e-SBTR

 • e-SBTR म्हणजे काय ? त्याची वैशिष्टये कोणती ?
   

  ई-एस.बी.टी.आर म्हणजे इलेक्ट्रॉनिक सुरक्षित बँक व कोषागार पावती. (Electronic Secured Bank and Treasury Receipt)
  ● ई.एस.बी.टी.आर. हे मुद्रांक शुल्क भरण्याचे एक माध्यम आहे. याद्वारे मुद्रांक शुल्कासोबत नोंदणी फी एकत्रितरित्या सुध्दा भरता येते.
  ● पारंपारिक मुद्रांक कागद व ई -पेमेंट यांची वैशिष्ये यात सांगड घातली आहे.
  ● सिक्युरिटी प्रेस नाशिक यांनी पुरविलेल्या विशिष्ट प्रकारच्या सुरक्षित कागदावर e-SBTR छापला जातो.
  ● e-SBTR वर GRN & CIN नमूद असतो.
  ● e-SBTR वर एक विशिष्ट स्टेशनरी क्रमांक (Stationery Number) असतो.
  ● e-SBTR वर बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असते.

 • e-SBTR चा वापर कशासा ी करता येईल ?
   

  e-SBTR चा वापर खालील प्रयोजनासा ी करता येईल. अ) नोंदणी करावयाच्या दस्तांचे मुद्रांक शुल्क भरण्याकरिता. ब) नोंदणी करावयाच्या दस्तांचे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी एकत्रितरित्या भरण्याकरिता. क) नोंदणी न करावयाच्या दस्तांचे मुद्रांक शुल्क भरणेकरिता- ● e-SBTR व्दारे केवळ नोंदणी फी स्वतंत्ररित्या भरता येत नाही. ● e-SBTR व्दारे भरावयाच्या मुद्रांक शुल्काची किमान रक्कम रु.५०००/- इतकी आहे.
 • e-SBTR ही सुविधा कोणत्या बँकांमध्ये उपलब्ध आहे?
   

  सद्यस्थितीत e-SBTR ही सुविधा खालील बँकांच्या राविक शाखांमध्ये उपलब्ध आहे. ∙ IDBI Bank ∙ Punjab National Bank ∙ Bank of Maharashtra ∙ Canara Bank सदर शाखांची यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर Agencies सदराखाली Banks येथे उपलब्ध आहे.
 • e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी रक्कम कशी भरावी / भरता येईल ?
   

  ● e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी रक्कम भरण्याचे 2 पर्याय आहेत.-
  अ) e-SBTR देणा-या बँकेत आपले नेट बँकिंग खाते असल्यास त्याचा वापर करुन संबंधित बँकेच्या संकेत स्थळावर जाऊन Input Form भरल्यानंतर घरबसल्या Net Banking द्वारे रक्कम प्रदान करता येईल.

  e-SBTR सुरक्षित कागदावर छापला जात असल्याने आपणांस e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी आपण भरलेल्या माहितीची प्रिंट व रक्कम भरल्याचा पुरावा (GRN/CIN असलेला) घेऊन बँकेच्या संबंधित शाखेमध्ये जावे लागते.

  ब) या बँकांमध्ये आपले नेट बँकिंग खाते नसल्यास या बँकांच्या e-SBTR देणा-या शाखांमध्ये जाऊन Input Form भरल्यानंतर सदरचा फॉर्म व रोखीने / चेकने अथवा डिमांड ड्राफटव्दारे रक्कम भरलेनंतर e-SBTR प्राप्त होईल.

 • e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी साधारणत: किती वेळ लागू शकतो ?
   

  e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी लागणारा कालावधी हा आपण बँकेकडे ज्या पध्दतीने किंवा माध्यमाव्दारे भरणा करता, त्यावर अवलंबून असतो.

  अ) नेट बँकिंगद्वारे On line प्रदान – दोन तास.
  (यामध्ये e-SBTR सुविधा देणा-या बँकेमध्ये आपले नेट बँकींगची सुविधा असलेले खाते असणे आवश्यक आहे.)

  ब) बँकेच्या शाखेत जाऊन काऊंटर पेमेंट –

  1. चेक किंवा डी.डी – चेक किंवा डी.डी. पारित झालेनंतर / वटल्यानंतर दोन तास
  2. RTGS/NEFT- दोन तास
  3. रोखीने भरणा – दोन तास

 • e-SBTR सा ी रक्कम भरणेकरिता संकेत स्थळ कोणते ?
   

  e-SBTR सा ी रक्कम भरणेकरिता संकेत स्थळे (website) खालीलप्रमाणे :
  अ) IDBI Bank :
  https://etax.idbibank.co.in/IGR/

  ब) Punjab National Bank :
  https://gateway.netpnb.com/mahastamp/home.html
  क) Bank of Maharashtra :
  https://www.mahaconnect.in/eSBTRExternal/
  ड) Canara Bank :
  https://epayment.canarabank.in/MHestamp/epayhome.aspx

 • e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ीची प्रक्रिया कशी आहे?
   

  सध्या e-SBTR देण्याची सुविधा IDBI Bank, Punjab National Bank , Bank of Maharashtra व Canara Bank या चार बँकांव्दारे दिली जाते.सदर बँकांच्या e-SBTR सुविधा देण्या-या शाखांची यादी संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर, GRAS प्रणालीच्या संकेतस्थळावर https://gras.mahakosh.gov.in व नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharastra.gov.in या संकेत स्थळावर Agencies सदराखालील Banks येथे उपलब्ध आहे.

  • e-SBTR सा ी रक्कम भरणा करण्याचे दोन पर्याय उपलब्ध् आहेत.
  1. On line (Net banking व्दारे) रक्कम भरणे.
  2. Across the counter payment – बँकेच्या काऊंटरवर जाऊन रोखीने (Cash), धनादेश (Cheque) अथवा धनाकर्ष (डी. डी) ने रक्कम भरणे.
   e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी पुढील प्रक्रिया करावी.

  अ) On line (Net banking व्दारे) रक्कम भरणार असल्यास

  1. e-SBTR सुविधा देणा-या बँकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन संबंधित बँकेच्या e-SBTR सा ीच्या (प्रश्न ६ मध्ये नमूद केलेल्या उत्तरामध्ये) संकेतस्थळास भेट दयावी.
  2. On line Payment हा Payment Mode निवडून येणा-या फॉर्मवर योग्य व अचूक

   माहिती भरावी.
  3. Confirm & Proceed वर click करण्यापूर्वी भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा अथवा माहिती दुरुस्त करुन Confirm & Proceed वर click करावे.
  4. आवश्यक रक्कम On line पध्दतीने भरावी.
  5. आपण भरलेल्या माहितीची प्रिंट तसेच आपण भरणा केलेल्या रक्कमेचा पुरावा घेऊन आपण निवड केलेल्या ( e-SBTR सुविधा देणा-या) बँकेच्या शाखेस भेट द्यावी.
  6. आपणास आवश्यक रकमेचा e-SBTR प्राप्त होईल.
  7. e-SBTR प्राप्त करुन घेताना त्यावर बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.


  ब) Across the counter पध्दतीने रक्कम भरणार असल्यास

  1. e-SBTR सुविधा देणा-या बँकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन संबंधित बँकांच्या e-SBTR सा ीच्या (प्रश्न ६ मध्ये नमूद केलेल्या उत्तरामध्ये) संकेतस्थळास भेट दयावी.
  2. Across the counter हा Payment Mode निवडून येणा-या फॉर्मवर योग्य व अचूक माहिती भरावी.Confirm & Proceed वर click करण्यापूर्वी भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी अथवा माहिती दुरुस्त करुन Confirm & Proceed वर click करावे.
  3. भरलेल्या माहितीची प्रिंट घेऊन आपण निवडलेल्या ( e-SBTR सुविधा देणा-या) बँकेच्या शाखेस भेट दयावी, आवश्यक रक्कम रोख (Cash), डी.डी. अथवा चेकव्दारे भरावी व
  4. e- SBTR ची मागणी करावी.
  5. आपणास आवश्यक रकमेचा e-SBTR प्राप्त होईल.
  6. e-SBTR प्राप्त करुन घेताना त्यावर बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.

  क) Internet तसेच Net Banking यांपैकी कोणतीही सुविधा नसल्यास

  1. e-SBTR सुविधा देणा-या बॅकांपैकी सोयीच्या बँकेची निवड करुन व त्या बॅकेच्या e-SBTR ची सुविधा देणा-या जवळच्या शाखेस अथवा संबंधित बँकेच्या अधिकृत एजन्सी (सब एजंट) म्हणून काम करणा-या संस्थेस भेट दयावी. (सदर संस्थांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Agencies सदराखाली Banks येथे उपलब्ध आहे.)
  2. प्राप्त झालेल्या Input Form वर बाबनिहाय योग्य व अचूक माहिती भरावी.
  3. बँकेचे अधिकारी / एजन्सी यांनी संगणकावर माहिती भरलेनंतर आवश्यक तेथे भरलेल्या माहितीबाबत खात्री करावी व आवश्यक रकमेचे भरणा करावा.
  4. आपणास e-SBTR प्राप्त होईल.
  5. e-SBTR प्राप्त करुन घेताना त्यावर बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.

  { वरील सर्व अ, ब, क प्रक्रियेबददल सविस्तर Flow Chart या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर On line Services या सदराखाली e-Payment या िकाणी उपलब्ध आहे.}

 • बँकेकडून e-SBTR स्विकारताना पक्षकारांनी कोणत्या बाबी तपासाव्यात ?
   

  e-SBTR स्विकारताना पक्षकारांनी खालील बाबी तपासून घ्याव्यात--

  • प्राप्त e-SBTR मधील माहिती योग्य असल्याची खात्री करावी.
  • e-SBTR वर GRN आणि CIN नमूद असल्याची खात्री करावी.
  • GRN चे शेवटी S हे अक्षर नमूद असल्याची खात्री करावी.
  • e-SBTR वरील मूळ Stationery Number व त्यावर बँकेव्दारे छापलेला Stationery Number एकच असल्याची खात्री करावी.
  • e-SBTR सा ी भरणा रक्कम रु.५०,०००/- पर्यंत असल्यास संबधित बँकेच्या एका अधिका-याची तर अशी भरणा रक्कम रु.५०,०००/-पेक्षा अधिक असेल तर दोन अधिका-यांची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.

 • e-SBTR चा वापर कसा करावा ?
   

  e-SBTR हा उमट मुद्रांक कागद असल्याने e-SBTR च्या पहिल्या पानावरील को-या जागेपासून आपला दस्त लिहिण्यास सुरुवात करावी.
 • e-SBTR चा इनपुट फॉर्म भरताना किंवा त्यानंतर चूक निदर्शनास आल्यास दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध आहे का ?
   

  प्राधिकृत बँकेच्या वेबसाईटवर Input form मध्ये माहिती भरतांना Confirm & Proceed या टप्प्यापर्यंत चूक निदर्शनास आल्यास त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. त्यावेळी चूक दुरुस्त न केल्यास मुद्रांक शुल्क परतावा (Refund of Stamp Duty ) मागणीशिवाय पर्याय नाही.
 • e-SBTR सा ी Across the counter व्दारे प्रदान करताना डी.डी./ चेक कोणत्या नावाने दयावा?
   

  ∙ सदर डी.डी./चेक आपण ज्या बँकेची सुविधा वापरणार आहात, त्या बँकेत विचारणा करुन योग्य नावाने लिहावा. ∙ सदर डी.डी./चेक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नावे लिहू नये.
 • e-SBTR ची सेवा देण्यासा ी बँकेचे Sub- Agent कोणाला होता येईल ? त्याची प्रक्रिया काय असेल?
   

  • परवानाधारक मुद्रांक विक्रेते, परवानाधारक फ्रँकिंग विक्रेते (Franking Vendors), सलग 3 वर्षे लेखा परिक्षणामध्ये अ दर्जा असलेल्या बँका / वित्तीय संस्था, पोस्ट ऑफिस हे Sub- Agent होऊ शकतात.
  • Sub-Agent होण्यासा ी आवश्यक असलेली पात्रता- www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Others या िकाणी पाहावयास मिळेल.
  • Sub- Agent होऊ इच्छिणा-या, पात्र व्यक्ती / संस्थांनी e-SBTR सा ीच्या प्राधिकृत सहभागी बँकांशी संपर्क साधावा.
  • Sub- Agent होऊ इच्छिणा-या पात्र व्यक्ती / संस्थांच्या बाबतचा प्रस्ताव प्राधिकृत सहभागी बँका नोंदणी व मुद्रांक विभागाकडे मान्यतेसा ी पा वितात.
  • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मान्यतेनंतर Sub-Agent व प्राधिकृत सहभागी बँका यांच्यामध्ये विहित नमुन्यातील करारनामा करण्यात येतो व त्यानंतर Sub-Agent म्हणून काम करता येईल.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]