MHestamp/epayhome.aspx
 • प्राधिकृत सहभागी बँकांनी नियुक्त केलेले सब एजन्ट साधी पावती स्वतः देऊ शकतात का ?
   

  सब एजंट ज्या प्राधिकृत बँकेसा ी सब एजंट म्हणून काम करतात, अशा प्राधिकृत बँकेच्या शाखेतूनच साधी पावती प्राप्त करुन घेऊन पक्षकाराला देऊ शकतात. सब एजंटकडून प्राप्त साध्या पावतीवर देखील प्राधिकृत सहभागी बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
 • साधी पावती प्राप्त करुन घेण्यासा ीची प्रक्रिया कशी आहे?
   

  सध्या साधी पावती देण्याची सुविधा IDBI Bank, Punjab National Bank , Bank of Maharashtra व Canara Bank या चार बँकांव्दारे दिली जाते. सदर बँकेच्या साध्या पावतीची सुविधा देण्या-या शाखांची यादी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर, GRAS प्रणालीच्या संकेतस्थळावर https://gras.mahakosh.gov.in व नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Banks येथे उपलब्ध आहे.
  साध्या पावतीसा ी रक्कम अदा करण्याचे दोन पर्याय उपलब्ध् आहेत.

  1. On line (Net banking व्दारे रक्कम भरणे)
  2. Across the counter payment – बँकेच्या काऊंटरवर जाऊन रोखीने (Cash), धनादेश (Cheque) अथवा धनाकर्ष (डी. डी) ने रक्कम भरणे.

   साधी पावती प्राप्त करुन घेण्यासा ी पुढील प्रक्रिया करावी.

  अ) On line (Net Banking व्दारे) रक्कम भरणार असल्यास :-

  1. साधी पावती सुविधा देणा-या बँकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन संबंधित
  2. बँकांच्या साधी पावतीसा ीच्या (प्रश्न ३ मध्ये उत्तरात नमूद केलेल्या) संकेतस्थळास भेट दयावी.
  3. On line Payment हा Payment Mode निवडून येणा-या फॉर्मवर योग्य व अचूक माहिती भरावी.
  4. Confirm & Proceed वर click करण्यापूर्वी भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी अथवा माहिती दुरुस्त करुन् Confirm & Proceed वर click करावे.
  5. आवश्यक रक्क्म On line पध्दतीने भरावी.
  6. आपणांस GRN तसेच CIN असलेली पावती तयार झालेली दिसेल. तिची प्रिंट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी.

  ब) Across the counter पध्दतीने रककम भरणार असल्यास :-

  1. साधी पावती सुविधा देणा-या बँकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन संबंधित बँकांच्या साधी पावतीसा ीच्या (प्रश्न ३ च्या उतरामध्ये नमूद केलेल्या ) संकेतस्थळास भेट दयावी.
  2. Across the counter हा Payment Mode निवडून येणा-या फॉर्मवर योग्य व अचूक माहिती भरावी.
  3. Confirm & Proceed वर click करण्यापूर्वी भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी अथवा माहिती दुरुस्त् करुन् Confirm & Proceed वर click करावे.
  4. भरलेल्या माहितीची प्रिंट घेऊन आपण निवडलेल्या (साधी पावती सुविधा देणा-या) बँकेच्या शाखेस भेट दयावी व आवश्यक रक्कम रोख (Cash), धनाकर्ष (DD) अथवा धनादेश (Cheque)ने भरावी व साध्या पावतीची मागणी करावी.
  5. भरणा केलेल्या रकमेची साधी पावती बँक अधिका-याच्या स्वाक्षरीसह प्राप्त करून घ्यावी.

  क) Internet तसेच Net Banking यांपैकी कोणतीही सुविधा नसल्यास :-

  1. साध्या पावतीची सुविधा देणा-या बॅकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन व त्या बॅकेच्या साध्या पावतीची सुविधा देणा-या जवळच्या शाखेस अथवा संबंधित बँकेच्या अधिकृत एजन्सी (Sub Agent) म्हणून काम करणा-या संस्थेस भेट दयावी.
  2. आपण साधी पावतीबाबत मागणी नोंदविलेनंतर आपणांस मिळालेल्या Input Form वर बाबनिहाय योग्य व अचूक माहिती भरा.
  3. बँकेचे अधिकारी / एजन्सी (Sub-Agent) यांनी संगणकावर माहिती भरलेनंतर आवश्यक तेथे भरलेल्या माहितीबाबत खात्री करावी व आवश्यक रकमेचे भरणा करावा.
  4. भरणा केलेल्या रकमेची साधी पावती बँक अधिका-याच्या स्वाक्षरीसह प्राप्त करून घ्यावी.
   { वरील सर्व अ, ब, क प्रक्रियेबददल सविस्तर Flow Chart या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर On line Services या लिंकवर e-Payment सदराखाली उपलब्ध आहे.}
 • प्राधिकृत सहभागी बँकेकडून साधी पावती स्विकारतांना पक्षकाराने कोणत्या बाबी तपासाव्यात ?
   

  प्राधिकृत सहभागी बँकेकडून साधी पावती स्विकारतांना पक्षकाराने खालील बाबी तपासाव्यात.

  1. आपण भरलेली माहिती व साधी पावतीवरील माहिती यातील तपशील जुळतो का याची खात्री करावी.
  2. साध्या पावतीवर GRN व CIN नमूद असल्याची खात्री करावी.
  3. GRN च्या शेवटी R हे अक्षर नमूद आहे याची खात्री करावी.
  4. साध्या पावतीवर संबंधित बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.

 • साध्या पावतीचा वापर कसा करावा?
   

  साध्या पावतीव्दारे फक्त मुद्रांक शुल्क अथवा मुद्रांक शुल्क व नोंदणी फी एकत्रितरित्या भरली असल्यास, नोंदविले जाणा-या दस्ताच्या सुरुवातीस साधी पावती जोडण्यात यावी. साध्या पावतीव्दारे फक्त नोंदणी फी भरली असल्यास दस्त नोंदणीच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयास जाताना अशी पावती सोबत घेऊन जावी.
 • साध्या पावतीबाबत फॉर्म भरताना चूक झाल्यास दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध आहे का?
   

  अ)प्राधिकृत सहभागी बँकेच्या वेबसाईटवर माहिती भरताना Confirm & Proceed या टप्प्यापर्यंत चूक निदर्शनास आल्यास चूक दुरुस्त करता येईल. आ)साधी पावती तयार झालेनंतर त्यात दुरुस्तीचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]