विशिष्ट प्रसंगी मुद्रांक शुल्क अाकारणीची पध्दत

 • एखादा खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासा� ी दोन-तीन दस्तऐवज करावे लागतात. अशा प्रकरणामध्ये कोणत्या पध्दतीने मुद्रांक शुल्क आकारले जाते?
   

  • खरेदी, गहाण, व्यवस्था किंवा विकसनाचा व्यवहार पूर्ण करण्यासा� ी एकापेक्षा अधिक दस्तऐवजांची गरज लागू शकते. अशा वेळी पुन्हा पुन्हा संपूर्ण मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही.
  • एकूण होणा-या दस्तऐवजांपैकी, मुख्य दस्तऐवजाला जास्तीत जास्त देय मुद्रांक शुल्क भरल्यास इतर सर्व उप दस्तऐवजांना कलम 4 प्रमाणे नाममात्र रु.100/- इतकेच मुद्रांक शुल्क द्यावे लागते.
  • मात्र उप दस्ताने मुख्य दस्तऐवजाचे मागील हेतुचे स्वरुपात बदल किंवा फेरफार होत असल्यास संबंधित बदल / दस्तातील फेरफाराचे स्वरुप विचारात घेऊन मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते.
 • एकाच दस्तऐवजात अनेक व्यवहार पूर्ण होत असतील, तर अशा दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कसे आकारले जाते?
   

  एकाच दस्तऐवजाने अनेक व्यवहार पूर्ण होत असतील, अशा दस्तऐवजास प्रत्येक व्यवहारासा� ी स्वतंत्र दस्तऐवज झाला असता, तर त्यासा� ी जितके मुद्रांक शुल्क द्यावे लागले असते, तितके एकत्रित मुद्रांक शुल्क आकारले जाते.

  उदाः- समजा ‘अ’ व्यक्तीची एक मिळकत आहे. आणि ‘ब’ व्यक्तीची एक मिळकत आहे. ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांनी एकाच कुलमुखत्यारपत्राचे दस्तऐवजाद्वारे ‘क’ व्यक्तीला त्यांचे वैयक्तिक मिळकतीचे व्यवहार करण्यासंबंधात कुलमुखत्यार नेमले, तर या दस्ताच्या बाबतीत ‘अ’ ने ‘क’ ची कुलमुखत्यार म्हणून केलेली नेमणूक हा एक स्वतंत्र दस्तऐवज धरला जाईल. तसेच ‘ब’ ने ‘क’ ची कुलमुखत्यार म्हणून केलेली नेमणूक हा देखील स्वतंत्र दस्तऐवज धरला जाईल. अशा पध्दतीने या प्रकरणात जरी कुलमुखत्यारपत्राचा एकच दस्तऐवज झाला असला तरी, त्यास दोन कुलमुखत्यारपत्रांसा� ी देय होणा-या मुद्रांक शुल्क रकमेइतकी, मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाईल. (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम-5)

 • एक दस्तऐवज दोन प्रकारात मोडत असेल, उदा. विकसन करार तथा विक्री करार, तर या दस्तऐवजांचे बाबतीत दोन्ही प्रकारचे करारासा� ी मुद्रांक शुल्क द्यावे लागेल का?
   

  नाही. अशा परिस्थितीत, दोन्ही करारांपैकी ज्या करारास अधिक मुद्रांक शुल्क देय आहे, त्या करारावर अनुज्ञेय मुद्रांक शुल्क भरावे लागते. या व्यतिरिक्त दुस-या प्रकाराच्या करारासा� ी पुन्हा मुद्रांक शुल्क देण्याची आवश्यकता नाही. (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम-6)

 • ज्यावर दस्ताचे मुद्रांक शुल्क अवलंबून असेल अशी दस्तातील रक्कम परकीय चलनात नमूद असेल, तर मुद्रांक शुल्क कसे निश्चित करावे?
   

  ज्यावर दस्ताचे मुद्रांक शुल्क अवलंबून आहे, अशी दस्तऐवजातील रक्कम परकीय चलनात नमूद असेल, तर केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दस्त निष्पादित करावयाच्या दिवसाच्या विनिमय दराच्या (Exchange Rate) आधारे सदर रकमेचे भारतीय रुपयांमध्ये मूल्य निश्चित करुन, त्यानुसार आवश्यक ते मुद्रांक शुल्क निश्चित करावे. (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम-20)

 • ज्यावर दस्ताचे मुद्रांक शुल्क अवंलबून आहे, अशी दस्तऐवजातील रक्कम शेअर्स अथवा विक्रेय रोख्याचे (Marketable Securities) स्वरुपात नमूद असल्यास त्यावर मुद्रांक शुल्क कसे निश्चित करावे?
   

  ज्यावर दस्ताचे मुद्रांक शुल्क अवलंबून आहे, अशी रक्कम शेअर्स अथवा विक्रेय रोख्याचे (Marketable Securities) स्वरुपात नमूद असेल, तर दस्तऐवजाचे निष्पादनाचे दिवशीचे त्या शेअर्स अथवा विक्रेय रोख्याचे बाजारभावाप्रमाणे अथवा सरासरी मूल्य विचारात घेऊन त्यावर मुद्रांक शुल्क निश्चित करावे.

 • खरेदीखतामध्ये मिळकत खरेदी घेणार हे खरेदी देणा-याला मोबदला म्हणून काही रक्कम देतात, तसेच खरेदी देणा-यावर असलेले कर्ज फेडण्याचे मान्य करतात. अशा वेळी मोबदला रक्कम कशी � रविली जाते ?
   

  • अशा प्रकरणात खरेदी देणा-यास दिलेली रोख रक्कम व कर्जाच्या परतफेडीसा� ी देणार असलेली रक्कम यांची बेरीज करुन त्यास एकूण मोबदला समजले जाते. त्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते.
  • तसेच ज्या प्रकरणांत खरेदी घेणारा नजराण्याची रक्कम भरणार असेल, ती रक्कम व खरेदी देणा-यास दिलेली रोख रक्कम यांची बेरीज करुन त्यास मोबदला समजले जाते� (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम-25)
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]