महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील काही व्याख्या

 • बंधपत्र (Bond) म्हणजे काय?
   

  बंधपत्र (Bond) म्हणजे सर्वसाधारणपणे,

  • ज्या दस्तऐवजान्वये एक व्यक्ती, एखादी कृती यथास्थित (दस्तऐवजात कबूल केल्याप्रमाणे) केल्यास/झाल्यास किंवा न केल्यास/ न झाल्यास, दुस-या व्यक्तीला पैसे देण्याचे बंधन स्वतःवर घालून घेते असा दस्तऐवज;
  • ज्या दस्तऐवजान्वये साक्षीदारासमक्ष एक व्यक्ती दुस-या व्यक्तीला पैसे, धान्य अगर कृषी उत्पन्न देण्याचे बंधन स्वतःवर घालून घेते असा दस्तऐवज
 • अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे काय?
   

  अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे सर्वसाधारणपणे,
  ज्या दस्तऐवजाद्वारे स्थावर अगर जंगम मालमत्ता किंवा कोणतीही संपदा (Estate)/ मालमत्ता (Property) किंवा कोणत्याही मालमत्तेतील हितसंबंध (interest) दोन हयात (between two legal entities) व्यक्तींच्या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतात किंवा निहीत (vest) करण्यात येतात आणि ज्याबाबत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुसूची-1 (Schedule-I) मध्ये कोणतीही वेगळी तरतूद नसेल, असा दस्तऐवज.

  या प्रकारात पुढील प्रकारच्या दस्तांचा समावेश होतो-

  1. � विक्री नंतरचे अभिहस्तांतरण (Conveyance on Sale);
  2. � प्रत्येक संलेख (Every instrument);
  3. � कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा प्रत्येक हुकूमनामा किंवा अंतिम आदेश (Every Decree or Order of Civil Court);
  4. � कंपनी कायदा, 1956 चे कलम 394 अन्वये उच्च न्यायालयाने कंपन्यांचे एकत्रिकरण (Amalgamation) व पुनर्रचना (Reconstruction) बाबत दिलेला आदेश किंवा रिझर्व्ह बँकेने, रिझर्व्ह बँक कायदा, 1934 चे कलम ४४क अन्वये बँकांचे एकत्रिकरण (Amalgamation) व पुनर्रचना (Reconstruction) बाबत दिलेला आदेश;
 • बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे काय?
   

  बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे,

  • � ज्या दस्तऐवजाद्वारे कोणतीही व्यक्ती आपली स्थावर अथवा जंगम मालमत्ता दस्तामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीला दान अथवा बक्षिस देते असा दस्तऐवज, किंवा-
  • � पूर्वी तोंडी केलेले दान/ बक्षिस जेव्हा लिखित स्वरुपात व्यक्त केले जाते अशा स्वरुपाच्या लिखाणाचा दस्तऐवज

 • वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे काय?
   

  वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे,
  ज्या दस्तऐवजाद्वारे मालमत्तेचे सहमालक त्या मालमत्तेचे पृथक विभाजन (by metes and bounds) करतात अथवा मालमत्तेच्या विभाजनाचा करार करतात असा दस्तऐवज.

  यामध्ये पुढील प्रकारच्या दस्तऐवजांचा समावेश होतो.

  1. महसूल प्राधिकारी किंवा दिवाणी न्यायालयाने विभाजन घडवून आणण्याविषयी दिलेला अंतिम आदेश;�
  2. विभाजन करण्याचा निर्देश देण्यात आलेला लवाद निवाडा; आणि
  3. मालमत्तेच्या विभाजनासंदर्भात सहमालकांनी कोणत्याही स्वरुपात लिहीलेला व त्यावर स्वाक्ष-या केलेला दस्तऐवज.

 • भाडेपट्टा (Lease Deed) म्हणजे काय?
   

  भाडेपट्टा (Lease Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे, स्थावर किंवा जंगम मालमत्तेचा किंवा दोन्हीचा भाडेपट्टा.
  यामध्ये पुढील दस्तऐवजांचादेखील समावेश होतो,-

  1. पट्टा;
  2. कबुलायत किंवा मालमत्तेची मशागत करणेविषयी, तिचा भोगवटा करणेविषयी किंवा तिचे भाडे देणेविषयी किंवा ते सुपूर्द करणेविषयी लेखी हमी;
  3. ज्या दस्तऐवजाद्वारे कोणतेही पथकर बसवण्याचे हक्क भाड्याने दिले जातात असा कोणताही दस्तऐवज;
  4. भाडेपट्ट्याविषयी केलेला अर्ज मंजूर झाला आहे हे दर्शविण्याच्या उद्देशाने लिहिलेला कोणताही मजकूर;
  5. � एखाद्या भाडेपट्ट्याच्या संबंधातील कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा हुकूमनामा / अंतिम आदेश;

 • गहाणखत (Mortgage deed) म्हणजे काय?
   

  गहाणखत (Mortgage Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे, ज्या दस्तऐवजांद्वारे कर्ज म्हणून दिलेला किंवा द्यावयाचा पैसा किंवा भावी ऋण किंवा एखाद्या गोष्टीचे पालन प्रतिभूत करण्यासा� ी (to secure) एक व्यक्ती दुस-या व्यक्तीच्या लाभात विशिष्ट संपत्तीवरील किंवा तिच्या संबंधातील अधिकार निर्माण करते अगर अधिकार हस्तांतरीत करते असा दस्तऐवज.
 • मुखत्यारनामा (Power of Attorney) म्हणजे काय?
   

  मुखत्यारनामा (Power of Attorney ) म्हणजे सर्वसाधारणपणे, ज्या दस्तऐवजाने, दस्तऐवज लिहून देणार व्यक्ती विनिर्दिष्ट व्यक्तीस (Specific Person) तिच्या नावाने व वतीने काम चालविण्याचा अधिकार प्रदान करते, तसेच आपल्या वतीने कोणत्याही न्यायालयात, न्यायाधिकरणापुढे किंवा प्राधिकरणापुढे हजर रहाण्यासा� ी प्राधिकृत करते, असा दस्तऐवज. मात्र, यामध्ये वकिलास कामकाज चालविण्यासा� ी दिलेल्या वकीलपत्राचा (Vakalatnama) समावेश होत नाही.
 • संव्यवस्था (Settlement) म्हणजे काय?
   

  संव्यवस्था (Settlement) म्हणजे सर्वसाधारणपणे,

  कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्तेची, खालील कारणास्तव व्यवस्था लावणे संदर्भातील मृत्युपत्रेत्तर दस्तऐवज -

  1. � विवाहाच्या प्रतिफलासा� ी (in consideration of marriage), किंवा
  2. संव्यवस्थाकर्त्याची मालमत्ता, त्याच्या कुटुंबाकरिता किंवा ज्यांच्याकरिता तरतूद करण्याची त्याची इच्छा असेल त्यांच्यामध्ये वाटून देण्याच्या प्रयोजनार्थ किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या एखाद्या व्यक्तीसा� ी तरतूद करण्याच्या प्रयोजनार्थ, किंवा
  3. कोणत्याही धार्मिक किंवा धर्मादाय प्रयोजनार्थ, आणि ज्यामध्ये व्यवस्था करण्याविषयीच्या एखाद्या लेखी कराराचा समावेश होतो आणि जेथे अशी कोणतीही व्यवस्था लेखी करण्यात आलेली नसेल तेथे विश्वस्तव्यवस्था जाहीर करुन त्याद्वारे किंवा अन्यथा अशा कोणत्याही व्यवस्थेच्या अटी लेखी स्वरुपात व्यक्त करणा-या कोणत्याही दस्तऐवजाचा समावेश होतो

 • स्थावर मालमत्ता (Immovable Property)म्हणजे काय?
   

  स्थावर मालमत्ता (Immovable Property)म्हणजे सर्वसाधारणपणे, जमीन, जमिनीपासून मिळणारे लाभ आणि जमिनीस संलग्न असलेल्या गोष्टी किंवा जमिनीस संलग्न असलेल्या गोष्टीला कायम जोडलेली कोणतीही गोष्ट, यांचा समावेश होतो.
 • जंगम मालमत्ता (Movable Property)म्हणजे काय?
   

  जंगम मालमत्ता (Movable Property) म्हणजे सर्वसाधारणपणे,

  1. स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त उभ्या झाडांचे लाकूड, वाढती पिके आणि गवत, झाडावरील फळ किंवा त्याचा रस व इतर प्रत्येक प्रकारची मालमत्ता.
  2. स्थावर मालमत्ता वगळून इतर मालमत्ता ज्याबाबत हक्क किंवा दायीत्व निर्माण/हस्तांतरित/मर्यादित/विस्तारित/नष्ट/नमूद करण्यात आले आहेत.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]