शिक्षा व दंडाच्या तरतूदी

 • कोणत्याही व्यक्तीने मुद्रांक शुल्क चुकविण्याच्या उद्देशाने दस्तऐवज योग्य मुद्रांकित न करता सही करुन दिला असेल तर त्याचे परिणाम काय आहेत?
   

  एखाद्या व्यक्तीने मुद्रांक शुल्क चुकविण्याच्या उद्देशाने दस्तऐवज योग्य मुद्रांकित न करता सही करुन दिला असेल याबाबतचा अपराध सिध्द झाल्यास संबंधिताला एक महिन्यापेक्षा कमी नसेल, परंतु सहा महिन्यापर्यंत वाढवता येईल, एवढया कालावधीचा कारावास किंवा रु.5000/- पर्यंत दंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

 • मुद्रांक अधिनियमानुसार अन्य काही अपराध आहेत का?
   

  होय. मुद्रांक अधिनियमानुसार अन्य अपराध खालीलप्रमाणे –
  अ) मुद्रांक शुल्कापोटी घेतलेली रक्कम शासनास जमा न केल्यास –
  कोणीही कोणाकडूनही मुद्रांक शुल्कापोटी वसूल केलेली रक्कम शासनास जमा न
  केल्यास एक महिन्यापेक्षा कमी नसेल, परंतु सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल, एवढया
  कालावधीचा कारावास किंवा रु.5000/- पर्यंत दंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

  ब) चिकट मुद्रांक रद्द न केल्यास
  चिकट मुद्रांकाचा वापर करणा-या व्यक्तीने जाणीवपूर्वक चिकट मुद्रांक रद्द न
  केल्यास रुपये 100/- पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
  क) मुद्रांक विक्री नियमांचा भंग झाल्यास-
  मुद्रांक विक्रेत्याने मुद्रांक विक्री नियमांचा भंग केल्यास रितसर परवाना न घेता मुद्रांक विक्री केल्यास एक महिन्यापेक्षा कमी नसेल,
  परंतु सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल एवढया कालावधीचा कारावास किंवा रु.5000/- पर्यंत
  दंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]