मुद्रांकाचे प्रकार व वापर

 • दस्तऐवजाला कोणत्या प्रकारच्या मुद्रांकाद्वारे मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे?
   

  दस्तऐवजाला न्यायिकेत्तर (Non-Judicial)प्रकारच्या मुद्रांकाद्वारे मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे
 • न्यायिकेत्तर (Non-Judicial) मुद्रांक म्हणजे काय?
   

  सर्वसाधारणपणे मुद्रांक दोन प्रकारचे असतात, न्यायिक मुद्रांक (Judicial Stamp) व न्यायिकेत्तर मुद्रांक’ (Non-Judicial Stamp). त्यातील फरक खालील प्रमाणे-�

  न्यायिक मुद्रांक (Judicial Stamp) न्यायिकेत्तर मुद्रांक (Non-Judicial Stamp)
  • न्यायिक मुद्रांकाचा (Judicial Stamp) वापर हा न्यायालयीन फी भरण्यासा� ी होतो,
  • या मुद्रांकाना सर्वसाधारण भाषेत ‘कोर्ट फी’ (Court Fee) असे संबोधले जाते.
  • दस्तऐवजासा� ी जे मुद्रांक वापरले जातात त्यांना ‘न्यायिकेत्तर मुद्रांक’ (Non-Judicial Stamp) असे संबोधले जाते.
  • दस्तऐवजांसा� ी केवळ न्यायिकेत्तर प्रकारातील मुद्रांकांचाच वापर करणे आवश्यक आहे.

  टीप- पोस्टाची सर्वसाधारण तिकीटे, वरील दोन्ही प्रकारात मोडत नाहीत, तथापी पोस्टातून मिळणारी ‘भारत राजस्व’ (India Revenue) ही पावतीस लावावयाची तिकीटे न्यायिकेत्तर मुद्रांकाचे (Non-Judicial Stamp) प्रकारात मोडतात�

 • न्यायिक मुद्रांक व न्यायिकेत्तर मुद्रांक यातील फरक कसा ओळखता येईल?
   

  साधारणपणे प्रत्येक मुद्रांकावर तो न्यायिक (Judicial) आहे किंवा न्यायिकेत्तर (Non-judicial) याबाबत छपाई केलेली असते. त्यावरुन तो मुद्रांक न्यायिक आहे किंवा न्यायिकेत्तर आहे हे सहज ओळखता येऊ शकते. तसेच न्यायिक मुद्रांकांवर ‘कोर्ट फी’ असा स्पष्ट उल्लेख असतो.
 • न्यायिकेत्तर (Non-Judicial) मुद्रांकामध्ये काही प्रकार असतात काय?
   

  होय. न्यायिकेत्तर (Non-Judicial) मुद्रांकामध्ये मुख्यत्वेकरुन दोन प्रकार असतात, ते असे-

  • उमट मुद्रांक (Impressed Stamps) – दस्तऐवज ज्यावर लिहावयाचा असा मुद्रांक� कागद
  • � चिकट मुद्रांक (Adhesive Stamps) – लिहिलेल्या दस्तऐवजाला चिकटवायची /� डकवायची मुद्रांक तिकीटे

 • उमट मुद्रांकाचे (Impressed Stamps) प्रकार कोणते?
   

  उमट मुद्रांकाचे (Impressed Stamps) प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.-

  • मुद्रांक कागद (Stamp paper)
  • ई-एसबीटीआर (e-SBTR)
  • साधी पावती (Simple Receipt)
  • फ्रॅँकींग (Franking)�
 • चिकट मुद्रांकाचे (Adhesive Stamps) प्रकार कोणते?
   

  चिकट मुद्रांकाचे (Adhesive Stamps) प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.-

  • विदेशी विपत्र (Foreign Bill)
  • शेअर हस्तांतरण (Share Transfer)
  • अधिवक्ता (Advocate) किंवा मुखत्यार (Attorney)
  • लेखप्रमाणक (Notarial)
  • दलालीची चि� ्� ी (Brokers Note)
  • विमा (Insurance)
  • राजस्व (Revenue)
  • विशेष चिकट मुद्रांक (Special Adhesive Stamps)

 • उमट मुद्रांकाचा वापर कसा करावा?
   

  उमट मुद्रांकाचा वापर पुढील पद्धतीने करावा.

  • उमट मुद्रांक खरेदी दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वापरणे आवश्यक आहे.
  • उमट मुद्रांकाचा वापर खरेदी दिनांकापासून सहा महिन्यात होणार नसेल तर, खरेदी दिनांकापासून सहा महिन्याच्या आत मुद्रांक शुल्क परतावा मिळणेसा� ी अर्ज करावा.
  • � उमट मुद्रांक सहा महिन्याच्या कालावधीत वापरले नाहीत अगर परताव्यासा� ी अर्जही केला नाही तर असे मुद्रांक अवैध (Invalid) � रुन वाया जातात, यामुळे पक्षकाराचे आर्थिक नुकसान होते.
  • मुद्रांक कागद वापरताना लिखाणाची सुरुवात प्रथम पृष्� ावरील मुद्रांकांपासून करणे आवश्यक आहे. अनेक मुद्रांक कागद वापरले असतील तर प्रत्येक मुद्रांक कागदावर दस्तऐवजाचा थोडातरी मजकूर लिहीणे आवश्यक आहे. लिखाणाला मुद्रांक कागद अपुरा पडल्यास त्यासोबत कोरी पाने जोडून लिखाण करता येते. (महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 चे कलम 14)
  • � वरील नियमांचे पालन न झाल्यास, दस्तऐवजास मुद्रांक शुल्क भरले गेले नाही असे समजण्यात येते.
  • दस्ताचा मजकूर मुद्रांक कागदाच्या दोन्ही बाजूवर (पा� पोट) लिहावा (दस्त नोंदणीसा� ी).�
 • चिकट मुद्रांकाचा वापर कसा करावा?
   

  चिकट मुद्रांकाचा वापर पुढील पद्धतीने करावा.

  • चिकट मुद्रांक खरेदी दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वापरणे आवश्यक आहे.
  • चिकट मुद्रांकाचा वापर खरेदी दिनांकापासून सहा महिन्यात होणार नसेल तर, खरेदी दिनांकापासून सहा महिन्याच्या आत मुद्रांक शुल्क परतावा मिळणेसा� ी अर्ज करावा.
  • चिकट मुद्रांक सहा महिन्याच्या कालावधीत वापरले नाहीत अगर परताव्यासा� ी अर्जही केला नाही तर असे मुद्रांक अवैध � रुन वाया जातात, त्यामुळे पक्षकाराचे आर्थिक नुकसान होते.
  • चिकट मुद्रांकाचा वापर करतांना जो कोणी चिकट मुद्रांक जोडेल अथवा वापरेल त्याने तो मुद्रांक पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पध्दतीने रद्द करणे आवश्यक आहे. रद्द करणे याचा अर्थ अशा मुद्रांकावर सही करणे किंवा दोन समांतर रेषा मारणे होय.
  • वरील नियमांचे पालन न झाल्यास दस्तऐवजास मुद्रांक शुल्क भरले गेले नाही असे समजण्यात येते.
 • मुद्रांक खरेदी केल्यापासून त्याचा ‘सहा महिन्याच्या आत वापर करणे’ म्हणजे काय?
   

  मुद्रांक खरेदी केल्यापासून ‘सहा महिन्याच्या आत वापर करणे’ म्हणजे, ज्या दस्तासा� ी मुद्रांक खरेदी केले आहेत, तो दस्त त्या मुद्रांकावर लिहून सहा महिन्याच्या आत त्यावर स्वाक्षरी करणे (execution) व दिनांक टाकणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]