मुद्रांक शुल्काचे दर

 • मुद्रांक शुल्क ( Stamp Duty) म्हणजे काय?
   

  मुद्रांक शुल्क हा दस्तावर(Document)/संलेखावर(Instrument) द्यावयाचा एक कर आहे.
 • मुद्रांक शुल्क भरणे का आवश्यक आहे?
   

  मुद्रांक शुल्क भरणे खालील कारणास्तव गरजेचे आहे.

  1. दस्तऐवजांचे स्वरुप आणि आवश्यक तिथे मिळकतीचे खरे बाजारमूल्य विचारात घेऊन देय मुद्रांक शुल्क भरले नसल्यास दस्तऐवज योग्य मुद्रांकित नाही (not duly stamped) असे मानले जाते.
  2. मुद्रांक शुल्क न भरलेला अथवा कमी मुद्रांक शुल्क भरलेला दस्तऐवज हा त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही.
  3. आवश्यक असूनही मुद्रांक शुल्क वेळेवर भरले नाही अथवा कमी भरले तर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते

 • दस्त (Document)/संलेख(Instrument) म्हणजे काय?
   

  सर्वसाधारणपणे ज्या लेखाद्वारे कोणतेही हक्क (Rights) किंवा दायित्व (Obligations) –

  - निर्माण करण्यात येते
  - हस्तांतरीत करण्यात येते
  - मर्यादित करण्यात येते
  - विस्तारित करण्यात येते
  - नष्ट करण्यात येते
  - अभिलिखित करण्यात येते

  अशा लेखास मुद्रांक कायद्यान्वये दस्त (Document)/संलेख(Instrument) असे म्हणतात. बोलीभाषेत त्याला दस्तऐवज असे म्हणतात.

 • दस्त (Document) /संलेख(Instrument) करीता किती मुद्रांक शुल्क देणे अपेक्षित आहे?
   

  • � दस्त (Document) /संलेख(Instrument) हा रीतसर मुद्रांकीत (duly stamped) होईल अशा पध्दतीने मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित आहे.
  • रीतसर मुद्रांकीत याचा अर्थ, संबंधित दस्तऐवजासा� ी त्या-त्या वेळी मुद्रांक अधिनियमात विहित केलेल्या रकमेहून कमी नाही इतक्या किमतीचा चिकट मुद्रांक (Adhesive Stamp) किंवा उमट मुद्रांक (Impressed Stamp) लावणे किंवा वापरणे असा आहे.

 • सर्वसाधारणपणे मुद्रांक शुल्क आकारणीस पात्र दस्त (संलेख) कोणते व त्याचे मुद्रांक शुल्क आकारणीचे दर काय आहेत?
   

  महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुसूची 1 (Schedule-I) मधील सर्व दस्तऐवजांना अनुसूचीमध्ये नमूद दराने मुद्रांक शुल्क देय आहे. अनुसूची 1 (Schedule-I) नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publication या सदराखाली Stamp Duty Collection या � िकाणी उपलब्ध आहे.त्यापैकी नेहमी उपयाेगात येणा-या दस्तऐेवजांची माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]