नोंदणी फी परतावा

  • दस्त नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जादा नोंदणी फी भरल्याचे निदर्शनास आले तर परताव्याबाबत काय तरतूद आहे व ते अधिकार कोणास आहेत?
     

    जादा नोंदणी फी भरल्याचे निदर्शनास आल्यास अशा जादा नोंदणी फी चा परतावा देण्याचा अधिकार नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 80 अ नुसार नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांना आहे. मात्र त्यासा ी संबंधित पक्षकाराने जिल्हा निबंधक यांच्या नावे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी फी ई-पेमेंट द्वारे भरलेली आहे, परंतु दस्ताची नोंदणी करण्यात आलेली नाही किंवा करावयाची नसल्यास अशा नोंदणी फी चा परतावा कसा मिळू शकेल? किती दिवसांत अर्ज करावा लागेल ? तसेच परतावा देण्या
     

    नोंदणी फी ई-पेमेंट द्वारे भरलेली आहे. परंतु दस्ताची नोंदणी करण्यात आलेली नाही किंवा करावयाची नसल्यास अशा नोंदणी फी चा परतावा मिळणेसा ी ज्या जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नावाने नोंदणी फी भरलेली आहे, त्या जिल्हयाच्या सह जिल्हा निबंधक यांच्याकडे असा परतावा मिळण्यासा ी अर्ज करावा. नोंदणी फी भरल्यापासून 6 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]