मिळकतीचे मूल्यांकन

 • जमिनीचे / मिळकतीचे बाजार मूल्य म्हणजे काय?
   

  दोन पक्षकारांमध्ये होत असलेल्या स्थावर मालमत्तेबाबतच्या व्यवहारांमध्ये दस्तऐवज ज्या दिनांकास स्वाक्षरित / निष्पादित (Date of execution of the document) करण्यात आला असेल त्या दिनांकास ती मालमत्ता खुल्या बाजारात विकली असता जी किंमत आली असती अशी किंमत किंवा दस्तामध्ये नमूद करण्यात आलेली मोबदल्याची रक्कम, यापैकी जास्तीचे मूल्य म्हणजे मिळकतीचे बाजार मूल्य होय. [पहा - महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 2 (na)]
 • कोणत्या प्रकारच्या दस्ताचे बाबतीत वार्षिक मूल्य दर तक्त्यानुसार वास्तव (खरे) बाजार मूल्य विचारात घेतले जाते?
   

  विक्री करार (Agreement to Sale), खरेदीखत (Conveyence), अदलाबदलपत्र (Deed of Exchange), विक्री प्रमाणपत्र (Certificate of Sale), वाटपपत्र (Partition Deed), मोबदला घेऊन अथवा मोबदला न घेता तिऱ्हाईत इसमास मिळकतीची विक्री करण्यासा� ी दिलेले कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney), संव्यवस्था (Settlement Deed), भाडेपट्टा (Lease Deed), भाडेपटयाचे हस्तांतरण (Transfer of Lease) व विकसन करारपत्र (Development Agreement) या दस्त ऐवजांना, दस्त ऐवजाचे विषयवस्तू असलेल्या (म्हणजेच दस्तात नमूद) मिळकतीचे खरे बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क विचारात घेतले जाते.
 • मुद्रांक शुल्क आकारणी कशावर केली जाते ?
   

  मुद्रांक शुल्क आकारणी, दस्तात नमूद मोबदला रक्कम अथवा वार्षिक मूल्य दर तक्त्यातील नमूद दराने मिळकतीचे परिगणित होणारे मूल्य यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रक्कमेवर केली जाते.
 • दस्त निष्पादनाचा दिनांक (Date of execution) व नोंदणी दिनांक (Date of registration) वेगवेगळे असल्यास कोणत्या दिनांकाचे मूल्य मुद्रांक शुल्कासा� ी विचारात घेतले जाते?
   

  • � दस्त निष्पादनाचा दिनांक (Date of execution) व नोंदणी दिनांक (Date of registration) वेगवेगळे असल्यास दस्त निष्पादनाचे दिवशी असलेल्या वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दराने येणारे मूल्य मुद्रांक शुल्कासा� ी विचारात घेतले जाते.
  • � सविस्तर माहितीसा� ी पहा भाग-3 मुद्रांक शुल्क
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दराने थेट मूल्यांकन करणे योग्य होईल का?
   

  नाही. केवळ वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दर विचारात घेऊन मूल्यांकन न करता त्यासोबतच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊनच मूल्यांकन केले जाते.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दर व मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन निश्चित होणाऱ्या बाजारमूल्यापेक्षा कमी दराने दुय्यम निबंधक दस्त नोंदवू शकतात काय?
   

  नाही. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे कलम 31 अन्वये केवळ अभिनिर्णयांतर्गत प्रकरणी उपलब्ध पुरावे व सक्षम अधिकाऱ्याच्या मूल्यांकनानुसार निश्चित केलेल्या मूल्याप्रमाणे दस्त नोंदवू शकतात.
 • मुद्रांक शुल्कावर परिणाम करणाऱ्या बाबी दस्तात नमूद करणे आवश्यक असते का?
   

  होय. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे कलम 28 मध्ये नमूद केल्यानुसार मूल्यांकनावर परिणाम करणाऱ्या या सर्व बाबी दस्तात अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे याअनुषंगाने त्या पृष् र्थ पुरावे सादर करणे देखील अपेक्षित आहे.
 • एखाद्या मिळकतीचे शासकीय, निमशासकीय संस्था उदा.सिडको, म्हाडा, एम.आय.डी.सी. इ. कडून रविण्यात आलेले मूल्य अंतिम मूल्य म्हणून ग्राह्य धरले जाते काय?
   

  होय. मुंबई मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम 1995 मधील नियम 4(6) नुसार एखाद्या मिळकतीचे शासकीय/ निमशासकीय संस्थांकडून लाभार्थींना विक्री/ वाटप होणाऱ्या प्रथम व्यवहारामध्ये अशा शासकीय/निमशासकीय संस्थांनी रविलेले मूल्य अंतिम मूल्य म्हणून ग्राहय धरले जाते.
 • शासकीय/ निमशासकीय संस्थेकडून वाटप झालेल्या भूखंडाचे अन्य व्यक्तीस हस्तांतरण करण्यासा ी कोणत्या दराने मूल्य निश्चित केले जाते?
   

  शासकीय/ निमशासकीय संस्थेकडून वाटप झालेल्या भूखंडाचे अन्य व्यक्तीस हस्तांतरण होत असल्यास वार्षिक मूल्यदर तक्त्यात नमूद दराने मूल्य परिगणित केले जाते.
 • मुंबई शहर व उपनगरातील भाडेकरु असलेल्या जुन्या इमारतीचे व उपकर प्राप्त मिळकतीचे (Cessed Building) मूल्यांकन करताना अनुज्ञेय चटई क्षेत्राबाबत महानगरपालिकेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे काय?
   

  होय. मुंबई शहर व उपनगरातील भाडेकरु असलेल्या जुन्या इमारतीचे व उपकर प्राप्त मिळकतीचे (Cessed Building) मूल्यांकन करताना अनुज्ञेय चटई क्षेत्राबाबत महानगरपालिकेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
 • जुन्या इमारतीतील भाडेकरुला नवीन इमारतीत जागा देताना मूल्यांकन कसे निश्चित केले जाते?
   

  या प्रकारचे मूल्यांकन मार्गदर्शक सूचना क्र.2 नुसार केले जाते.
 • पुनर्विकासानंतर भाडेकरु त्यास मिळणाऱ्या क्षेत्राव्यतिरिक्त जास्तीचे क्षेत्र खरेदी करत असल्यास मूल्यांकन कसे केले जाते?
   

  भाडेकरु त्यास मिळणाऱ्या क्षेत्राव्यतिरिक्त अधिकचे क्षेत्र खरेदी करीत असल्यास अशा अधिकच्या क्षेत्राचे मूल्यांकन वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दराने केले जाते.
 • भाडेकरुव्याप्त मिळकतींसा ी भाडेकरुंचे पुरावे आवश्यक आहेत काय?
   

  होय. याकरिता मार्गदर्शक सूचना क्र.2 मध्ये नमूद पुरावे आवश्यक आहेत.
 • मुंबई शहर व उपनगरात मालकी हक्क असलेल्या इमारतीचे पुनर्विकास प्रकल्पामध्ये मालकास/ सभासदास नवीन इमारतीमध्ये सदनिका देताना त्याचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  • अशा प्रकारच्या मालमत्तेचे मूल्यांकन नोंदणी व मुद्रांक विभागाचे परिपत्रक दि.7/11/2013 मधील सूचनांनुसार केले जाते.
  • सदर परिपत्रक www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publication या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहे.

 • सोसायटीने कॉन्ट्रॅक्टर मार्फत पुनर्विकास केल्यास नवीन इमारतीत सोसायटीच्या मूळ सभासदास सदनिका/गाळा देण्यात येतो अशा दस्तऐवजास कोणत्या दराने मुद्रांक शुल्क आकारले जाते?
   

  सोसायटीने कॉन्ट्रॅक्टर मार्फत पुनर्विकास केल्यास नवीन इमारतीत सोसायटीच्या सभासदास सदनिका/गाळा देण्यात येतो अशा दस्तऐवजास रु.100 इतके मुद्रांक शुल्क आकारले जाते.
 • स्वतंत्र भूखंडावरील इमारतीचे बाजार मूल्य कसे निश्चित केले जाते?
   

  स्वतंत्र भूखंडावरील इमारतीचे बाजार मूल्य मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.7 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.6 प्रमाणे परिगणित (Calculate) केले जाते.
 • टी.डी.आर. क्षमता असलेल्या भूखंडाचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार टी.डी.आर. अनुज्ञ‍ेय असलेल्या भूखंडाचे मूल्यांकन मार्गदर्शक सूचना क्र.3 नुसार, वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दरास 40% वाढ देऊन केले जाते.
 • जुन्या इमारतीचे मूल्यांकनामध्ये घसारा (Depreciation) अनुज्ञेय होणेसा ी काही पुरावे आवश्यक आहेत काय व कोणते ?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.4 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे इमारतीचे वयोमानानुसार घसारा (Depreciation) अनुज्ञेय होणेसा ी इमारत पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate), भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate), मिळकत कर आकारणी देयक (Property Tax Bill), वीजदेयक (Electricity Bill) (त्याच मिळकत क्षेत्राचा पत्ता व वीज पुरव ा दिनांक नमूद असलेले) इ. यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.
 • दस्त ऐवजात बांधकामाचे कार्पेट क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्र नमूद असल्यास मूल्यांकन कसे केले जाते?
   

  • मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.5 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.4 नुसार दस्तामध्ये फक्त कार्पेट क्षेत्र नमूद असल्यास त्या क्षेत्रास 1.2 ने गुणाकार करुन, वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दराने बांधकाम मूल्य परिगणित (Calculate) केले जाते.
  • बिल्ट-अप एरिया = 1.2 x कार्पेट एरिया, किंवा
  • कार्पेट एरिया = बिल्ट-अप एरिया / 1.2
  • दस्तामध्ये कार्पेट क्षेत्राव्यतिरिक्त कोणताही अन्य उल्लेख असल्यास त्यापैकी दस्तात नमूद जास्तीचे क्षेत्र विचारात घेऊन मूल्यांकन केले जाते.

 • मो या क्षेत्राची दुकाने/कार्यालय असल्यास मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मो या क्षेत्राची दुकाने/ कार्यालयांचे मूल्यांकन मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.9 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.8 प्रमाणे केले जाते.
 • मो या दुकान संकुलातील (Mall) दुकानाचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मो या दुकान संकुलातील (Mall) दुकानाचे मूल्यांकन मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.10 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.9 प्रमाणे केले जाते.
 • इमारतीमधील तळघर (Basement) चा वापर गोडाऊन म्हणून होत असल्यास त्याचे मूल्‍यांकन कसे केले जाते?
   

  तळघर (Basement) चा वापर गोडाऊन म्हणून होत असल्यास त्याचे मूल्यांकन मुंबई शहर व उपनगरांकरता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.12 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.11 नुसार संबंधित दुकान दराच्या 80% दराने केले जाते.
 • दुकान/ औद्योगिक गाळयास पोटमाळा (Mezzanine Floor) असल्यास त्यांचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.13 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.12 नुसार दुकान/ औद्योगिक गाळयास पोटमाळा (Mezzanine Floor) असल्यास त्यांचे मूल्यांकन त्या मजल्याच्या संबंधित दुकान/ औद्योगिक वापराच्या 70% दराने केले जाते.
 • तळमजल्यावरील सदनिका/दुकान यांना लागून असलेली जमीन खरेदी करणेत येत असल्यास अशा जमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.14 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.13 नुसार तळमजल्यावरील सदनिका/दुकान यांना लागून असलेली जमीन खरेदी होत असल्यास तिचे मूल्यांकन संबंधित मूल्यविभागातील जमीन दराच्या 40% दराने केले जाते.
 • सदनिका/दुकान / कार्यालयासह गच्ची (Terrace) खरेदी केल्यास त्याचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.15 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.14 नुसार सदनिका / दुकान / कार्यालयासह गच्ची (Terrace) खरेदी केली असल्यास अशा गच्चीचे क्षेत्राचे मूल्यांकन संबंधित सदनिका/ दुकान/ कार्यालय दराच्या 40% दराने केले जाते.
 • सदनिकेच्या वरच्या मजल्यावरील गच्ची (Terrace) सदनिकेसह विक्री होत असल्यास मूल्यांकन कसे करावे?
   

  सदनिकेच्या वरच्या मजल्यावरील गच्ची (Terrace) सदनिकेसह विक्री होत असल्यास, अशा गच्चीचे मूल्यांकन वार्षिक मूल्यदर तक्त्यातील सदनिकेच्या दराच्या 25% दराने करण्यात येते.
 • आच्छादित वाहनतळाचे (Covered parking)/पोडिअम पार्किंगचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.16 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.15 नुसार मुंबई व ाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी ‍चिंचवड या िकाणी वार्षिक मूल्य दर तक्त्यातील संबंधित वापराच्या दराच्या 25% दराने व उर्वरित िकाणी 15% दराने आच्छादित वाहनतळाचे (Covered parking) /पोडिअम पार्किंगचे मूल्यांकन केले जाते.
 • खुल्या जमीनीवरील वाहनतळाचे (Open parking) मूल्यांकन कसे केले जाते?
   

  मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.16 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.15 नुसार खुल्या जमिनीवरील वाहनतळाचे क्षेत्राचे मूल्यांकन संबंधित मूल्य विभागाच्या जमीन दराच्या 40% दराने केले जाते.
 • बहुमजली इमारतीमधील सदनिका/कार्यालये/व्यावसायिक वापरासा ी अतिरिक्त दर लावला जातो का?
   

  • उद्वाहन सुविधा असलेल्या बहुमजली इमारतीमधील सदनिका/कार्यालये/व्यावसायिक वापरासा ी खालीलप्रमाणे अतिरिक्त दर आकारला जातो.
  1. तळमजला ते 4 मजल्या पर्यंत – वार्षिक मूल्यदराप्रमाणे
  2. 5 वा मजला ते 10 मजल्या पर्यंत – 5%
  3. 11 वा मजला ते 20 मजल्या पर्यंत – 10%
  4. 21 वा मजला व त्यावरील मजले – 15%
 • संभाव्य बिनशेती वापराचे जमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  संभाव्य बिनशेती वापराचे जमिनीचे मूल्यांकन मार्गदर्शक सूचना क्र.16 नुसार केले जाते.
 • शेतघरांसा ी (Farm House) जमीन खरेदी होत असेल तर मूल्यांकन कसे केले जाते?
   

  शेतघरांसा ी (Farm House) जमीन खरेदी होत असेल तर संभाव्य बिनशेती वापर समजून, संभाव्य बिनशेतीच्या दराने मूल्यांकन केले जाते.
 • ग्रामीण क्षेत्रात शेतकऱ्याच्या शेतजमीनीत, स्वत:चे वैयक्तीक वापराचे घर, जनावरांचा गो ा असल्यास मूल्यांकन कशा प्रकारे केले जाते?
   

  अशा दस्तातील मिळकतीचे मूल्यांकन करताना जमिनीचे व इमारतीचे असे दोन्ही मूल्य विचारात घेतले जाते. जमिनीचे मूल्य हे संबंधित मूल्य विभागातील दराने केले जाते. बांधकामाचे मूल्य, बांधकाम दराने इमारतीचे वयोमानानुसार घसारा (Depreciation) विचारात घेऊन निश्चित केले जाते. सदर सूचना शेतकऱ्यांचे स्वत:चे घराव्यतिरिक्त इतर शेतघरांसा ी लागू नाही.
 • जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरुन हेक्टरी आकार कसा काढला जातो?
   

  जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील आकारास क्षेत्राने भागून (आकार ÷ क्षेत्र) हेक्टरी आकार काढला जातो. यामध्ये पोटखराब क्षेत्र विचारात घेतले जात नाही.
 • जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील पोटखराब क्षेत्राचे मूल्यांकन करताना विचार केला जातो काय?
   

  जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील पोटखराब क्षेत्राचा स्वतंत्र विचार न करता लागू जमीन दरानुसार मूल्यांकन केले जाते.
 • शेत जमिनीतील फळबागांचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये फळबागेकरिता स्वतंत्र दर दिले नसल्यास शेत जमिनीतील फळबागेचे मूल्यांकनाकरिता उर्वरित महाराष्ट्रासा ीच्या मार्गदर्शक सूचना क्र.20 मध्ये प्रमाण देण्यात आले आहे. उर्वरित झाडांचे बाबतीत, झाडाचे आयुष्यमान, त्यापासून मिळणारे संभाव्य उत्पन्न इ.बाबी तपासून अभिनिर्णयांतर्गत (Adjudication) मूल्यांकन केले जाते.
 • विहिर व रस्त्याचे वहिवाट हक्कासा ी मूल्यांकन कसे केले जाते?
   

  • बागायत जमिनीचे मूल्यांकन मार्गदर्शक सूचना क्र.20 नुसार करण्यात येत असल्याने विहिरीसा ी स्वतंत्र मूल्य विचारात घेतले जात नाही.
  • रस्त्याचे वहिवाटीखालील क्षेत्राचे मूल्यांकन संबंधित जमीन दराने केले जाते.

 • 7/12 उताऱ्यावर विहीरीची नोंद असेल व जर ती कोरडी असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यास मूल्यांकन कसे केले जाते?
   

  • ज्या जमिनीस सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही अथवा विहीर/कूपनलिका असूनही कोरडी असल्याने बागायती पीके घेतली जात नाहीत अशा जमीनीचे मूल्यांकन वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्यातील शेतसारा आकारानुसार असलेल्या जिरायत शेतजमीन दरानुसार येणाऱ्या मूल्यामध्ये विहिर / कूपनलिकेचे बांधकामाचे मूल्य समाविष्ट करुन मूल्यांकन केले जाते.
  • सविस्तर माहितीसा ी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांचे क्र.कार्या-15/प्र.क्र.-1/ मूल्यांकन सूट/16/2006/281,दि.2/5/2006 चे परिपत्रक पहावे.
  • सदर परिपत्रक www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहे.
 • कालव्याच्या लाभक्षेत्रातील जमीनीस कालव्याचे बांधकाम न झाल्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यास मूल्यांकन कसे केले जाते ?
   

  • अशा जमीनीस अन्य सिंचनाचीही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा जमीनीचे मूल्यांकन वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यातील शेतसारा आकारानुसार असलेल्या जिरायत शेतजमीन दरानुसार केले जाते.
  • मात्र, कालव्याव्दारे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसलेचे पाटबंधारे विभागाचे प्रमाणपत्र दस्तासोबत असणे आवश्यक आहे.
 • शासनाने/ जिल्हाधिकारी यांनी खाणपट्टा (Mining Belt) म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातील तसेच पवनचक्कीसा ी विक्री होणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.20 नुसार शासनाने/ जिल्हाधिकारी यांनी खाणपट्टा (Mining Belt) म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातील तसेच पवनचक्कीसा ी विक्री होणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन त्या जमिनींच्या वार्षिक मूल्य दर तक्त्यात नमूद दराच्या दुप्पट दराने केले जाते.
 • एखाद्या 10 आर पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शेतजमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.21 नुसार 10 आर पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शेतजमिनीसा ी केवळ प्रती हेक्टरी दर नमूद असल्यास, त्या जमिनीच्या पीकपहाणी नोंदीनुसार येणाऱ्या दराच्या दीडपट दराने मूल्यांकन केले जाते. वार्षिक मूल्य दर तक्त्यात तरी पॅडी (भातशेती) सा ी स्वतंत्र दर नमूद असल्यास आणि एखाद्या संपूर्ण सर्व्हे नंबर/ गट नंबरचे क्षेत्र 10 आर पेक्षा कमी असल्यास व ते पूर्णपणे विक्री केले जात असल्यास आणि ती जमीन कोणत्याही रस्त्यास सन्मुख नसल्यास त्या जमिनीस दीडपट दर लागू केला जात नाही.
 • क्षारपड जमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते?
   

  उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.27 नुसार क्षारपड जमिनीचे मूल्यांकन आवश्यक ती शहानिशा करुन बागायती जमिन दराच्या 60% दराने करण्यात येते.
 • ग्रामीण क्षेत्रात विशेष नगर विकास प्रकल्प (Special Township) विशेष औद्योगिक क्षेत्रे (Special Economic Zone), खासगी गिरिस्थान प्रकल्प (Hill Station). तसेच अन्य संभाव्य निवासी/औद्योगिक/वाणिज्य बिनशेती प्रयोजनासा ी प्रथम व
   

  उर्वरीत महाराष्ट्रासा ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.29 नुसार अशा जमीनीचे मूल्यांकन गावाच्या वार्षिक मूल्य दर तक्त्यात दिलेल्या बिनशेती दराच्या 50% इतका मूल्य दर विचारात घेऊन व ना-विकास विभागासा ी दिलेल्या स्थूल जमीनीच्या कोष्टकानुसार केले जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]