विशेष कुलमुखत्यारपत्र (Special Power of Attorney)

 • विशेष कुलमुखत्यारपत्र (Special Power of Attorney ) म्हणजे काय ?
   

  मूळ पक्षकाराने दस्तावर सही केल्यानंतर त्यांच्यावतीने दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहून
  • तो दस्त नोंदणीस सादर करणे किंवा
  • त्यांच्यावतीने नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून त्याचे निष्पादन नोंदणी अधिका-यासमोर कबूल करणे यापुरतेच मर्यादित अधिकार देण्यासा ी तयार केलेल्या कुलमुखत्यारपत्रास विशेष कुलमुखत्यारपत्र असे संबोधतात.

 • विशेष कुलमुखत्यारपत्रास किती मुद्रांक शुल्क देय आहे?
   

  विशेष कुलमुखत्यारपत्रास रुपये 100/- इतके मुद्रांक शुल्क देय आहे.
 • विशेष कुलमुखत्यारपत्र कशा रीतीने तयार करावे लागते ?
   

  विशेष कुलमुखत्यारपत्राबाबत नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 33 मध्ये सविस्तर तरतुदी आहेत. त्यानुसार - 1. मुखत्यारपत्र लिहून देणार हे अशा मुखत्यारपत्रावर सही (Execution ) करतेसमयी ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात रहात असतील त्या दुय्यम निबंधकांसमोर मुखत्यारपत्रावर सही करतात व संबंधित दुय्यम निबंधक हे सदर पक्षकारांनी त्यांच्यासमोर सही केली असल्याचे अधिप्रमाणित (Authentication) करतात. 2. मुखत्यारपत्र लिहून देणार हे असे मुखत्यारपत्र सही (Execution) करतेसमयी, भारतात रहात नसल्यास, ज्या देशात रहात असतील तेथील सक्षम प्राधिकारी म्हणजेच पब्लिक नोटरी / न्यायालय / न्यायाधीश/ दंडाधिकारी/ भारतीय कौन्सिल किंवा उपकौन्सिल किंवा केंद्र शासनाच्या प्रतिनिधी समोर मुखत्यारपत्रावर सही करतात व असे सक्षम प्राधिकारी सदर पक्षकारांनी त्यांच्यासमोर सही केली असल्याचे अधिप्रमाणित (Authentication) करुन देतात.
 • विशेष कुलमुखत्यारपत्र अधिप्रमाणित (Authentication) करणे म्हणजे काय ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 33 नुसार, विशेष कुलमुखत्यारपत्र देणा-या व्यक्तीने दुय्यम निबंधक (किंवा भारताबाहेर असल्यास सक्षम प्राधिकारी) यांच्यासमोर हजर राहून विशेष कुलमुखत्यारपत्रावर सही करणे आणि दुय्यम निबंधक (किंवा भारताबाहेर असल्यास सक्षम प्राधिकारी) यांनी सदरची सही त्यांच्यासमोर करण्यात आल्याचे प्रमाणित करणे यास अधिप्रमाणन असे म्हणतात
 • दुय्यम निबंधक यांच्यासमोर विशेष कुलमुखत्यारपत्राच्या अधिप्रमाणनाची (Authentication) फी किती असते ?
   

  विशेष कुलमुखत्यारपत्राच्या अधिप्रमाणनाची (Authentication) फी रुपये 25/- इतकी असते.
 • विशेष कुलमुखत्यारपत्राचे साक्षांकन (Attestation) म्हणजे काय ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 33 नुसार विशेष कुलमुखत्यारपत्र करुन देणा-या व्यक्तीने दुय्यम निबंधक यांच्यासमोर हजर राहून कुलमुखत्यारपत्रावर सही करुन तसे अधिप्रमाणित (Authentication) करुन घेणे आवश्यक असते.
  मात्र पुढे नमूद केलेल्या अपवादात्मक कारणास्तव एखादी व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात अधिप्रमाणनासा ी समक्ष हजर राहू शकत नसेल तर त्यांनी अगोदरच सही केलेले कुलमुखत्यारपत्र दुय्यम निबंधकांसमोर सादर करण्यात आल्यास दुय्यम निबंधक कारणांची खातरजमा करुन व त्या व्यक्तीने विशेष कुलमुखत्यारपत्रावर खरोखरीच सही केली आहे याची खात्री करुन उक्त कुलमुखत्यारपत्र साक्षांकित (Attestation) करुन देऊ शकतात.
  अपवादात्मक कारणे:-

  • अशा व्यक्तीस शारिरीक दुर्बलतेमुळे जोखीम पत्करुन किंवा गंभीर असुविधा होत असल्यास,
  • अशी व्यक्ती फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयातील प्रक्रियेनुसार तुरुंगवासात असल्यास,
  • अशा व्यक्तीस न्यायालयात उपस्थित रहाणेबाबत कायदयाने सूट दिली असल्यास.
 • विशेष कुलमुखत्यारपत्राच्या साक्षांकनासा ी फी किती असते ?
   

  विशेष कुलमुखत्यारपत्राच्या साक्षांकनासा ी रुपये 25/- इतकी फी आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]