मुद्रांक शुल्क भरणा

 • मुद्रांक शुल्क कसे भरता येईल?
   

  मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रमुख पध्दती खालीलप्रमाणे आहेत-

  1. ई-पेमेंट
  2. परंपरागत मुद्रांक कागद (Stamp Paper ) व चिकट मुद्रांक (Adhesive Stamps)
  3. फ्रँकीग

 • मुद्रांक शुल्क भरण्यासा ी तपशिलवार माहिती मिळू शकेल का?
   

  मुद्रांक शुल्क भरण्यासा ी तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे-

  अ.क्र. मुद्रांक प्रकार िकाण मुद्रांक शुल्क भरण्याची मर्यादा
  1 ई-पेमेंन्ट
  साधी पावती/
  ई-चलन
  अ) महाराष्ट्र शासनाचे ग्रास (GRAS) प्रणाली मध्ये सहभागी बँकेत आपले नेटबँकींग खाते असल्यास, घरबसल्या इंटरनेट बँकींग सुविधेच्या माध्यमातून.

  ब) महाराष्ट्र शासनाने ग्रास(GRAS)
  प्रणालीत सहभागी प्राधिकृत केलेल्या बँकांचे काऊंटरवरुन( वरील 'अ' व 'ब' मधील सहभागी बँकांची यादी www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Bank या िकाणी व https://gras.mahakosh. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे)

  अमर्यादित रक्कम

  रु.300/- व त्याहून
  अधिक रक्कम

  2 ई-पेमेंन्ट
  ई-एसबीटीआर
  ई-एसबीटीआर सेवा देणा-या प्राधिकृत सहभागी बँकामार्फत (बँकांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Bank या िकाणी व https://gras.mahakosh. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) रु.5000/- व त्यापेक्षा अधिक रकमेचे मुद्रांक शुल्क भरण्यासा ी
  3 छापील मुद्रांक (उमट मुद्रांक)
  1. प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
  2. सर्व जिल्हा कोषागार व सर्व उपकोषागार कार्यालये
  3. परवाना धारक मुद्रांक विक्रेते
   (यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Others या िकाणी उपलब्ध आहे)

  अमर्यादित
  अमर्यादित
  एका दस्तऐवजासा ी रु.30,000 या मर्यादेपर्यंत मुद्रांक विक्री करु शकतात

  4 फ्रँकींग परवानाधारक फ्रँकींग विक्रेता यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Agencies या सदराखाली Others या िकाणी उपलब्ध आहे). एका दस्तऐवजासा ी जास्तीत जास्त रु.5000 पर्यंत मुद्रांक विक्री करु शकतात.
 • मुद्रांक शुल्काची रक्कम पूर्णांकात भरण्याविषयी काही नियम आहेत काय?
   

  होय, मुद्रांक शुल्काची रक्कम पूर्णांकात भरण्याविषयी नियम खालीलप्रमाणे आहेत,-
  देय मुद्रांक शुल्काची रक्कम रु.100/- पेक्षा अधिक असल्यास,

  • पुढील रुपये 49/- पर्यंत देय मुद्रांक शुल्कासा ी, अलीकडील रु.100/- आणि
  • पुढील रुपये 50/- व त्यापेक्षा अधिक देय मुद्रांक शुल्कासा ी पुढील रु.100/- अशी मुद्रांक शुल्काची गणना केली जाते.

  उदाहरणार्थ-

  1. रु.319/- मुद्रांक शुल्क देय होत असेल तर प्रत्यक्ष रुपये 300/- मुद्रांक शुल्क भरावे.
  2. रु.750/- मुद्रांक शुल्क देय होत असेल तर प्रत्यक्ष रुपये 800/- मुद्रांक शुल्क भरावे.
 • खरेदीखत, बक्षिसपत्र व फलोपभोगी गहाणखत या दस्तऐवजांना मुद्रांक अधिनियमात दर्शविलेल्या दरापेक्षा 1% अधिक दराने मुद्रांक शुल्क का आकारले जाते?
   

  • खरेदीखत, बक्षिसपत्र व फलोपभोगी गहाणखत केवळ याच दस्तऐवजांसा ी मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त 1% अधिक स्थानिक स्वराज्य संस्था अधिभार म्हणून मुद्रांक शुल्काचे स्वरुपात आकारला जातो.
  • याबाबतची तरतूद मुद्रांक अधिनियमात नसून ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस लागू असलेल्या कायद्यात केलेली असते. उदाहरणार्थः महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, इत्यादी.
  • ही रक्कम नोंदणी व मुद्रांक विभागाला मिळत नाही. ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनामार्फत दिली जाते.
  • या कराला स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय खालीलप्रमाणे संबोधले जाते,-
  अ.क्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार कराचे संबोधन (नांव)
  1 जिल्हा परिषद जिल्हा परिषद कर
  2 नगरपालिका/ नगरपरिषद/ नगर पचांयत नगर परिषद कर
  3 महानगरपालिका स्थानिक संस्था कर (LBT)
  4 नागपूर सुधार प्रन्यास नागपूर सुधार प्रन्यास कर

 • मुद्रांक शुल्क भरताना कोणती दक्षता घ्यावी?
   

  • दस्तऐवज करणा-या पक्षकारांपैकी कोणत्याही पक्षकाराच्या नावानेच मुद्रांक खरेदी करावा.
  • वकील अथवा ति-हाईत इसमाचे नावाने मुद्रांक खरेदी करु नये, तसे केल्यास असा दस्तऐवज अमुद्रांकित (not duly stamped) आहे, असे समजले जाते. (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम 34).
  • ज्या व्यक्तीने मुद्रांक शुल्कासा ी खर्च केला आहे, त्याच्याच नावे मुद्रांक खरेदी करावा. जेणेकरुन परतावा मागण्याचा प्रश्न आल्यास इतर लोकांच्या सही/संमतीची आवश्यकता राहणार नाही.
 • मुद्रांक शुल्क भरण्यास विलंब झाल्यास काय दंडात्मक तरतूद आहे?
   

  • मुद्रांक शुल्क भरण्यास विलंब झाल्यास कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या रकमेवर दरमहा 2% याप्रमाणे दंडाची आकारणी केली जाते. हा दंड दस्तऐवजावर पहिली स्वाक्षरी केल्याच्या दिनांकापासून ते कमी पडलेले मुद्रांक शुल्क शासनजमा करण्याच्या दिनांकापर्यंत आकारला जातो.
  • असे कमी पडलेले मुद्रांक शुल्क व दंड निश्चितीची कार्यवाही संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडून केली जाते. या दंडाची कमाल मर्यादा कमी पडलेल्या मुद्रांक शुल्काच्या रकमेच्या दुप्पट (200%) इतकी असते.
  • परंतु उपरोक्तप्रमाणे मुद्रांकाची रक्कम मागणी करुनही मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी समजून कारवाई केली जाते व मिळकतीची जप्ती व विक्री करुन मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वसूल केली जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]