‘अ’ पत्रक

  • ‘अ’ पत्रक व सिटीएस पत्रके पा विण्याची तरतूद व कार्यपध्द्ती सांगा.
     

    स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या अनुषंगाने संबंधित स्थावर मिळकतीच्या अधिकार अभिलेखामध्ये (7/12,मिळकतपत्रिका) फेरफार होतात. अशा हस्तांतरणाच्या दस्तांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आल्यानंतर दुय्यम निबंधक त्याची माहिती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 मधील तरतुदीनुसार संबंधित तहसीलदार यांचेकडे विहीत नमुन्यात पा वतात. त्यास ‘अ’ पत्रक असे संबोधले जाते. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या पुढील दस्तांची ‘अ’ पत्रके तहसिलदार यांचेकडे पा विली जातात. 1) खाजगी करारानुसारची विक्री किंवा दिवाणी न्यायालयाने केलेली विक्री 2) भाडेपटटा 3) दान 4) अदलाबदल 5) गहाणखत (ताब्यासहित किंवा विनाताबा) 6) वाटणीपत्र 7) हक्कसोडपत्र 8) गहाणखतामधील रक्कम परतफेड केल्याची पोचपावती 9) गहाणखतातील मिळकत सोडवल्याचे प्रत्यंतरणपत्र (रिकन्वेन्स) 10) व्यवस्थापत्र 11) गहाणखताद्वारे मिळकत गहाण ेवून घेणार यांना असलेल्या अधिकारांचे हस्तांतरण 12) दत्तक घेणा-याचे स्वकष्टार्जित असलेल्या मिळकतीतील अधिकार, ज्याला दत्तक घेतले आहे, त्यास हस्तांतरित होत असल्याचे दत्तकपत्र. सिटी सर्व्हे झालेल्या भागातील मिळकतीच्या संदर्भात नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती सीटीएस पत्रकाद्वारे नगरभूमापन अधिकारी यांचेकडे पा विली जाते. सदर ‘अ’ पत्रके / सीटीएस पत्रके दस्त नोंदणी नंतरच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधित तहसिल कार्यालयाकडे पा विली जातात.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]