ई -चलन (e-Challan)

 • ई –चलनाव्दारे रक्क्म भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन को� े मिळेल?
   

  ई-चलनाव्दारे रक्कम भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन https://gras.mahakosh.gov.in या संकेत स्थळावर User’s Guide या सदराखाली मिळेल. तसेच नोंदणी विभागाचे संकेत स्थळावर www.igrmaharashtra.gov.in येथे On line Services मधील e-Payment या सदराखाली User’s Guide या लिंकवर मिळेल. तसेच या भागातील प्रश्न क्र.३ च्या उत्तरात अधिक माहिती मिळेल.
 • ई –चलनासा ी माहिती भरतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावयास हवी ?
   

  ई –चलनासा ी माहिती भरतांना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

  1. ई-चलनाव्दारे मुद्रांक शुल्क भरणेची सुविधा ही केवळ नोंदणी अनिवार्य असणा-या दस्तांसा ीच आहे. ज्या दस्तांची नोंदणी ऐेच्छिक आहे (Optional) अशा दस्तांसा ीचे मुद्रांक शुल्काचा भरणा ई-चलनाव्दारे करु नये. नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या दस्तांची यादी GRAS प्रणालीवर माहिती भरताना Article Code या सदराखाली आढळते.
  2. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी चे प्रदान केल्यानंतर त्यासा ी तयार झालेल्या पावतीमध्ये कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे माहिती भरताना अचूकतेवर लक्ष दयावे. विभागाचे नांव, मिळकत तपशील, कार्यालय व जिल्हयाचे नाव, टाईप ऑफ पेमेंट, अनुच्छेद क्रमांक (Article Code ), लेखा शीर्ष (Scheme Name), रक्कम रुपये, पक्षकारांची नावे इ. माहिती अचूकरित्या भरावी.
  3. माहिती भरल्यानंतर निर्माण होणारे प्रारुप चलन काळजीपूर्वक तपासून घ्यावे व त्यानंतरच रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी.

 • GRAS प्रणालीचा वापर करुन मुद्रांक शुल्क व नोंदणी फी च्या रकमा ई-पेमेंटव्दारे भरताना कोणते पर्याय निवडावेत?
   

  अ.क्र उपलब्ध पर्याय निवड
  1 अ) Pay without Registration.
  ब) New Registration.
  अ) Pay without Registration. – GRAS प्रणालीवर नाव नोंदणी न करता रक्कम भरावयाची असल्यास सदर पर्यायाची निवड करावी.
  ब) New Registration - GRAS प्रणालीवर नाव नोंदणी करुन पेमेंट करावयाचे असल्यास सदर पर्यायाची निवड करावी.
  आपण केलेल्या सर्व पेमेंटची माहिती आपल्याला जेव्हा हवी तेव्हा ऑन लाईन उपलब्ध होऊ शकते.
  2 Payment Mode
  अ) e- Payment -
  ब)Payment across Bank Counter -
  अ) e- Payment – ज्यांना नेट बँकिंग सुविधा वापरून रक्कम भरणा करावयाची आहे, त्यांनी सदर पर्यायाची निवड करावी.
  ब) Payment across Bank Counter – ज्यांना GRAS वरील सहभागी बँकांपैकी काऊंटर पेमेंटची सुविधा असणा-या बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम अदा करावयाची आहे, त्यांनी या पर्यायाची निवड करावी.
  सदर बँकांची यादी https://gras.mahakosh.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
  3 कोणत्या विभागाची निवड करावी ? Inspector General of Registration या विभागाची निवड करावी.
  4 कोणत्या पेमेंट टाईपची निवड करावी ?
  1. Non-Judicial Customer Direct Payment- दस्त नोंदणीकरिता मुद्रांक शुल्क भरण्यासा ी या पर्यायाची निवड करावी.
  2. Registration Fees - दस्त नोंदणीकरिता नोंदणी फी भरण्यासा ी या पर्यायाची निवड करावी.
   (नोंदणी फीची जास्तीत जास्त/अधिकतम मर्यादा रु.३०,०००/-)
  3. Judicial Stamps – न्यायालयीन कामकाजासा ी/ कोर्टाची फी भरण्यासा ी, न्यायिक मुद्रांकाचे पेमेंट करणा-यांनी या पर्यायाची निवड करावी.
  4. judicial Stamp Vendor - मुद्रांक विक्रेते यांनी न्यायिक मुद्रांक कोषागारातून खरेदी करण्यासा ी या पर्यायाची निवड करावी
  5. Non-Judicial Stamp Vendor - मुद्रांक विक्रेते यांनी न्यायिकेतर मुद्रांक कोषागारातून खरेदी करण्यासा ी या पर्यायाची निवड करावी.
  6. Non-Judicial Franking Vendor – फ्रॅकिंग मशिनद्वारे उमट मुद्रांक विक्री करणा-या परवानाधारक संस्थानी फ्रॅकिंग मशीनचे कोड मिळवण्यासा ी रक्कम भरणेकरिता या पर्यायाची निवड करावी.
  7. Search Fee – ज्या व्यक्तींना नोंदविलेल्या दस्तांचा शोध घ्यावयाचा आहे, त्यांनी या पर्यायाची निवड करावी.
  8. Non-Judicial Stamps - Consolidated Stamp Duty—ज्या वित्तीय संस्था एकत्रितरित्या मुद्रांक शुल्क भरु इच्छितात, त्यांनी या पर्यायाची निवड करावी.
  9. Stamp Duty on Delivery of Goods – डिलिवहरी ऑफ गुडस याकरिता मुद्रांक शुल्क भरणा-या संस्थांनी या पर्यायाची निवड करावी.
  5 कोणत्या Scheme Name ची निवड करावी ? अ)मुद्रांक शुल्क:-
  I) Superintendent of Stamps -- (SoS Mumbai)-- मुंबई शहर व उपनगर या कार्यक्षेत्रात दस्त नोंदणी करण्यासा ी पक्षकारांनी सदर पर्यायाची निवड करावी.
  II) IGR Rest of Maharashtra -- मुंबई शहर व उपनगर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासा ी पक्षकारांनी सदर पर्यायाची निवड करावी.
  ब) नोंदणी फी : यात केवळ एक पर्याय उपलब्ध असून IGR Rest of Maharashtra याच पर्यायाची संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षकारांनी निवड करावी.
  6 कोणत्या Article Code ची निवड करावी ? पक्षकारांनी त्यांचे दस्त प्रकारानुसार Article Code ची निवड करावी.
  7 कोणत्या जिल्हयाची निवड करावी ? ज्या जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण दस्त नोंदणी करणार आहात, तो जिल्हा निवडावा.
  8 कोणत्या कार्यालयाची निवड करावी ? ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपल्याला दस्त नोंदवायचा आहे, ते कार्यालय अचूक निवडावे. चुकीच्या कार्यालयाची निवड केल्यास दस्ताची नोंदणी होऊ शकणार नाही.
  9 Period (Year) रकान्यामध्ये काय निवडावे? चालू आर्थिक वर्षाची (एप्रिल ते मार्च)निवड करावी व त्यापुढे One Time/Adhoc या पर्यायाची निवड करावी.
  10 वैयक्तिक माहिती व रिमार्क्समध्ये कोणती माहिती भरावी ? यामध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावी :-
  Payment Type - Non-Judicial Cutomer Direct
  Payment
  OR
  Registration Fee
  या प्रकारात खालीलप्रमाणे माहिती भरावी :
  Tax ID – कोणतीही माहिती भरु नये.
  PAN – दस्त नोंदणी करणा-या पक्षकाराचा पॅन नंबर टाकावा.
  Name – रक्कम भरणा करणाऱ्या पक्षकाराचे संपूर्ण नाव नमूद करावे.
  Property Details –Survey/Gat/CTS No.- ज्या मिळकतीबाबत दस्त नोंदणी करावयाची आहे, त्या मिळकतीबाबत अचूक माहिती स.नं. गट नं. इ. नमूद करावेत.
  Area (Sq.M./Hec.)- ज्या मिळकतीबाबत दस्त नोंदणी करावयाची आहे, त्या मिळकतीचे क्षेत्र चौ.मी./ हेक्टरमध्ये नमूद करावे.
  Locality & City - नोंदणी करावयाची मिळकत ज्या िकाणी आहे, ते िकाण व शहर नमूद करावे.
  PIN - मिळकत ज्या शहरामध्ये / गावामध्ये आहे, त्या शहराचा/ गावाचा पिन कोड नमूद करावा.
  Mobile No. - दस्त नोंदणी करणा-या पक्षकाराचा मेाबाईल नंबर नमूद करावा.
  Party Name 2 – दुस-या पक्षकाराचे (Second Party) नाव नमूद करावे.
  PAN No.2 – दुस-या पक्षकाराचा (Second Party) PAN नमूद करावा.
  Consideration Amount – ज्या दस्ताची नोंदणी करणार आहात, त्या दस्तात नमूद मोबदल्याची रक्कम नमूद करावी.
  11 बँकेची निवड कशाचे आधारे करावी ? GRAS प्रणालीवर उपलब्ध असलेल्या बँकापैकी,
  On line Payment सा ी पक्षकाराचे ज्या बँकेत इंटरनेट बँकींग खाते आहे, अशा बँकेची निवड करावी.
  Across the Counter :- ज्या बँकेमध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष रक्कमेचा भरणा करणार असाल, ती बँक निवडावी.
  12 बँकेची निवड केल्यानंतर करावयाची पुढील कार्यवाही कोणती ? यामध्ये कोणती काळजी घ्यावी ? वरीलप्रमाणे सर्व माहिती भरल्यावर Submit बटन दाबले असता प्रारूप चलन उपलब्ध होते. सदर प्रारूप चलनामध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का, हे व्यवस्थित तपासावे. बरोबर असल्यास सदर चलनाच्या खाली असलेले Proceed बटन दाबावे. यानंतर ‘आपली माहिती पूर्ण व व्यवस्थित भरली आहे का?’ (Please verify details you have entered) असा प्रश्न विचारला जातो. आपण भरलेल्या माहितीची खात्री करुन घेऊन OK वर क्लिक करावे. भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास Cancel बटण दाबून आवश्यक माहिती दुरुस्त करावी
  Ok बटणावर क्लिक केल्यांनतर मध्यभागी चौकटीत GRN (Government Reference No. शासन संदर्भ क्र.) येतो. सदर GRN महत्वाचा असल्याने तो लिहून घ्यावा.
  आपण निवड केलेल्या पेमेंट मोडनुसार -
  अ) e-Payment असल्यास नेट बँकिंगमार्फत संबंधित बँकेचे पेमेंट गेटवे उपलब्ध होतो. तेथून रक्कम भरणा केल्यानंतर, भरलेली रक्कम कोषागारात जमा झालेनंतर GRN व CIN नमूद असलेले ई-चलन तयार होते. असे ई-चलन दस्तास जोडून दस्त नोंदणी करता येते.
  आ) Across the Counter असल्यास प्रारुप चलन उपलब्ध होते. सदर प्रारूप चलनाची प्रिंट घ्यावी आणि सदर प्रारूप चलन व भरणा करावयाची रक्कम बँकेत जमा करावे. रक्कम जमा झालेनंतर GRN & CIN नमूद असलेले ई-चलन बँकेकडून प्राप्त होते. ते ई-चलन दस्तास जोडून दस्त नोंदणी करता येते.
  13 ई-पेमेंटचा Across the Counter पर्याय वापरताना कोणकोणत्या पध्दतीने रकमेचा भरणा करता येऊ शकतो? Across the Counter वर खालील पद्धतीने रकमेचा भरणा करता येतो.
  धनादेश(Cheque)
  धनाकर्ष (DD)
  रोखीने (Cash)
  (रु.५०,०००/- पेक्षा जास्त रक्कम शक्यतो
  रोखीने भरू नये. )
  RTGS द्वारे रक्कम स्विकारत असतील, त्या
  बँकांमध्ये RTGS सुविधेचा वापर करावा.
  14 रक्कम भरण्यापूर्वी तयार झालेल्या चलनामध्ये व रक्कम भरल्यानंतर तयार झालेल्या चलनामध्ये काही फरक असतो का? रक्कम शासनास जमा झाली आहे, याची खात्री कशी होईल? रक्कम भरण्यापूर्वी तयार झालेल्या चलनावर केवळ GRN नमूद असतो.
  रक्कम भरल्यानंतर तयार झालेल्या चलनावर GRN व CIN हे दोन्ही नमूद असतात.
  ज्या ई- चलनावर GRN व CIN हे दोन्ही क्रमांक नमूद असतात, ते ई-चलन शासनास रक्कम जमा केल्याचा पुरावा म्हणून ग्राहय धरले जाते.
  15 ई-चलनावर GRN आणि CIN प्राप्त झालेनंतर करावयाची पुढील कार्यवाही कोणती ? • GRN आणि CIN नमूद असलेल्या ई-चलनाची प्रिंट घ्यावी,
  • त्याचे खरेपणाबाबत संबंधित पक्षकाराने सही करुन साक्षांकित करावे.
  • अशा प्रकारे स्वतःची स्वाक्षरी केलेले ई-चलन नोंदणी करावयाच्या दस्ताच्या पहिल्या पृष् ावर लावावे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]