सर्वसाधारण माहिती

 • ई- पेमेंट ( e-Payment) म्हणजे काय?
   

  ई- पेमेंट (e-Payment) म्हणजे इंटरनेटचा वापर करून केलेले ऑन लाईन (वैयक्तिकरित्या नेट बँकिंगचा वापर करुन्) अथवा Across the Counter (बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन) केलेले पेमेंट होय.
 • ई- पेमेंट हे मुद्रांक शुल्क भरण्याचे सुरक्षित माध्यम आहे काय ? ई-पेमेंट प्रणालीला कायदेशीर आधार कोणता आहे ?
   

  हेाय. ई- पेमेंट हे मुद्रांक शुल्क भरण्याचे संपूर्णतः सुरक्षित माध्यम असून यापुढे जास्तीत जास्त मुद्रांक शुल्क ई-पेमेंट या माध्यमाद्वारे संकलित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.
  ई-पेमेंटबाबत कायदेशीर तरतूदी खालीप्रमाणे :-

  • महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये दि.२८/११/२०११ रोजी सुधारणा करण्यात आली असून कलम १०(३)(V) अन्वये मुद्रांक शुल्क संकलनाच्या पद्धतीत ई-पेमेंटचा समावेश करण्यात आला आहे.
  • ई-पेमेंटच्या बाबतीत राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-भरणा व परतावा नियम २०१३ तयार केले असून ते दि.२४ जुलै २०१३ पासून अंमलात आले आहेत.
  • ई-पेमेंटद्वारे नोंदणी फी व इतर शुल्कदेखील सुरक्षितरित्या भरता येते.

 • नोंदणी व मुद्रांक विभागासा ी ई-पेमेंट व्दारे रक्कम भ्ररणेकरिता कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
   

  नोदणी व मुद्रांक विभागामार्फत नोंदणी होणा-या दस्तांसा ी आणि नोंदणी न होणा-या दस्तांसा ी जमा करावे लागणारे मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी होणा-या दस्तासा ी जमा करावी लागणारी नोंदणी फी त्याचप्रमाणे दस्तांची माहिती शोधण्यासा ी भरावयाची सर्च फी इ. सर्व रकमा भरणेकरिता नागरिकांना अधिक सुलभ, सोयीस्कर पर्याय उपलब्ध करुन देण्यासा ी ई-पेमेंट सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. ई-पेमेंटसा ी खालीलप्रमाणे ३ पर्याय उपलब्ध आहेत. –

  1. ई – चलन
  2. ई-एस.बी.टी.आर
  3. साधी पावती
 • GRAS म्हणजे काय?
   

  GRAS म्हणजे - Government Receipt Accounting System. ही प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या https://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • या प्रणालीव्दारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसा ी कर तसेच शुल्काची रक्कम On line शासनजमा करता येते.
  • याव्दारे नोंदणी व मुद्रांक विभागाकडे जमा करावयाचे मुद्रांक शुल्क,नोंदणी फी तसेच सर्च फी ची रक्कम On line भरता येते.
 • आभासी कोषागार (Virtual Treasury) म्हणजे काय ?
   

  • GRAS प्रणालीव्दारे जमा होणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या ज्या कोषागारामध्ये जमा होते, त्या कोषागारास आभासी कोषागार (Virtual Treasury) असे म्हणतात.
  • GRAS प्रणालीव्दारे जमा होणा-या रकमेची पावती (Receipt) देणे, लेखा (Account) ेवणे, रकमांचा ताळमेळ (Reconciliation) घेणे व त्यावर नियंत्रण ेवणे ही महत्त्वाची कामे आभासी कोषागाराकडून केली जातात.
  • या कोषागाराचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्यांना आभासी कोषागार अधिकारी (Virtual Treasury Officer) असे संबोधतात.

 • GRN म्हणजे काय?
   

  • GRN म्हणजे Government Reference Number होय.
  • GRAS अथवा प्राधिकृत सहभागी बँकेच्या संकेतस्थळाद्वारे ई-पेमेंट करत असताना आभासी कोषागाराकडून सदर व्यवहारासा ी जो १८ अंकी विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्यास Government Reference Number (GRN) असे संबोधले जाते.
  • GRN चा वापर रक्कम भरणा केल्याबाबतची माहिती प्राप्त करून घेण्यासा ी तसेच रक्कम शासनजमा झाल्याची खात्री करून घेण्यासा ी करता येतो.

 • Government Reference Number (GRN) च्या शेवटी E, M, S अथवा R ही अक्षरे असतात, त्याचा अर्थ काय असतो ?
   

  • Government Reference Number (GRN) च्या शेवटी E, M, S अथवा R ही अक्षरे आपण भरणा केलेली रक्कम केाणत्या माध्यमाव्दारे भरली आहे, ती बाब दर्शवितात.
  • ई-चलनाबाबतची रक्कम ऑॅन लाईन भरली असल्यास तयार होणा-या ई-चलनाच्या GRN क्रमांकामध्ये शेवटी E हे अक्षर असते. (E for Electronic)
  • ई-चलनाबाबतची रक्कम Across the Counter पध्दतीने बँकेत जाऊन भरली असल्यास तयार होणा-या ई-चलनाच्या GRN क्रमांकामध्ये शेवटी M हे अक्षर असते. (M for Manual)
  • e-SBTR प्राप्त करुन घेण्यासा ी रक्कम भरली असल्यास तयार होणा-या GRN क्रमांकामध्ये शेवटी S हे अक्षर असते. (S for e-SBTR)
  • साधी पावती (Simple Receipt) प्राप्त करुन घेण्यासा ी रक्कम भरली असल्यास तयार होणा-या GRN क्रमांकामध्ये शेवटी R हे अक्षर असते. (R for Receipt)

 • CIN म्हणजे काय?
   

  • CIN म्हणजे Challan Identification Number होय. • GRAS अथवा प्राधिकृत सहभागी बँकेच्या वेबसाईटव्दारे ई-पेमेंट करत असताना रक्कम शासन भरणा केलेबाबत प्राधिकृत सहभागी बँकेकडून जो २० अंकी विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्यास Challan Identification Number (CIN) असे म्हणतात. • CIN चा वापर करुन भरणा केलेल्या रकमेबाबत माहिती घेता येते.
 • ई-चलन (e-Challan) म्हणजे काय ?
   

  ई-चलन (e-Challan) म्हणजे आभासी कोषागारात भरणा करण्यात आलेल्या रकमेचे, दस्ताशी संबंधित पक्षकाराचे नाव असलेले, शासन संदर्भ क्रमांक (GRN) व चलन ओेळख क्रमांक (CIN) नमूद असणारे विहित नमुन्यातील चलन होय.
 • साधी पावती (Simple Receipt) म्हणजे काय ?
   

  साधी पावती (Simple Receipt) म्हणजे आभासी कोषागारात मुद्रांक शुल्क, नोंदणी फी आणि इतर रकमांचा भरणा केल्यावर प्राधिकृत सहभागी बॅकेंने अथवा पक्षकाराने साध्या कागदावर मुद्रित (Print) केलेली पावती होय. अशी पावती फक्त प्राधिकृत सहभागी बँकेच्या वेबसाईटवरुन प्राप्त करुन घेता येते व त्यावर पक्षकार अथवा बँक अधिकारी यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असते.
 • e-SBTR म्हणजे काय ?
   

  • eSBTR म्हणजे इलेक्ट्रॉनिक सुरक्षित बँक व कोषागार पावती (Electronic Secured Bank & Treasury Receipt) होय.
  • e-SBTR हे मुद्रांक शुल्क भरण्याचे एक आधुनिक माध्यम असून यामध्ये नागरिकांचा पारंपारिक मुद्रांक कागदावरचा विश्वास अबाधित ेवून त्यांना ई पेमेंटच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
  • e-SBTR ची प्रिंट ही शासनाकडून प्राधिकृत बँकेस पुरविलेल्या मुद्रांक सदृश्य कागदावर घेण्यात येते व त्यावर त्या बँकेच्या अधिका-याची स्वाक्षरी असते.

 • ई- पेमेंट प्रणालीचे फायदे कोणते ?
   

  ई-पेमेंट प्रणालीचे फायदे खालीलप्रमाणे :-

  • या प्रणालीव्दारे रक्कम केव्हाही व को ूनही (Anytime & from Anywhere) ऑन लाईन पध्दतीने भरता येते.
  • नेट बँकिंग सुविधेचा वापर करून रकमेचा भरणा केल्यास ई-चलन किंवा साधी पावती घरबसल्या मिळते. मात्र e-SBTR हा मुद्रांक सदृश्य विशिष्ट कागदावर प्रिंट होत असल्याने पक्षकारास e-SBTR संबंधित बँकेमार्फतच प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
  • शासनास भरणा केलेली रक्कम शासनजमा झाल्याची खात्री होते.
  • नेमक्या रकमेचा भरणा करता येतेा.
  • रोख (Cash) रक्कम हाताळण्याची जोखीम कमी होते.
  • मुद्रांकाचा परतावा (Refund) घ्यावयाचा असल्यास परंपरागत मुद्रांक शुल्क परतावा प्रकरणामध्ये १०% वजावट होते. परंतु ई-पेमेंटव्दारे भरणा केलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा घ्यावयाचा झाल्यास जास्तीत जास्त रु.१०००/- इतक्याच रकमेची वजावट होते. त्यामुळे नागरिकांच्या पैशात बचत होते.
 • घरबसल्या ई – पेमेंट करण्यासा ी आवश्यक गोष्टी कोणत्या ?
   

  घरबसल्या ई – पेमेंट करण्यासा ी आवश्यक बाबी खालीलप्रमाणे --

  • इंटरनेट जोडणीसह संगणक सुविधा असावी.
  • संगणक वापराची विशेषत: ई -पेमेंट, ई -बुकिंग, ऑन लाईन फॉर्म भरणे यासारख्या गोष्टींची ओळख असावी.
  • On line रक्कम भरणार असल्यास ई -पेमेंटसा ी GRAS प्रणालीवर उपलब्ध असलेल्या बॅकेची नेट बँकिंग सुविधा असावी.


  * आपणाकडे नेट बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्यास GRAS प्रणालीवर नमूद असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये समक्ष जाऊन Across the counter पद्धतीने ई-पेमेंट करता येते.

 • ई – पेमेंटच्या बाबतीत Across the Counter Payment म्हणजे काय ?
   

  ज्या पक्षकारांकडे नेट बँकिंगची सोय उपलब्ध नाही, तथापि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे ते पक्षकार Across the Counter पद्धतीने बँकेच्या शाखेमध्ये रक्कम भरणा करू शकतात. त्याकरिता

  • स्वतःकडे असलेल्या इंटरनेटचा वापर करून GRAS प्रणालीद्वारे प्रारूप चलन निर्माण करावे.
  • सदर प्रारूप चलन व भरावयाची रक्कम GRAS प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या बँकांच्या ज्या शाखांमध्ये रक्कम स्विकारण्याची सुविधा आहे, त्या शाखांमध्ये जाऊन भरावी.
  • ही रक्कम रोख (Cash)/ धनादेश (Cheque)/ धनाकर्ष (DD) पद्धतीने भरावी.
  • आपण भरणा केलेली रक्कम जर धनादेश (Cheque) किवा धनाकर्ष (DD) स्वरुपात असेल, तर सदरची रक्कम बँकेच्या खात्यात जमा झाल्यानंतरच सदरची शाखा त्यांचेकडून रक्कम शासनजमा करते.
  • संबंधित बँक आपल्या वतीने शासनास On line रक्कम जमा करेल व आपणास रक्कम जमा केल्याबद्दल विहित नमुन्यातील चलन ( GRN व CIN असलेले ) देईल.

 • एखादया पक्षकाराकडे नेट बँकिंग व इंटरनेटची सुविधादेखील उपलब्ध नसल्यास त्याला ई-पेमेंट करता येऊ शकेल काय ?
   

  होय. ज्या पक्षकाराकडे नेट बँकिंग व इंटरनेटची देखील सुविधा उपलब्ध नाही, त्यांना देखील ई-पेमेंट करता येऊ शकते.
  यासा ी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

  • अ) ज्या प्राधिकृत सहभागी बँकेच्या राविक शाखांमध्ये e-SBTR अथवा साधी पावती देण्याची सुविधा उपलब्ध आहे त्या शाखांमध्ये जर आपणास नोंदणी होणाऱ्या दस्तांसा ी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क यांचा एकत्र भरणा करावयाचा असेल, तर e-SBTR अथवा साधी पावतीद्वारे सदरचा भरणा करता येईल. तसेच नोंदणी न होणाऱ्या दस्तांसा ी मुद्रांक शुल्क भरावयाचे असल्यास e-SBTR द्वारे सदरचा भरणा करता येईल. याकरिता बँकांना कोणतेही सेवा शुल्क द्यावे लागत नाही. (अधिक तपशीलासा ी भाग ४ व ५ मधील सूचना पाहाव्यात.)
  • ब) नोंदणी होणाऱ्या दस्तांसा ी मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व इतर रकमांचा भरणा ई-चलनाच्या (GRAS) माध्यमाद्वारे सदर सुविधा उपलब्ध असलेले परवानाधारक मुद्रांक विक्रेते यांचेमार्फत देखील करता येतो. त्यांचेमार्फत असा भरणा केल्यास त्यांना ग्राहकाकडून प्रति दस्त जास्तीत जास्त रु.५०/- इतके सेवा शुल्क दि.०७/०९/२०१३ च्या शासन निर्णयानुसार आकारता येते.
 • GRAS प्रणालीचा वापर कसा करावा ?
   

  याबाबत सविस्तर सूचना https://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर FAQ/User’s Guide या िकाणी उपलब्ध आहेत.
 • कोणकोणत्या बँकांमार्फत GRAS प्रणालीव्दारे ई-पेमेंट करता येईल ?
   

  अशा सर्व सहभागी बँकांची यादी https://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर Available Banks या लिंकवर उपलब्ध आहे.
 • GRAS प्रणालीमध्ये नमूद बँका व्यतिरिक्त अन्य कोणत्या संस्थामार्फत ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे?
   

  मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व इतर रकमांचा भरणा ई-चलनाच्या (GRAS) माध्यमाद्वारे शासनमान्य परवानाधारक मुद्रांक विक्रेते, फ्रॅकिंग विक्रेते (Franking Vendors) यांचेमार्फत देखील करता येतो. त्यांचेमार्फत असा भरणा केल्यास त्यांना ग्राहकाकडून प्रति दस्त जास्तीत जास्त रु.५०/- इतके सेवा शुल्क दि.०७/०९/२०१३ च्या शासन निर्णयानुसार आकारता येते.
 • GRAS प्रणालीवरून रक्कम भरणा केल्यानंतर सदरची रक्कम शासनजमा झाल्याची माहिती कशी मिळेल?
   

  • GRAS प्रणालीवरून रक्कम शासनास भरणा केल्यांनतर GRN व CIN हे दोन्ही क्रमांक तयार होतात. हे दोन्ही क्रमांक नमूद असलेले चलन म्हणजे शासनाकडे रक्कम भरली असल्याचा पुरावा होय.
  • अशा चलनाची प्रत लगेच घेतल्यास त्यावर कोणाचीही प्रिंटेड स्वाक्षरी नसते.
  • सदर रकमेबाबतची माहिती बँकेकडून आभासी कोषागाराकडे (Virtual Treasury) पोहोचल्यानंतर आभासी कोषागाराकडून त्याची शहानिशा झाल्यानंतर संबंधित चलनाची प्रत काढल्यास त्यावर आभासी कोषागार अधिकारी (VTO) यांची रक्कम शासन जमा झाल्याबाबत डिजिटल स्वाक्षरीही उमटलेली असते. याला साधारणपणे दोन दिवस लागतात.

 • ई-पेमेंटद्वारे रक्कम भरणा केल्यानंतर चलनाची प्रत प्रिंट केल्यास काही वेळेस त्यावर डिजिटल स्वाक्षरीच्या चौकटीत प्रश्नचिन्ह येते, त्याचा अर्थ काय ?
   

  • रक्कम भरणा केल्यानंतर चलनाची प्रिंट त्वरित घेतल्यास त्यावर कोणाचीही डिजिटल स्वाक्षरी अथवा प्रश्नचिन्ह उमटत नाही.
  • तथापि, अशा चलनाची प्रिंट रक्कम भरणा केल्यापासून साधारणपणे दोन दिवसानंतर घेतल्यास, अशा चलनाच्या खालील बाजूस आभासी कोषागार अधिकारी (VTO) यांची डिजिटल स्वाक्षरीही उमटलेली असते. ज्यावर काही वेळा एक प्रश्नचिन्ह उमटलेले असते.
  • प्रश्नचिन्ह म्हणजे भरणा केलेल्या रकमेबाबत शंका आहे, असे नसून तो केवळ डिजिटल स्वाक्षरीच्या संबंधातील तांत्रिक भाग आहे. प्रश्नचिन्ह असले तरी दस्त नोंदणीस अडचण येणार नाही.
  • याविषयी अधिक माहितीकरिता GRAS प्रणालीच्या Home Page वरील Download Links या सदराखाली Digital Signature Instructions पाहाव्यात.

 • GRAS प्रणालीव्दारे ई-पेमेंट करतांना काही अडचणी आल्यास काय करावे ?
   

  अ) ई-पेमेंट प्रणालीचा वापर करताना अडचण आल्यास :-

  GRAS प्रणालीच्या संकेतस्थळाच्या Home Page वरील User’s Guide मधील सूचना पाहाव्यात.

  ब) ई-पेमेंटद्वारे रक्कम भरणा झालेनंतर काही अडचण आल्यास :-

  1. नोंदणी व मुद्रांक विभागाचे संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक यांचेकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसा ीच्या सह जिल्हा निबंधकांची यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisation सदराखाली Offices येथे उपलब्ध आहे.
  2. आभासी कोषागार (Virtual Treasury) मुंबई यांच्याशी कार्यालयीन वेळेत ०२२-२२०४०५६४ या दूरध्वनी कमांकावर संपर्क साधावा.किंवा vto@mahakosh.in ई मेलवर संपर्क साधावा.

 • GRAS प्रणालीद्वारे रक्कमेचा भरणा केलेनंतर ई-चलनाची प्रिंट येत नसल्यास काय करावे?
   

  • सर्वसाधारणपणे रक्कम भरणा केल्यानंतर ई-चलनाची प्रिंट त्वरित प्राप्त होते.
  • अपवादात्मक परिस्थितीत अशी प्रिंट प्राप्त न झाल्यास :-

  अ) GRAS प्रणालीवर Search Challan या लिंकव्दारे विभाग, जिल्हा, बँकेचे नाव व भरणा केलेली रक्कम व आपणास प्राप्त झालेला GRN / CIN याची माहिती भरल्यास प्रिंट प्राप्त होऊ शकेल.
  ब) मात्र – GRN/ CIN यापैकी एकही नसल्यास :

  • i) आपण ज्या बँकेमार्फत ई-पेमेंट केले आहे, त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग अकाऊंटमध्ये Log in केल्यास GRN व CIN प्राप्त होऊ शकतो.
  • ii) मात्र जर आपण इंटरनेट बँकिंगऐेवजी Across the Counter Payment केले असल्यास संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जाऊन GRN व CIN प्राप्त करुन घेता येतो.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]