अभिनिर्णय

 • मुद्रांक शुल्क निश्चितीबाबत अडचण वाटत असेल, तर मुद्रांक शुल्क � रवून मिळते काय?
   

  मुद्रांक शुल्क निश्चितीबाबत अडचण वाटत असेल, तर मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दस्तऐवजासह अर्ज केल्यास मुद्रांक शुल्क � रवून मिळते.

 • मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय को� े असते?
   

  प्रत्येक जिल्हयाचे � िकाणी सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालय असते. सह जिल्हा निबंधक हेच मुद्रांक जिल्हाधिकारी असतात, त्यामुळे सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालयच मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय असते.
  तथापि नवनिर्मित जिल्हयांमध्ये सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी या पदाचे कामकाज पुढील तक्त्यात दर्शविलेल्या अधिकां-याकडून हाताळले जाते.

  अ.क्र. नवनिर्मित जिल्हयाचे नाव अधिकारी
  1 नंदुरबार सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, धुळे
  2 गोंदिया सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, भंडारा
  3 वाशिम सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, अकोला
  4 हिंगोली सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, परभणी

  सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालयांची यादी भाग 1 मध्ये दिलेली आहे.

  मात्र मुंबई जिल्ह्यासा� ी मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुक्यांसा� ी अंधेरी, बोरीवली, कुर्ला अशी स्वतंत्र मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये आहेत.

 • मुद्रांक शुल्क अभिनिर्णयासा� ी किती फी असते?
   

  मुद्रांक शुल्क अभिनिर्णयासा� ी प्रति प्रकरण फी रुपये 100/- आहे.

 • अभिनिर्णय अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात?
   

  अभिनिर्णय अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात,-

  1. � मुद्रांक शुल्क आकारणीस कारणीभूत असणा-या सर्व बाबी नमूद असलेला परिपूर्ण दस्तऐवज.
  2. अभिनिर्णय फी भरण्याचे चलन किंवा पावती.
  3. � मुद्रांक शुल्कावर परिणाम करणा-या मिळकती संदर्भात दस्तामध्ये वर्णन
  4. केलेल्या सोयी-सुविधा इत्यादीविषयी कागदोपत्री पुरावे.
  5. अभिनिर्णय अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांशिवाय मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकरणपरत्वे मुद्रांक शुल्कावर परिणाम करणारी आणखी कागदपत्रे जसे की जुने दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र, नकाशे अशी अन्य कागदपत्रे मागू शकतात.
 • मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर, अभिनिर्णयाची प्रक्रीया कशी असते?
   

  अ) सर्व कागदपत्रे दिल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी 45 दिवसांत अभिनिर्णयाबाबतचा स्वंयस्पष्ट निर्णय लेखी स्वरुपात देतात.

  ब) अभिनिर्णयासा� ी सादर केलेला दस्तऐवज हा निष्पादीत केलेला नसेल अथवा निष्पादनापासून 1 महिन्याचे आंत अभिनिर्णयासा� ी सादर केला असेल आणि अभिनिर्णयांतर्गत � रलेले मुद्रांक शुल्क भरण्याची तयारी असेल तर, मुद्रांक जिल्हाधिकारी मुद्रांक शुल्काची रक्कम भरुन घेतात आणि दस्तऐवज योग्य मुद्रांकित असल्याचे प्रमाणपत्र देतात.
  क) निष्पादनापासून 1 महिन्यानंतर अभिनिर्णयासा� ी दाखल केलेल्या दस्तऐवजांबाबत पक्षकाराने अभिनिर्णयाप्रमाणे मुद्रांक शुल्क व दंड भरण्याची तयारी दर्शविल्यास सदर मुद्रांक शुल्क व दंड रक्कम भरल्यानंतर दस्तऐवज योग्य मुद्रांकीत करुन देतात.

 • मुद्रांक जिल्हाधिकारी यांचा अभिनिर्णय प्रकरणातील निर्णय मान्य नसल्यास काय करावे?
   

  मुद्रांक जिल्हाधिकारी यांचा अभिनिर्णयाबाबतचा निर्णय मान्य नसल्यास-

  अ) हरकत बाजार मूल्याविषयी असल्यास,-

  • अादेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सा� (60) दिवसांचे आत खालील प्राधिका-यांकडे अपिल करता येईल-
  अ.क्र. विभाग सक्षम प्राधिकारी
  1 मुंबई शहर व
  मुंबई उपनगर जिल्हा
  अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई
  2 उर्वरित सर्व जिल्हे संबंधित विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक

  • अपिलामध्ये सुनावणीची संधी देऊन व वेळप्रसंगी स्थळपाहणी करुन लेखी निकाल दिला जातो.
  • यासा� ी रुपये 300/- इतकी अपील फी भरावी लागते.
   ब) हरकत दस्तऐवजाचे स्वरुप (Nature of Document) निश्चिती बाबत असल्यास,-
  • अादेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सा� (60) दिवसांचे आत मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांचेकडे अपील करता येते.
  • यासा� ी रु.300/- इतकी अपील फी भरावी लागते.
  • अपिलामध्ये सुनावणीची संधी देऊन व प्रकरणाची योग्य शहानिशा करुन मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी लेखी निर्णय देतात.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]