ई- पेमेंट प्रणाली

 • ई-पेमेंट पध्दतीने मुद्रांक शुल्क /नोंदणी फी भरण्याचे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत ?
   

  ई-पेमेंट पध्दतीने मुद्रांक शुल्क / नोंदणी फी भरण्याचे उपलब्ध मार्ग पुढीलप्रमाणे –
  • नेट बँकींगची सुविधा उपलब्ध असल्यास –


  अ) ई-चलन –

  i) GRAS प्रणालीस भेट देऊन भरणा करावयाच्या रकमेबाबत पूर्ण माहिती भरा.
  ii) भरलेली माहिती अचूक असलेची खात्री करुन Net Banking सुविधेचा वापर करुन रकमेचा भरणा करा.
  iii) GRN व CIN असलेले ई-चलन तयार होईल, त्याची प्रिंट घ्या.
  iv) आपणांस GRN व CIN असलेले ई-चलन प्राप्त झाले म्हणजे आपली रक्कम भरणा करण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे असे समजावे.

  ब) साधी पावती -

  i) साधी पावतीव्दारे रक्कम भरणा करण्यासा ी प्राधिकृत केलेल्या बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.
  ii) साधी पावती ज्या प्रयोजनासा ी आवश्यक आहे, त्याबाबत पूर्ण माहिती भरा.
  iii) नेट बँकींग सुविधेव्दारे रक्कम भरा.
  iv) GRN व CIN असलेली साधी पावती तयार होईल. त्याची प्रिंट घ्या व त्यावर न चुकता स्वाक्षरी करा.
  v) आपणांस GRN व CIN असलेली साधी पावती प्राप्त झाली म्हणजेच आपली रक्कम भरणा करण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे असे समजावे.

  क) e- SBTR -

  i) e- SBTR व्दारे रक्कम भरणा करण्यासा ी प्राधिकृत केलेल्या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
  ii) e-SBTR ज्या प्रयोजनासा ी आवश्यक आहे, त्याबाबत पूर्ण माहिती भरा.
  iii) नेट बँकींग सुविधेव्दारे रक्कम भरा.
  iv) CIN असलेली पावती तयार होईल. त्याची प्रिंट घ्या.
  v) रककम भरलेचा पुरावा (CIN असलेली पावती) घेऊन आपण निवडलेल्या बँकेच्या शाखेस भेट दया. हवा असलेला e-SBTR प्राप्त होईल.
  vi) आपणांस e-SBTR प्राप्त झाला म्हणजे आपली रक्कम भरणा करण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे असे समजावे.

  • नेट बँकिंग सुविधा नसल्यास मात्र इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास –

  अ) ई-चलन -

  i) GRAS प्रणालीस भेट दया – Across the Counter पर्यायाची निवड करून भरणा करावयाच्या रक्कमेबाबत सविस्तर माहिती भरा.
  ii) GRN असलेले प्रारुप चलन प्राप्त होईल, अशा प्रारूप चलनाची प्रिंट घेऊन रक्कम आपण निवड केलेल्या बँकेमध्ये जमा केल्यानंतर आपणास GRN व CIN असलेले ई-चलन मिळेल.
  iii)आपणांस GRN व CIN असलेले ई-चलन प्राप्त झाले म्हणजे आपली रक्कम भरणा करण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे असे समजावे. (प्रारूप चलन तयार झालेनंतर सात दिवसात बँकेत रक्कम जमा करणे आवश्यक आहे.)

  ब) साधी पावती / e-SBTR -

  i) साधी पावती / e-SBTR ची सुविधा असलेल्या बँकेच्या वेबसाईटला भेट दया
  ii) साधी पावती / e-SBTR यापैकी हवा असलेला पर्याय निवडावा व त्यानंतर Across the counter हा पर्याय निवडून येणा-या फॉर्मवर ज्या प्रयोजनासा ी साधी पावती / e-SBTR आवश्यक आहे,त्याबाबत योग्य व अचूक माहिती भरा.
  iii) भरलेल्या माहितीची प्रिंट घेऊन आपण निवडलेल्या बँकेच्या शाखेस भेट दया. आवश्यक रक्कम रोख (Cash)/ धनादेश (Cheque)/ धनाकर्ष (DD) याव्दारे भरा.
  iv) आपणास साधी पावती / e-SBTR प्राप्त होईल.
  v) आपणास साधी पावती / e-SBTR प्राप्त झाला म्हणजे आपली रक्कम भरणा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

  • Internet तसेच Net Banking यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यास


  अ) प्राधिकृत सहभागी बँकेच्या साधी पावती / e-SBTR सुविधा असलेल्या शाखेस अथवा त्यांचे अधिकृत सब एजंट म्हणून काम करणा-या संस्थांना (परवानाधारक मुद्रांक विक्रेते, फ्रॅकिंग विक्रेते (Franking Vendors)) भेट दया. (सध्या IDBI, PNB, BOM व CANARA BANK या प्रा॑धिकृत सहभागी बँका आहेत.)

  i) साधी पावती / e-SBTR – यापैकी एका पर्यायासा ी – पूर्ण माहिती बँकेतील फॉर्ममध्ये भरा व ही माहिती व रक्कम बँकेमध्ये / Sub Agent यांचेकडे जमा करा.
  ii) आपणास साधी पावती / e-SBTR प्राप्त होईल. (साधी पावती अथवा e-SBTR प्राप्त करण्यासा ी सब एजंटला कोणतीही वेगळी फी/ सेवा शुल्क द्यावे लागत नाही.)

  ब) मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व इतर रकमांचा भरणा ई-चलनाच्या (GRAS) माध्यमाद्वारे शासनमान्य परवानाधारक मुद्रांक विक्रेते, फ्रॅकिंग विक्रेते (Franking Vendors) यांचेमार्फत करता येतो. त्यांचे मार्फत असा भरणा केल्यास शासन निर्णय दि.०७/०९/२०१३ अन्वये त्यांना प्रति दस्त जास्तीत जास्त रु.५०/- इतके सेवा शुल्क ग्राहकाकडून आकारता येते.

 • नागरिकांना मुद्रांक शुल्क ,नोंदणी फी व इतर प्रदाने भरावयास कोणते पर्याय उपलब्ध् आहेत ?
   

  नागरिकांना मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व इतर प्रदाने भरावयास खालील पर्याय उपलब्ध आहेत.
  तपशील १.ई-चलन २.साधी पावती ३.e-SBTR ४.नियमित मुद्राक कागद (जनरल स्टॅम्प पेपर) ५.उमट मुद्रांक (फ्रॅकिंग)
  को� े उपलब्ध् आहेत � १)सर्व सहभागी बँकामार्फत वैयक्तिक इंटरनेट बँकिंग सुविधा असेल तेव्हा On line.
  २) इंटरनेट बँकिंग सुविधा नसल्यास सहभागी बँकांमार्फत Across the Counter
  सुविधा असलेल्या खालील बँकांच्या निवडक शाखांमध्ये
  १) SBI
  २) Bank of Maharashtra
  ३) IDBI
  ४) PNB
  � १)आय.डी.बी. आय
  २) पंजाब नॅशनल बँक,
  ३) बँक ऑॅफ महाराष्ट्र,
  ४) कॅनरा बँक
  अ) वर नमूद पैकी कोणत्याही बँकेत नेट बँकिंग खाते असल्यास On line पद्धतीने.
  ब) नेट बँकिंग खाते नसल्यास वर नमूद बँकांच्या शाखावर Across the Counter पद्धतीने.
  (सदर बँकांच्या शाखांची यादी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध)
  � १)आय.डी.बी. आय
  २) पंजाब नॅशनल बँक,
  ३) बँक ऑफ महाराष्ट्र,
  ४) कॅनरा बँक
  अ) वर नमूद पैकी कोणत्याही बँकेत नेट बँकिंग खाते असल्यास On line पद्धतीने.
  ब) नेट बँकिंग खाते नसल्यास वर नमूद बँकांच्या शाखावर Across the Counter पद्धतीने.
  (सदर बँकांच्या शाखांची यादी विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध)
  � मुद्रांक विक्रेते, शासकीय कोषागारे, उपकोषागारे � परवानाधारक फ्रॅकिंग विक्रेते (Franking Vendors)
  (यादी विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे)
  � वित्तीय मर्यादा किती ? � अ) Across the Counter -कमीत कमी रु.३००/-
  आ) नेट बँकिंग – अमर्यादित
  � अ) Across the Counter
  कमीत कमी रु.३००/-
  आ) नेट बँकिंग – अमर्यादित
  � मुद्रांक शुल्क रक्कम-कमीत कमी रु.५,०००/-
  (मात्र फक्त नोंदणी फी चे प्रदानासा� ी e-SBTR वापरता येत नाही.)
  � मुद्रांक विक्रेत्यांकडून एका दस्तासा� ी
  जास्तीत जास्त रु.३०,०००/- मात्र कोषागारे उपकोषागारे व प्रधान मुद्रांक कार्यालय यांचेसा� ी अमर्यादित
  � जास्तीत जास्त रु.५,०००/-
  � कोणत्या दस्तासा� ी वापरता येते? � केवळ नोंदणी अनिवार्य असलेल्या दस्तांसा� ी � केवळ नोंदणी अनिवार्य असलेल्या दस्तांसा� ी � सर्व प्रकारच्या दस्तांसा� ी � सर्व प्रकारच्या दस्तांसा� ी � सर्व प्रकारच्या दस्तांसा� ी
  � कोणकोणते शुल्क / फी याव्दारे भरता येईल ? � नोंदणी अनिवार्य असलेल्या दस्तांसा� ीचे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, सर्च फी इ. � नोंदणी अनिवार्य असलेल्या दस्तांसा� ीचे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, सर्च फी इ. � सर्व प्रकारच्या दस्तांसा� ी मुद्रांक शुल्कासोबत नोंदणी फी.
  नोंदणी करणे अनिवार्य नसलेल्या दस्तांसा� ी नोंदणी फी लागू राहणार नाही.
  � मुद्रांक शुल्क � मुद्रांक शुल्क

  • दस्त हाताळणी शुल्काची (Document Handling Charges) संपूर्ण रक्कम संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने स्विकारली जाते.
  • नोंदणी फी, सर्च फी याबाबत रु.३००/- पर्यत रक्कम संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने स्विकारली जाते.

 • ई –चलन, साधी पावती व e-SBTR या e-Payment पध्दतीची वैशिष्टये कोणती ?
   

  अ.क्र. ई – चलन साधी पावती e-SBTR
  1 ई-चलन GRAS प्रणालीवरून तयार होते. साधी पावती प्राधिकृत सहभागी बँकेच्या वेब साईटवरून तयार होते. e-SBTR प्राधिकृत सहभागी बँकेच्या वेब साईटवरून तयार होतो.
  2 साध्या कागदावर प्रिंट होते साध्या कागदावर प्रिंट होते शासनाने पुरविलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त (पारंपारिक मुद्रांक सदृश्य) कागदावर प्रिंट होतो.
  3 अ) On line ई-पेमेंट करणा-या व्यक्तीस स्वतः प्रिंट घेता येते. आ) Across the counter पेमेंट करणा-या व्यक्तीस बँककडून उपलब्ध होते. अ) On line ई-पेमेंट करणा-या व्यक्तीस स्वतः प्रिंट घेता येते. आ) Across the counter पेमेंट करणा-या व्यक्तीस बँककडून उपलब्ध होते. प्राधिकृत सहभागी बँकाच e-SBTR देऊ शकतात.
  4 ज्या दस्तांची नोंदणी करणे अनिवार्य आहे, त्या दस्तांसा ीचे मुद्रांक शुल्क, दस्ताची नोंदणी फी तसेच सर्च / नक्कल फी आदी रकमांचा भरणा करता येईल. ज्या दस्तांची नोंदणी करणे अनिवार्य आहे, त्या दस्तांसा ीच मुद्रांक शुल्क, दस्ताची नोंदणी फी तसेच सर्च / नक्कल फी आदी रकमांचा भरणा करता येईल. जे दस्त नोंदविणे कायद्याने अनिवार्य आहे. तसेच जे दस्त नोंदविणे कायदयाने ऐेच्छिक आहे, अशा कोणत्याही दस्ताचे रु.५०००/- व त्यापेक्षा जास्तीचे मुद्रांक शुल्क भरता येते. नोंदणी फी भरावयाची असेल, तर ती मुद्रांक शुल्कासोबतच भरावी लागते, स्वतंत्रपणे फक्त नोंदणी फी भरता येत नाही.
  5 पक्षकार प्रिंट घेऊन दस्त नोंदणीसा ी स्वतःची स्वाक्षरी करून वापरु शकेल. अ)पक्षकार स्वतः प्रिंट घेऊन व स्वतः स्वाक्षरी करुन दस्त नोंदणीसा ी वापरु शकतो. आ) अशी पावती प्राधिकृत सहभागी बँकांच्या काऊंटर वरुन घेतल्यास बँकेचा अधिकारी स्वाक्षरी करतो. फक्त प्राधिकृत केलेल्या बँकाच e-SBTR देऊ शकतात. त्यावर बँकेचा अधिकारी स्वाक्षरी करतो. रु. ५०,०००/- पर्यंतच्या मूल्याच्या e-SBTR वर एका अधिकाऱ्याची स्वाक्षरी आवश्यक असते. रु.५०,०००/- पेक्षा जास्त मूल्याच्या e-SBTR वर दोन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक असते.
  6 On line व Net Banking सुविधा नसल्यास जर मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व इतर रकमांचा भरणा ई-चलनाच्या (GRAS) माध्यमाद्वारे शासनमान्य परवानाधारक मुद्रांक विक्रेते, फ्रॅकिंग विक्रेते (Franking Vendors) यांचेमार्फत केल्यास शासन निर्णय दि. ०७/०९/२०१३ त्यांना प्रति दस्त जास्तीत जास्त रु.५०/- इतके सेवाशुल्क ग्राहकांकडून आकारता येते. On line व Net Banking सुविधा नसल्यास बँकेच्या शाखेत जाऊन Input Form व रक्कम भरून साधी पावती प्राप्त केल्यास कोणतेही सेवा शुल्क आकारले जात नाही. On line व Net Banking सुविधा नसल्यास बँकेच्या शाखेत जाऊन Input Form व रक्कम भरून e-SBTR प्राप्त केल्यास कोणतेही सेवा शुल्क आकारले जात नाही.

 • ई-पेमेटद्वारे मुद्रांक शुल्क भरले असल्यास मुद्रांक खरेदीचा दिनांक कोणता समजला जातो?
   

  ई-पेमेंटद्वारे निर्माण झालेल्या पावतीवरील CIN अथवा GRN यापैकी ज्याचा दिनांक नंतरचा असेल, तो दिनांक मुद्रांक खरेदीचा दिनांक म्हणून ग्राह्य धरला जातो.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]