वार्षिक मूल्य दर तक्ते

 • वार्षिक मूल्य दर तक्ते म्हणजे काय? ते कोणत्या नियमाखाली व का तयार केले जातात?
   

  • � महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम 1995 अंतर्गत तयार केलेले जमीन व इमारतीचे दर दर्शविणारे तक्ते म्हणजे वार्षिक मूल्य दर तक्ते होय.
  • � सदर तक्ते जमीन व इमारतीचे खरेदी-विक्री,करारनामा इ. दस्त नोंदणीसा� ी मुद्रांक शुल्क � रविणेकामी वास्तव बाजारमूल्य निश्चितीसा� ी दरवर्षी तयार केले जातात.

 • वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणेची पध्दत कधीपासून सुरु झाली?
   

  वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणेची पध्दत सन 1989 पासून सुरु झाली.
 • वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणेबाबत कोणती कायदेशीर कार्यपध्दती आहे? ते कधीपासून अंमलात येतात? त्याचा कालावधी किती असतो?
   

  • � महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम 1995 मधील नियम 4 मधील तरतुदीनुसार सहसंचालक, नगररचना, मूल्यांकन, महाराष्ट्र राज्य,पुणे हे त्यांच्या अधिपत्याखालील विभागीय स्तरावरील उपसंचालक/ सहायक संचालक,नगररचना, मूल्यांकन यांचे मदतीने वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करुन ते मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी (नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांचेकडे प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर पूर्वी मान्यतेसा� ी सादर करतात.
  • � सदर तक्त्यांस मान्यता मिळाल्यानंतर त्यानंतरच्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या 1 वर्षाच्या कालावधीसा� ी ते लागू केले जातात.

 • वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करताना कोणते निकष लावले जातात?
   

  • � वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करताना महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम,1995 मध्ये नमूद कार्यपध्दती व निकषांचा उदा.जमिनीचा व बांधकामाचा प्रकार, स्थान, स्थानानुसार मिळकतीमधील गुण (Merits) जसे मुख्य रस्त्यालगतची जागा व दोष (Demerits) जसे कचरा विल्हेवाटीची जागा, हरित/ ना-विकास विभागातील जागा तसेच मूल्यांकनाची तत्वे इ. चा अवलंब केला जातो.
  • � भू-वापरासा� ी नगर रचना विभागाकडील मंजूर प्रादेशिक योजना/ विकास योजनेतील प्रस्तावित भू-वापर, याचा आधार घेतला जातो.
  • � मूल्य निश्चितीसा� ी मागील वर्षात नोंदविलेले खरेदी-विक्री व्यवहार, स्थानिक चौकशी मधून प्राप्त झालेला दर, वास्तू प्रदर्शनातील दर, भूसंपादन निवाडयातील दर इत्यादी स्वरुपाची माहिती विचारात घेतली जाते.

 • वार्षिक मूल्य दर तक्ते व मार्गदर्शक सूचना कु� े उपलब्ध आहेत?
   

  • � संपूर्ण महाराष्ट्राचे वार्षिक मूल्य दर तक्ते नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-ASR या � िकाणी आणि मार्गदर्शक सूचना Publications या सदराखाली ASR Guidelines या � िकाणी उपलब्ध आहेत.
  • � जिल्हानिहाय दरतक्ते संबंधित सह जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
  • � दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात त्यांचे कार्यक्षेत्रातील दर तक्ते उपलब्ध आहेत.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यांचे सर्वसाधारण स्वरुप काय ?
   

  • � वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये विविध प्रकारच्या जमिनी उदा.शेतजमीन, बिनशेती संभाव्यता असलेली जमीन, विकसनशील जमीन, बिनशेती जमीन इत्यादीचे व नवीन बांधीव इमारतीचे वापरनिहाय उदा. सदनिका, दुकाने, कार्यालय, औद्योगिक इ.करिता दर दिलेले असतात.
  • � जमिनीचा प्रकार, गुण-दोष (Merits & Demerits) विचारात घेऊन सविस्तर मूल्यांकनासा� ी त्यासोबत मार्गदर्शक सूचना देखील विहित केल्या जातात.

 • वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये क्षेत्राचे प्रकार आहेत का व ते कोणते ?
   

  • � वार्षिक मूल्य दर तक्त्याची विभागणी नागरी क्षेत्र, प्रभाव क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र अशा तीन प्रकारात केली जाते.
  • � नागरी व प्रभाव क्षेत्रासा� ी मूल्य विभाग (value zone) निहाय दर दिलेले असतात व ग्रामीण क्षेत्रातील मिळकतीसा� ी तालुका/ विभागनिहाय गावाचे दर दिलेले असतात.

 • नागरी क्षेत्र म्हणजे काय?
   

  महानगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायती/कॅन्टोनमेंट बोर्ड यांचे हद्दीमधील क्षेत्र म्हणजे नागरी क्षेत्र होय.
 • प्रभाव क्षेत्र म्हणजे काय?
   

  • महानगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायत/ कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या सभोवतालचे तसेच प्रादेशिक योजनेतील विकास केंद्र, विकासाचा कल मो� या प्रमाणावर असलेली गावे, विशेष महत्व असलेली गावे म्हणजे प्रभाव क्षेत्र होय.
  • प्रभावक्षेत्रात समावेश असणाऱ्या गावांची यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Activities या सदराखाली Valuation of Property या � िकाणी पाहता येईल.

 • ग्रामीण क्षेत्र म्हणजे काय?
   

  नागरी व प्रभाव क्षेत्राव्यतिरिक्तचे उर्वरित सर्व क्षेत्र म्हणजे ग्रामीण क्षेत्र होय.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यात प्रत्येक जमिनीसा� ी वेगवेगळे दर दिलेले असतात काय?
   

  वार्षिक मूल्य दर तक्त्यात प्रत्येक जमिनीसा� ी सिटी सर्व्हे नंबर/ सर्व्हे नंबर/गट नंबर निहाय वेगवेगळे दर न देता एकच मूल्य असलेल्या जमिनीचा त्यांच्या मूल्यानुसार एकाच गटात/ मूल्य विभागात (Value zone) समावेश केलेला असतो.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दरासा� ी जमिनीचे क्षेत्रफळ कसे विचारात घेतले जाते?
   

  सर्वसाधारणपणे वार्षिक मूल्य दर तक्त्यातील बिनशेती/ संभाव्य बिनशेती तसेच विकसनशील जमिनीसा� ीचे दर प्रती चौ.मी. क्षेत्रफळासा� ी, तर शेती व ना-विकास क्षेत्रातील जमीनीसा� ीचे दर हे प्रती हेक्टरी क्षेत्रफळासा� ी दिलेले असतात.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये बांधीव मिळकतीचे दर बांधकाम क्षेत्रानुसार (Built-up area) की चटई क्षेत्रानुसार (Carpet area) � रविले जातात?
   

  वार्षिक मूल्य दर तक्त्यात बांधीव मिळकतीचे दर बांधकाम क्षेत्रानुसार (Built-up area) दिलेले असतात. मूल्यांकनासा� ी कार्पेट क्षेत्रास 1.2 ने गुणाकार करुन येणारे क्षेत्र बांधकाम क्षेत्र म्हणून विचारात घेतले जाते.
 • वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील निव्वळ बांधकामाचे दर कशाच्या आधारे निश्चित केलेले असतात?
   

  वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील निव्वळ बांधकामाचे दर, राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी प्राप्त माहितीच्या आधारे विहीत केलेले असतात.
 • जमीनीचे क्षेत्रफळानुसार दरामध्ये फरक असतो काय?
   

  • � होय. मुंबई शहर व उपनगरांकरिता स्थूल जमिनीकरिताची (Bulk land) मार्गदर्शक सूचना क्र.17 नुसार व उर्वरित महाराष्ट्रासा� ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.16 नुसार स्थूल जमिनीचे क्षेत्रफळानुसार दर विचारात घेतला जातो.
  • � सदर जागा/ जमिनी सलग असणे आवश्यक आहे.
  • � मार्गदर्शक सूचनातील टप्प्यांनुसार येणाऱ्या मूल्याची बेरीज करुन मूल्यांकन केले जाते.

 • वार्षिक मूल्य दर तक्त्यातील बांधीव मिळकतीचे दर इमारतीचे वयानुसार घसारा (Depreciation) विचारात घेऊन दिले जातात काय?
   

  • वार्षिक मूल्य दर तक्त्यातील बांधीव मिळकतीचे दर हे नवीन बांधकामाचे असतात.
  • मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेली मार्गदर्शक सूचना क्र.4 व उर्वरित महाराष्ट्रासा ी असलेली मार्गदर्शक सूचना क्र.3 प्रमाणे जुन्या इमारतीचे वयोमानानुसार घसारा (Depreciation) धरुन मूल्य काढले जाते.

 • नागरी/ प्रभाव क्षेत्रामध्ये सर्व्हे नंबरनुसार मूल्य विभागाची माहिती मिळत नसल्यास काय करावे?
   

  नागरी/ प्रभाव क्षेत्रामध्ये सर्व्हे नंबरनुसार मूल्य विभागाची माहिती मिळत नसल्यास सदर मिळकतीचा सिटी सर्व्हे नंबर अथवा अंतिम भूखंड क्रमांकानुसार (नागरी क्षेत्रातील नगररचना योजनेच्या बाबतीत) शोध घ्यावा अथवा मूल्य विभागाचे वर्णनावरुन दराचा शोध घ्यावा.
 • नागरी / प्रभाव क्षेत्रातील सर्व्हे नंबर अथवा मूल्य विभागाचे वर्णनानुसारही एखाद्या मिळकतीचा दर आढळून येत नसल्यास काय करावे ?
   

  नागरी / प्रभाव क्षेत्रातील सिटी सर्व्हे नंबर/ सर्व्हे नंबर/ गट नंबर अथवा मूल्य विभागाचे वर्णनानुसारही एखाद्या मिळकतीचा दर आढळून येत नसल्यास मूल्य विभाग व मूल्य दर निश्चितीसा� ी मिळकतीचा 7/12 उतारा, झोन दाखला, गाव नकाशा, मोजणी नकाशा इ. सह संबंधीत नोंदणी अधिकाऱ्यामार्फत अथवा थेट संबंधित उपसंचालक/ सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • नागरी / प्रभाव क्षेत्रातील एखाद्या मिळकतीचा / जमीनीचा जमीन दर उपलब्ध आहे मात्र त्या जमीनीवरील इमारतीच्या विशिष्ट प्रयोजनाच्या वापराचा (उदा.रहिवास, वाणिज्य, औद्योगिक इ.) दर शून्य नमूद असल्या
   

  नागरी / प्रभाव क्षेत्रातील एखाद्या मिळकतीचा / जमिनीचा जमीन दर उपलब्ध आहे मात्र त्या जमिनीवरील इमारतीच्या विशिष्ट वापरासा� ी (उदा.रहिवास, वाणिज्य, औद्योगिक इ.) दर शून्य नमूद असल्यास मुंबई व उपनगरासा� ी असलेली मार्गदर्शक सूचना क्र.7 व उर्वरीत महाराष्ट्रासा� ी असलेली मार्गदर्शक सूचना क्र.6 विचारात घेवून दर निश्चित करण्यात यावा. त्याआधारेही दर समजून येत नसल्यास संबंधित उपसंचालक/ सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • नागरी/ प्रभाव क्षेत्रात मिळकत प्रकार/ वापराचे प्रयोजनानुसार वेगवेगळे दर असतात का?
   

  • � होय. नागरी/ प्रभाव क्षेत्रात मिळकत प्रकार/ वापराचे प्रयोजनानुसार वेगवेगळे दर असतात.
  • � वार्षिक मूल्य दर तक्त्यात नागरी क्षेत्रामध्ये जमिनीचा प्रत्यक्ष वापर जरी शेती असला तरीही विकसन क्षमतेप्रमाणे मंजूर विकास योजनेतील अनुज्ञेय भू-वापर (Permissible Land Use) उदा. रहिवास, नाविकास इ.विचारात घेऊन तर बांधीव मिळकतीचे दर त्या इमारतीमध्ये अनुज्ञेय वापरानुसार प्रस्तावित केले जातात.

 • नागरी/ प्रभाव क्षेत्रात मूल्य विभागातील (value zone) एखादी मिळकत रस्त्यास सन्मुख असून त्याचा अंतर्गत विस्तार जास्त असल्यास संपूर्ण क्षेत्रासा� ी तोच दर लागेल काय?
   

  • � नाही. एखादी मिळकत रस्त्यास सन्मुख असून, रस्त्यासा� ी असणाऱ्या मूल्य विभागात (value zone) समाविष्ट असल्यास व अंतर्गत विस्तार जास्त असल्यास 50मी. पेक्षा जास्त अंतराच्या पुढील क्षेत्रास मार्गदर्शक सूचना क्र.17 नुसार 30% वजावट दिली जाते.
  • � सदर वजावटीची सूचना मुंबई शहर व उपनगरांकरिता लागू नाही.
  • � सदर वजावट ही केवळ त्या त्या नागरी/ प्रभाव क्षेत्रातील मुख्य रस्त्यासा� ी स्वतंत्र मूल्य विभाग (Value zone) असल्यास त्या रस्त्याच्या मूल्य विभागातील जमिनीच्या मूल्यांकनासा� ी लागू आहे.
  • � सदर सूचना इतर मूल्य विभागातील (Value zone) रस्त्याचे अंतर्गत विस्तारीत/ इतर क्षेत्रासा� ी लागू नाही.
  • � सदर सूचना ग्रामीण क्षेत्रासा� ी लागू नाही.�
 • नागरी/ प्रभाव क्षेत्रात विकास योजनेतील आरक्षित जमिनीसा� ी स्वतंत्र दर असतो काय?
   

  • � नागरी क्षेत्रात विकास योजनेतील आरक्षित जमिनीसा� ी स्वतंत्र दर देण्यात येत नाहीत.
  • � मुंबई शहर व उपनगरांकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.22 व उर्वरित � िकाणी मार्गदर्शक सूचना क्र.30 नुसार आरक्षणाने बाधित जमिनीच्या दरामध्ये 20% वजावट अनुज्ञेय केली जाते.
 • नागरी/ प्रभाव क्षेत्रात बांधीव मिळकतीचे दर उद्वाहन (लिफ्ट) सुविधेनुसार कमी अथवा जास्त असतात काय?
   

  होय. मार्गदर्शक सूचना क्र.19 नुसार बांधीव मिळकतीचे दर उद्वाहन (लिफ्ट) सुविधेच्या उपलब्धतेप्रमाणे कमी अथवा जास्त विचारात घेतला जातो.
 • नागरी/ प्रभाव क्षेत्रामध्ये एखादा सिटी सर्व्हे नंबर/ सर्व्हे नंबर/गट नंबर एकापेक्षा जास्त मूल्य विभागात (value zone) असल्यास कोणता दर विचारात घेतला जातो?
   

  • � नागरी/ प्रभाव क्षेत्रामध्ये एखादा सिटी सर्व्हे नंबर/ सर्व्हे नंबर/गट नंबर जमिनीच्या स्थानानुसार / वैशिष्टयानुसार उदा. मुख्य रस्त्यास सन्मुखता, मो� ा गृहनिर्माण प्रकल्प, नाविकास विभाग इ. नुसार वेगवेगळ्या मूल्य विभागात समाविष्ट असल्यास त्यासंबंधी आवश्यक ते पुरावे विचारात घेऊन योग्य दर विचारात घेतला जातो.
  • � याबाबत शंका असल्यास संबंधित उपसंचालक/ सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन यांचेकडून निश्चित मूल्य विभागाची (Value zone) खातरतमा करुन घेणे आवश्यक आहे.

 • नागरी/ प्रभाव क्षेत्रात रस्त्यास सन्मुख असणाऱ्या जमिनीसा� ी स्वतंत्र मूल्य दर दिलेले असतात काय?
   

  होय. त्या त्या नागरी/ प्रभाव क्षेत्रामधील मुख्य रस्त्यास सन्मुख असणाऱ्या जमिनींसा� ी स्वतंत्र मूल्य दर दिले जातात.
 • नागरी/ प्रभाव क्षेत्रामध्ये एखाद्या जमीनीसा� ी प्रती चौरस मीटर व प्रती हेक्टर असे दोन दर दिले असल्यास कोणता दर विचारात घेतला जातो?
   

  उर्वरित महाराष्ट्रासा� ी असलेल्या मार्गदर्शक सूचना क्र.16(अ) नुसार, 2000 चौ.मी. पर्यंत प्रती चौ.मी. दराने व उर्वरित क्षेत्रा करिता प्रति हेक्टरी दराने येणारे मूल्य यांची बेरीज करुन एकूण मूल्य नि‍श्चित केले जाते.
 • प्रभाव क्षेत्रातील एखादी जमीन बिनशेती झालेली नसताना व प्रत्यक्ष शेती वापर असताना त्यासा� ी वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये बिनशेतीचा दर दिला असल्यास काय करावे?
   

  • � अशी परिस्थिती असल्यास 7/12 उतारा, प्रादेशिक योजनेचा झोन दाखला व इतर आवश्यक कागदपत्रांसह मूल्य दर व मूल्य विभागाची (Value zone) निश्चिती करणेसा� ी संबंधित सहायक संचालक, नगर रचना, मूल्यांकन यांचे कार्यालयाकडे अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
  • � या शिवाय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे कलम 31 अन्वये अभिनिर्णयांतर्गत (Adjudication) संबंधित सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज दाखल करुन मूल्य निश्चित करुन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

 • ग्रामीण क्षेत्रात एखाद्या जमिनीचे काही क्षेत्र बागायत आहे व काही क्षेत्र जिरायत आहे तर कोणता दर विचारात घ्यावा?
   

  मार्गदर्शक सूचना क्र.20 नुसार एखाद्या जमिनीचे काही क्षेत्र बागायत व काही क्षेत्र जिरायत असल्यास मागील 3 वर्षांचे 7/12 उतारे व त्यावरील पिकपाण्याची नोंद पाहून व त्यानुसार जमिनीचा प्रकार � रवून सदर सूचनेतील (ब) व (क) येथील सूचना विचारात घेऊन मूल्यांकन करता येते.
 • ग्रामीण क्षेत्रात एखादी जमीन डोंगरपड असल्यास व त्यासा� ी जिरायत जमीनीचा दर दिला असल्यास कोणता दर विचारात घेतला जातो?
   

  • � ग्रामीण क्षेत्रामध्ये डोंगरपड जमिनीचे मूल्यांकन जिरायत जमीन दराच्या 75% दराने केले जाते.
  • � नागरी व प्रभाव क्षेत्रात डोंगरपड जमिनीचे मूल्यांकन संबंधित मूल्य विभागातील (Value zone) दरानेच (100%) केले जाते.
 • मुद्रांक शुल्क आकारणेकामी वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दर मान्य नसल्यास काय करावे?
   

  • � मुद्रांक शुल्क आकारणेकामी वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दर मान्य नसल्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे कलम 31 अन्वये अभिनिर्णयांतर्गत (Adjudication) मूल्यांकन करुन मिळणेसा� ी संबंधित अर्जदारास आवश्यक पुराव्याचे कागदपत्रांसह खालील अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करुन आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे.
   1) मुंबई शहर व उपनगरे – संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी
   2) उर्वरित � िकाणी – संबंधित सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
  • � सविस्तर माहितीसा� ी पहा भाग 3 : मुद्रांक� शुल्क
 • अभिनिर्णयांतर्गत (Adjudication) मूल्यांकन प्रकरणी कोणता आधार घेतला जातो?
   

  अभिनिर्णयांतर्गत (Adjudication) मूल्य निश्चित करताना जमिनीचे स्थानपरत्वे गुण (Merits) जसे की, मुख्य रस्त्यास सन्मुख आहे, सदर जमिनीजवळ बगीचा आहे, समुद्र किनारा आहे इ. व दोष (Demerits) जसे की, जमिनीतून नाला जात आहे, उच्च दाब विद्युत वाहिनी जात आहे, नजीकच्या अंतरावर स्मशान/ दफनभूमी आहे, मिळकत सीआरझेड ने बाधीत आहे, बांधकाम योग्य नाही इ. मुद्दे विचारात घेतले जातात. संबंधित अर्जदारास संबंधित कागदोपत्री पुराव्यांसह आपली बाजू मांडता येते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]