वास्तव (खरे) बाजार मूल्य

 • वास्तव (खरे) बाजार मूल्य (True Market Value) म्हणजे काय?
   

  वास्तव (खरे) बाजार मूल्य (True Market Value) याचा अर्थ असा आहे की, दस्तातील विषयवस्तू (दस्तात नमूद असलेली) मिळकत खुल्या बाजारात विक्रीसा� ी काढली असता येणारी किंमत अथवा दस्तऐवजात दर्शविलेला मोबदला, यापैकी जी जास्त असेल ती रक्कम�

 • मुद्रांक शुल्क आकारताना, कोणत्या दस्तऐवजांचे बाबतीत मिळकतीचे वास्तव (खरे) बाजार मूल्य विचारात घेतले जाते?
   

  महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार खालील प्रकारच्या दस्तऐवजांच्या बाबतीत मुद्रांक शुल्क आकारताना मिळकतीचे वास्तव (खरे) बाजार मूल्य विचारात घेतले जाते.�

  1. � विक्री करार (Agreement to Sale)
  2. खरेदीखत / अभिहस्तांतरण (Conveyance)
  3. � अदलाबदल (Exchange)
  4. � विक्री प्रमाणपत्र (Certificate of Sale)
  5. � बक्षिसपत्र (Gift Deed)
  6. वाटपपत्र (Partition Deed)
  7. � मोबदला घेऊन दिलेले मुखत्यारपत्र (Power of Attorney when given for consideration)
  8. मोबदला न घेता ति-हाईत इसमास मिळकतीची विक्री करण्यासा� ी दिलेले कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney given to third person without consideration)
  9. व्यवस्थापत्र (Settlement Deed)
  10. भाडेपट्टा (Lease Deed)
  11. भाडेकरु हक्कांचे तबदीलपत्र (Assignment of Leasehold Rights)
  12. वडिलोपार्जितखेरीज इतर मिळकतीचे हक्कसोडपत्र (Release of property other than Ancestral Property)
  13. विकसन करार (Development Agreement)
  14. भागीदारीमध्ये भागभांडवलाचे स्वरुपात स्थावर मालमत्ता आणल्याबाबत किंवा भागीदारीमधून स्थावर मालमत्ता काढून ज्या व्यक्तीने मालमत्ता आणली त्या व्यक्तीच्या खेरीज इतर व्यक्तीस दिलेबाबतचे भागीदारी पत्र (Partnership Deed whereby immovable property is brought in as capital or withdrawn from capital and given to any other person other than who has brought in the property)
 • वास्तव (खरे) बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क भरणे का आवश्यक आहे?
   

  वास्तव (खरे) बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क खालील कारणास्तव भरणे आवश्यक आहे,

  1. � दस्तऐवजांचे स्वरुप आणि आवश्यक तिथे मिळकतीचे वास्तव (खरे) बाजार मूल्य विचारात घेऊन देय मुद्रांक शुल्क भरले नसल्यास दस्तऐवज योग्य मुद्रांकीत नाही (not duly stamped) असे मानले जाते.
  2. मुद्रांक शुल्क न भरलेला अथवा कमी मुद्रांक शुल्क भरलेला दस्तऐवज हा त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही.
  3. � आवश्यक असूनही मुद्रांक शुल्क वेळेवर भरले नाही अथवा कमी भरले तर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते.
 • दस्तऐवजामध्ये नमूद मिळकतीचे बाजार मूल्य कमी आहे, असे निर्दशनास आल्यास कोणते अधिकारी त्या संबंधात कार्यवाही करु शकतात? अशा कार्यवाहीचे स्वरुप काय असते?
   

  दस्तऐवजामध्ये नमूद मिळकतीचे बाजार मूल्य कमी असल्यास, दस्तऐवजाची नोंदणी पूर्ण होऊ शकत नाही.

  • नोंदणी अधिनियम, 1908 अन्वये नेमलेले नोंदणी अधिकारी त्यांचे समोर प्राप्त झालेल्या दस्तऐवजातील मिळकतीचे बाजार मूल्याविषयी शंका आल्यास नोंदणी अधिकारी असा दस्तऐवज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सदर दस्तातील मिळकतीतील बाजार मूल्य निश्चितीसा� ी पा� वू शकतात, अशा प्राप्त झालेल्या दस्तऐवजातील मिळकतीचे बाजार मूल्य निश्चितीबाबतची कार्यवाही संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी करतात;
  • मुद्रांक जिल्हाधिकारी�
  •  मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी असणा-या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देतात;
    आवश्यकतेनुसार मिळकतीची पाहणी करतात;
    परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन बाजार मूल्याविषयी निर्णय घेतात;
    कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची, दंडाची व नोंदणी फीची वसुली करतात; आणि
    बाजारभावाप्रमाणे देय मुद्रांक शुल्क, दंड व नोंदणी फी न भरल्यास मिळकतीचे जप्तीची कार्यवाही करु शकतात.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]