मुद्रांक शुल्काचा परतावा

 • कोणत्या प्रकरणात मुद्रांक शुल्क परतावा (Refund) मिळू शकतो?
   

  खालील प्रकरणात मुद्रांक शुल्क परतावा (Refund) मिळू शकतो.

  अ) कोणत्याही व्यक्तीने सही करण्यापूर्वी मुद्रांक अनावधानाने, अहेतुकपणे किंवा लिखाणातील चुकांमुळे नियोजित प्रयोजनासा ी सदर मुद्रांक अयोग्य झाला असल्यास (rendered unfit );

  ब) पूर्णतः किंवा अंशतः लिहिलेला परंतु स्वाक्षरी न केलेला मुद्रांक;

  क) कोणत्याही पक्षकाराने स्वाक्षरी करुन दिलेला दस्त जो,

  • सुरवातीपासून कायद्याने सर्वथा अवैध (void ab initio) असल्याचे पक्षकारास नंतर आढळून आले असेल;
  • Specific Relief Act च्या कलम 31 खाली सुरवातीपासून सर्वथा अवैध (void ab initio) असल्याचे न्यायालयाला नंतर आढळून आले असेल;
  • कोणत्याही त्रुटीमुळे किंवा चुकीमुळे सदर मुद्रांक वापरणेस अपात्र असल्याचे आढळून आले असेल;
  • दस्तातील ज्या व्यक्तीने सही करणे आवश्यक आहे अशी व्यक्ती दस्तावर स्वाक्षरी न करताच मरण पावली असेल किंवा दस्तावर स्वाक्षरी करणेस नकार दिल्यामुळे निश्चित केलेला व्यवहार पूर्ण करता येत नसेल;
  • दस्तातील एखाद्या पक्षकाराने दस्तावर सही न केल्यामुळे , सही करण्यास असमर्थ असल्यास किंवा सही करण्यास नकार दिल्याने नियोजित प्रयोजन पूर्ण होत नसल्यास;
  • दस्तातील कोणत्याही व्यक्तीने कृती करण्यास किंवा पैसा देण्यास नकार दिल्याने किंवा त्याचा स्विकार न केल्याने दस्तात नमूद प्रयोजन फसले असेल;
  • जो व्यवहार करण्याचे निश्चित केले असेल, असा व्यवहार त्याच पक्षकाराच्या दरम्यान झालेल्या व त्यापेक्षा कमी मुद्रांक लावलेला नाही, अशा अन्य दस्ताद्वारे व्यवहार केला असेल;
  • अपु-या मूल्याचा असेल आणि त्याद्वारे जो व्यवहार घडवून आणण्याचे योजिले असेल, तो व्यवहार त्याच पक्षकाराच्या दरम्यान झालेल्या व त्यापेक्षा कमी मूल्य नसलेला एखादा मुद्रांक लावलेल्या कोणत्याही अन्य संलेखाद्वारे घडवून आणल्यामुळे निरुपयोगी होत असेल;
  • तो अनावधानाने आणि अहेतुकपणे खराब झाला असेल, आणि त्याऐवजी त्याच पक्षकारांच्या दरम्यान त्याच प्रयोजनासा ी दुसरा संलेख निष्पादित केलेला असेल
 • मुद्रांक शुल्क परतावा अर्ज कोणी करावा?
   

  मुद्रांक खरेदीसा ीची रक्कम ज्या व्यक्ती/संस्था/कंपनी नांवे भरणा केली आहे, अशी व्यक्ती/ संस्था/कंपनी किंवा त्यांनी कायदेशीररीत्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीनेच मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासा ी अर्ज करावा.

 • मुद्राक शुल्क परतावा अर्ज को े करावा ?
   

  • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Activities या सदराखाली Stamp Duty Refund या िकाणी Refund Application या सुविधेचा वापर करुन मुद्रांक शुल्क परताव्याबाबतची माहिती प्रथम ऑनलाईन सादर करावी.
  • सदर Online माहिती सादर केल्यावर मुद्रांक जेथून खरेदी केले आहेत, त्या कार्यक्षेत्रासा ी नेमलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी (Collector of Stamps) यांचेकडे आवश्यक कागदपत्रांसह व ऑनलाईन माहिती सादर केल्यानंतर प्राप्त झालेल्या टोकनसह विहित मुदतीत व नमुन्यात अर्ज प्रत्यक्ष सादर करावा.
 • मुद्रांक शुल्क परतावा अर्जासोबत कोणती कागदपत्रं सादर करावीत?
   

  अ) परतावा अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावीत.-

  • ऑनलाईन माहिती भरल्याचे टोकन
  • मूळ मुद्रांकासह दस्तऐवज
  • हस्ते (मार्फत) मुद्रांक खरेदी केला असल्यास अशा व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र
  • प्राधिकृत व्यक्ती (authorised person) परतावा अर्ज करत असल्यास अधिकारपत्र (authority letter) अथवा मुखत्यारपत्राची प्रमाणित प्रत
  • नोंदणीकृत करारावरील मुद्रांक शुल्काचा परतावा असल्यास मूळ नोंदणीकृत करार व नोंदणीकृत रद्दपत्र

  ब) या व्यतिरिक्त मुद्रांक भरणा केल्याच्या पध्दतीनुसार खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर
  करावीत-

  1. ई-एसबीटीआर/साधी पावती/ई-चलनाद्वारे ई-पेंमेंट केले असल्यास मुद्रांक शुल्क भरणा केल्याचे चलन
  2. फ्रँकींगद्वारे मुद्रांक खरेदी केले असतील तर-
  • फ्रँकीग मुद्रांक विक्रेत्याने एकत्रित मुद्रांक शुल्क शासनास जमा केल्याचे चलन
  • मुद्रांक विक्री प्रमाणपत्र / मुद्रांक विक्री नोंदवहीचा उतारा;
  • मुद्रांक शुल्क फ्रँकींगद्वारे भरले असल्यास वर नमूद केलेल्या संबंधित फ्रँकींग विक्रेत्याकडून हायपरलिंक टर्मिनल रिपोर्ट;
  • संबंधित फ्रँकिंग विक्रेत्याकडून रिबीन कार्ट्रेजमधील संबंधित शाची साक्षांकित छायाप्रत; किंवा वरीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची पूर्तता होत नसल्यास पिटनी बाऊज कंपनीचे(फ्रँकीग मशीन उत्पादक कंपनी) मूळ मुद्रांक शाच्या शेजारी मुद्रांकाचे खरेपणाबाबतचे प्रमाणपत्र.

  3) कोषागारातून किंवा मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांक कागद खरेदी केले असतील, तर-

  1) मुद्रांक जर कोषागार/उपकोषागारातून खरेदी केला असेल तर कोषागार/उपकोषागाराचे प्रमाणपत्र
  2) मुद्रांक विक्रेत्याचे प्रमाणपत्र व मुद्रांक विक्री नोंदवहीची प्रत/उतारा


  4) जुलै 2013 पूर्वी विक्री झालेल्या ई-स्टँम्प बाबत -

  1) स्टॉक होल्डींग कार्पेारेशन ऑफ इंडिया लि. (SHCIL) कडील एकत्रित मुद्रांक शुल्क
  शासनाला जमा केल्याचे चलन
  2)मुद्रांक विक्री प्रमाणपत्र व विक्री नोंदवहीचा उतारा.

  क) अभिनिर्णय प्रकरणात भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासा ी -
  'अ' मध्ये नमूद कागदपत्राखेरीज कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

 • मुद्रांक शुल्क परतावा अर्ज मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दाखल करण्यासा ी किती मुदत आहे?
   

  मुद्रांक शुल्क परतावा अर्ज मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दाखल करण्यासा ी़, परतावा प्रकरणांच्या प्रकारानुसार मुदत पुढीलप्रमाणे –

  अ.क्र. मुद्रांक परतावा प्रकरणांचा प्रकार अर्ज करण्याची मुदत
  1 कलम 48 (1) अन्वये, दस्त निष्पादीत केलेल्या प्रकरणांत निष्पादन केल्यापासून सहा महिन्याचे आत.
  2 कलम 48 (1) चे परतुंकानुसार करार रद्द करुन परतावा मागणी करणे नोंदणीकृत रद्दलेखाच्या दिनांका पासून दोन वर्षाचे आत
  3 बदली दस्त केलेल्या प्रकरणाबाबत बदली दस्त निष्पादीत केल्याचे दिनांकापासून सहा महिन्याचे आंत
  4 इतर प्रकरणी मुद्रांक खरेदीच्या दिनांकापासून सहा महिन्याचे आत

 • चुकीच्या वर्णनाचा किंवा जादा भरणा केलेल्या किंवा मुद्रांक शुल्क माफ असलेल्या दस्तऐवजास भरलेल्या मुद्रांकाचा परतावा मिळू शकतो काय?
   

  होय. कलम 50 प्रमाणे अशा प्रकरणांमध्ये खालील कारणास्तव परतावा अनुज्ञेय आहे.

  1. अधिनियमात विहित केले असेल, त्याहून अन्य वर्णनाचा मुद्रांक अनावधानाने वापरला असेल, (उदा.- न्यायिकेत्तर ऐवजी न्यायिक)
  2. आवश्यकतेपेक्षा अधिक रक्कमेचे मुद्रांक अनावधानाने वापरले असतील,
  3. मुद्रांक शुल्क आकारण्यास पात्र नसलेल्या दस्तास अनावधानाने मुद्रांकांचा वापर केला असेल.
 • मुद्रांक शुल्क परताव्याच्या मागणीबाबत निर्णय घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी कोणत्या बाबींची पडताळणी करतात?
   

  मुद्रांक शुल्क परताव्याच्या मागणीबाबत निर्णय घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी खालील बाबींची पडताळणी करतात, -

  1. अर्जासोबत परतावा विषयक ऑनलाईन माहिती सादर केल्याचे टोकन आहे काय?
  2. परतावा मागणी केलेले मूळ मुद्रांक रद्द करणेसा ी, मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे अर्जासोबत दाखल केले आहेत काय?
  3. अर्जदाराने असे मुद्रांक कोणत्या उद्देशाने विकत घेतले होते?
  4. अर्जदारांनेच मुद्रांकांची पूर्ण रक्कम भरली आहे काय?
  5. असे मुद्रांक, मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे विहित मुदतीत दाखल केले आहेत काय?
  6. सदरहू मुद्रांकाचा/मुद्रांकीत दस्ताचा अन्यत्र वापर झालेला नसावा?
  7. मुद्रांक परताव्यासा ी दिलेले कारण सयुक्तीक आहे काय?
 • मुद्रांक शुल्क परतावा मंजुरीचे अधिकार कोणाला आहेत ?
   

  मुद्रांक शुल्क परताव्यासा ी अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिका-याकडेच करणे आवश्यक आहे. मुद्रांक शुल्क परतावा प्रकरणामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार मुद्रांकाच्या रकमेवर अवलंबून असून ते पुढील प्रमाणे,-

  अ.क्र. मुद्रांकाची रक्कम निर्णय घेण्याचे अधिकार
  1 रु.1 लाखापर्यंत सर्व जिल्हयात सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी तथापि मुंबई शहर व उपनगर जिल्हयात मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई/अंधेरी/ कुर्ला/बोरीवली
  2 रु.1 लाखापेक्षा जास्त ते 10 लाखापर्यंत मुंबई विभागात अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई व इतर विभागात नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक
  3 रु.10 लाखापेक्षा जास्त नोदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी.
 • मुद्रांक खरेदी केल्यापासून किती कालावधीत त्याचा वापर करणे आवश्यक आहे?
   

  मुद्रांक खरेदी केल्यापासून ‘सहा महिन्याच्या आत वापर करणे’ म्हणजे, ज्या दस्तासा ी मुद्रांक खरेदी केले आहेत, त्या दस्तऐवजावर सहा महिन्याच्या आत स्वाक्षरी करणे व दिनांक टाकणे.

 • मुद्रांक शुल्काचा परतावा नाकारता येतो का? असल्यास त्याची कारणे कोणती?
   

  होय, मुद्रांक शुल्काचा परतावा खालील कारणांस्तव नाकारला जाऊ शकतो.

  1. कलम 47 (अ), (ब) किंवा (क) मधील परतावा मागणीच्या कारणांची पूर्तता होत नसल्यास
  2. ज्या व्यक्तीच्या/संस्थेच्या/ कंपनीच्या नांवाने मुद्रांक शुल्क भरले आहे, अशा व्यक्तीने/संस्थेने/कंपनीने किंवा त्यांनी अधिकार दिलेल्या व्यक्तीने परतावा अर्ज न करता त्रयस्थ व्यक्तीने परतावा अर्ज केल्यास;
  3. अर्ज विहीत मुदतीत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केलेला नसल्यास
  4. परतावा मिळणेकरीता केलेल्या अर्जासोबत मूळ मुद्रांक सादर केलेला नसल्यास
  5. परतावा प्रकरणासोबत पुराव्या दाखल कागदपत्रे सादर न केल्यास अथवा सादर केलेली कागदपत्रे पुरेशी व समर्थनीय नसल्याचे दिसून आल्यास;
  6. स्थावर मालमत्तेचे नोंदणीकृत विक्री कराराचे मुद्रांक शुल्काचा परतावा नोंदणीकृत रद्दलेखाशिवाय मागणी केल्यास
  7. स्थावर मालमत्तेच्या कराराशिवाय (Agreement for sale) इतर कोणत्याही दस्ताची नोंदणी झाली असेल तर व्यवहार पूर्ण झाल्याचे मानन्यात येऊन मुद्रांक शुल्काचा परतावा अनुज्ञेय राहत नाही.
 • मुद्रांक परतावा देताना वजावट करण्यात येते काय? असल्यास किती?
   

  • ई-पेमेंन्ट (साधी पावती/ई-चलन व ई-एसबीटीआर) द्वारे खरेदी केलेल्या मुद्रांकाबाबत कमीत कमी रु.200/- किंवा भरणा रकमेच्या 1 टक्का, मात्र जास्तीत जास्त रुपये 1000/- इतकी वजावट करण्यात येते.
  • इतर पध्दतीने (मुद्रांक कागद, फ्रँकींग, इ.) भरणा केलेल्या मुद्रांकाच्या एकूण रक्कमेच्या 10% रक्कम वजावट करण्यात येते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]