जुने /प्रलंबित दस्त

 • सन 2002 पूर्वी नोंदणीस दाखल करण्यात आलेले काही दस्त संबंधितांना अदयापि परत मिळालेले नाहीत. त्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे ?
   

  सन 2002 पासून नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयात संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामध्ये नोंदणी करण्यास पात्र असलेले दस्तच नोंदणीसा ी स्विकारले जातात व दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी त्वरित पूर्ण करुन व स्कॅनिंग करुन पक्षकारांना 30 मिनिटांत परत दिले जातात. त्यामुळे सन 2002 नंतर नोंदणीस दाखल करण्यात आलेले दस्त नोंदणी करुन संबंधितांना परत देण्यात आलेले आहेत. मात्र सन 2002 पूर्वी अशी पध्दत नव्हती. त्यावेळी नोंदणीस दाखल करण्यात आलेले काही दस्त योग्य ते मुद्रांक शुल्क दस्तावर न भरल्यामुळे नोंदणीसा ी प्रलंबित आहेत. तर काही दस्त आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे नोंदणीसा ी प्रलंबित आहेत. या प्रलंबिततेमुळे काही दस्त संबंधितांना परत देण्यात आलेले नाहीत. त्याबाबतची मुद्रांक शुल्क/ कागदपत्रांची पूर्तता केल्यास, त्या दस्तांची नोंदणी पूर्ण करून ते दस्त संबंधितांना परत देण्यात येतात.
 • सन 2002 पूर्वी नोंदणीस दाखल करण्यात आलेल्या दस्ताची नोंदणी प्रलंबित (Pending) असेल तर त्याची नोंदणी कशी पूर्ण करुन घेता येईल?
   

  यासा ी संबंधित दुय्यम निबंधक यांच्याशी समक्ष संपर्क साधावा आणि दस्त कोणत्या कारणांसा ी प्रलंबित आहे याची नेमकी माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यावी.

  • दस्त काही कागदपत्रांच्या पूर्ततेसा ी प्रलंबित असेल तर त्या कागदपत्रांची पूर्तता करावी.
  • जर दस्त मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फी कमी भरल्याचे कारणास्तव प्रलंबित असेल तर जिल्हयाचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे मुद्रांक शुल्क फरक, त्यावरील दंड व नोंदणी फी फरक याचा भरणा करावा.

  याप्रमाणे आपण पूर्तता केल्यानंतर दुय्यम निबंधक आपल्या दस्ताची नोंदणी पूर्ण करु शकतील.

 • दस्ताची नोंदणी प्रलंबित ेवण्याच्या संदर्भात दुय्यम निबंधक यांनी सांगितलेली कारणे मान्य नसतील तर पुढे काय कार्यवाही करावी?
   

  अशा बाबतीत दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणीस नाकारण्याची कारणे नमूद असलेल्या लेखी आदेशाची मागणी करावी. असा आदेश मिळाल्यानंतर पक्षकारांना त्याविरुध्द जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सह जिल्हा निबंधक यांच्यामार्फत अपील दाखल करता येते. यासंदर्भातील सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 2 - दस्त नोंदणीसंदर्भातील कायदेशीर तरतूदी.
 • सन 2002 पूर्वी नोंदणीस दाखल करण्यात आलेल्या दस्ताची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. तथापि त्याचे कॉपींग / स्कॅनिंग झाले नाही म्हणून परत मिळत नाही, तो दस्त केव्हा व कोणत्या कार्यालयातून परत मिळेल
   

  सन 2002 पूर्वी नोंदणीस दाखल करण्यात आलेल्या, नोंदणी पूर्ण करण्यात आलेल्या बहुतांशी सर्व दस्ताचे कॉपींग (फोटोकॉपींग, छायाचित्रण, स्कॅनिंग) पूर्ण करण्यात आले आहे व मूळ दस्त पक्षकारांना परत देण्यात आले आहेत. अपवादात्मक परिस्थितीत एखादया दस्ताचे कॉपिंग झाले नसल्यास किंवा त्या दस्ताची नोंदणी आता पूर्ण होत असल्यास, त्या दस्ताचे स्कॅनिंग संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयातच पूर्ण करण्याची संगणकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे तो दस्त देखील नोंदणीपासून साधारण पंधरा दिवसांच्या आत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयातून परत मिळू शकतो.
 • पूर्वी काही दस्त छायाचित्रण/ स्कॅनिंगसा ी शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय, पुणे (Government Photo Registry) (GPR )येथे पा विण्यात आले होते. ते मूळ दस्त/ त्यांच्या नकला को े मिळतील?
   

  पक्षकारांना मूळ दस्त/ नकला शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय, पुणे (Government Photo Registry) येथून दिल्या जात नाहीत. ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसा ी दाखल करण्यात आला आहे, अशा दुय्यम निबंधक कार्यालयातूनच मूळ दस्त/नकला दिल्या जातात. त्यामुळे पक्षकारांनी त्याकामी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयातच अर्ज करणे आवश्यक आहे.
 • एखादा दस्त नोंदणीस सादर करण्याच्या मुदतीत नोंदणीस सादर केला नसेल तर असा दस्त कन्फर्मेशन डीड/ एकतर्फी घोषणापत्राच्या दस्तास जोडून नोंदणीसा ी आता सादर करता येतो का?
   

  नाही. यासंदर्भात सविस्तर खुलाशासा ी, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ww.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circular या िकाणी उपलब्ध असलेली नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक दि 22/12/2011 व दि 28/5/2012 चे खुलासापत्र पहावे.
 • एखादा दस्त मुदतीत नोंदणीस सादर करणे शक्य झाले नसेल तर त्या पक्षकारांना कोणता पर्याय उपलब्ध आहे?
   

  अशा व्यवहारातील सर्व पक्षकारांना त्या व्यवहाराशी संबंधित व कायदयान्वये ग्राहय असलेला कोणताही नवीन दस्त योग्य मुद्रांकावर तयार करुन त्याची नोंदणी करुन घेण्याचा मार्ग उपलब्ध आहे. उदा- विक्री करार मुदतीत नोंदणीस सादर केला नसेल तर करारातील सर्व पक्षकाराच्या सहीने खरेदीखताचा दस्त आजमितीस केल्यास व त्यावर अनुज्ञेय मुद्रांक शुल्क अदा केल्यास त्याची नोंदणी करुन घेता येईल.
 • नोंदणीकृत दस्ताच्या संदर्भात दस्त लिहून दिल्याचा दिनांक, नोंदणीस सादर केल्याचा दिनांक व नोंदणी पूर्ण केल्याचा दिनांक असे वेगवेगळे दिनांक असू शकतात. यापैकी नेमक्या कोणत्या तारखेपासून दस
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 47 मध्ये, याबाबत तरतुदी आहेत. त्यानुसार नोंदणीकृत दस्ताचे बाबतीत साधारणपणे दस्त लिहून दिल्याच्या (सही केल्याच्या ) तारखेपासून दस्ताचा अंमल सुरू होतो.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]