मुद्रांक शुल्क केव्हा भरणे आवश्यक आहे

 • दस्तऐवज मुद्रांक शुल्क आकारणीस केव्हा पात्र होतो?
   

  • � महाराष्ट्र राज्यात निष्पादित झालेला (सही झालेला) दस्तऐवज हा निष्पादनाचे वेळी (सहीचे वेळी) (date of execution) मुद्रांक शुल्क आकारणीस पात्र होतो.
  • � दस्तऐवज निष्पादित करणा-या पक्षकारांची संख्या जास्त असेल आणि निष्पादक वेगवेगळ्या तारखांना निष्पादन (सह्या) करणार असतील, अशा वेळी दस्तऐवजावर पहिली सही झाल्यानंतर � लगेचच असा दस्तऐवज मुद्रांक शुल्क आकारणीस पात्र होतो.

 • दस्ताबाबत निष्पादित व निष्पादन यांचा अर्थ काय आहे?
   

  • निष्पादित (executed) याचा अर्थ सही करुन झालेला,
  • निष्पादन (execution) याचा अर्थ सही असा होतो.�
 • दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क कधी भरणे आवश्यक आहे?
   

  महाराष्ट्र राज्यात निष्पादित होणा-या दस्तऐवजावर, संबंधित पक्षकाराने पहिली स्वाक्षरी करण्यापूर्वी, त्यावर स्वाक्षरी करताना किंवा स्वाक्षरी नंतर लगेच पुढील कामकाजाच्या दिवशी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे.�

 • परराज्यात अथवा परदेशात दस्तऐवज निष्पादित (स्वाक्षरित) झाल्यास मुद्रांक शुल्क कधी भरावे लागते?
   

  परराज्यात अथवा परदेशात दस्तऐवज निष्पादित (स्वाक्षरित) झाल्यास असा दस्तऐवज महाराष्ट्र राज्यात प्रथम प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यांचे आत त्यावर योग्य मुद्रांक शुल्क भरावे लागते.�

 • मुद्रांक शुल्क कोणी भरणे आवश्यक आहे?
   

  महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 30 नुसार सर्वसाधारणपणे दस्तऐवजामध्ये ज्या पक्षावर मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी टाकली आहे. त्या पक्षकाराने मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. तथापि, अशी जबाबदारी निश्चित केली नसेल तर पुढीलप्रमाणे मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी आहे.�

  अ.
  क्र
  दस्ताचा प्रकार मुद्रांक शुल्क भरणेस जबाबदार
  पक्ष
  1 सा� ेखत, खरेदीखत, मिळकतीचे विक्री प्रमाणपत्र लिहून घेणार
  2
  1. सर्व प्रकारची बंधपत्रे तथा सर्व प्रकारची गहाण खते (All types of Bonds and Mortgage Deeds);
  2. जादा बोजाचे गहाण खत;
  3. हक्कसोड पत्र (Release Deed);
  4. व्यवस्थापत्र (Settlement);
  5. कर्जरोखे अथवा गहाणखताने किंवा बंधपत्राने अधिकार हस्तांतरण
  लिहून देणार
  3 भाडेपट्टा भाडेकरु
  4 भाडेपट्याची द्वितीय प्रत मालक
  5 वाटपपत्र सर्व पक्षकार आपापल्या हिश्याप्रमाणे (proportionate to their shares) अथवा लवादाचे आदेशात निर्देशित केल्याप्रमाणे
  6 इतर सर्व प्रकारात दस्तऐवजावर सही करणार

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]