सर्वसाधारण कुलमुखत्यारपत्र (General Power of Attorney)

 • सर्वसाधारण कुलमुखत्यारपत्र (General Power of Attorney ) म्हणजे काय ?
   

  ज्या कुलमुखत्यारपत्रामध्ये लिहून देणार हे त्यांच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेसंदर्भातील कोणत्याही स्वरुपाची कामे त्यांच्या नावाने व त्यांच्या वतीने करण्यासा ी मुखत्यारपत्रधारकास नियुक्त करतात त्या कुलमुखत्यारपत्रास सर्वसाधारण कुलमुखत्यारपत्र असे म्हणतात.
 • स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराच्या कुलमुखत्यारपत्रास किती मुद्रांक शुल्क आवश्यक आहे ?
   

  अ. जर असे कुलमुखत्यारपत्र मोबदल्याशिवाय वडील, आई, भाऊ, बहीण, पत्नी, पती, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा जवळच्या नातेवाईकाच्या नावाने दिलेले असेल तर रुपये 500/- इतके मुद्रांक शुल्क देय आहे. ब. वरील अ मध्ये न मोडण्या-या अशा कुलमुखत्यारपत्रास दस्तातील मिळकतीचे बाजारमूल्य व मोबदला (असल्यास) यापैकी जास्त असलेल्या रकमेवर अनुच्छेद 48 नुसार विहीत केलेल्या दरानुसार मुद्रांक शुल्क देय आहे.
 • स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराच्या कुलमुखत्यारपत्राची नोंदणी करण्यासा ी किती नोंदणी फी देय आहे?
   

  स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराच्या कुलमुखत्यारपत्राची नोंदणी करण्यासा ी -
  अ. जर कुलमुखत्यारपत्र मोबदल्याशिवाय दिलेले असेल आणि वडील, आई, भाऊ, बहीण, पत्नी, पती, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा आयकर अधिनियम, 1961 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार जवळच्या नातेवाईकाच्या नावाने दिलेले असेल तर रुपये 100/- इतकी नोंदणी फी देय आहे.
  ब. वरील अ मध्ये न मोडण्या-या कुलमुखत्यारपत्रास दस्तातील मिळकतीचे बाजारमूल्य व मोबदला (असल्यास ) यापैकी जास्त असलेल्या रकमेवर प्रति रुपये 1000/- सा ी रुपये 10/- या दराने कमीत कमी रुपये 100/- व जास्तीत जास्त रुपये 30000/- इतकी नोंदणी फी देय आहे.

 • स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराच्या कुलमुखत्यारपत्राची नोंदणी केव्हापासून अनिवार्य करणेत आली आहे?
   

  दिनांक 01/04/2013 रोजी किंवा तदनंतर निष्पादित होणा-या स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराच्या कुलमुखत्यारपत्राची नोंदणी ही नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 17 मध्ये नव्याने दाखल केलेल्या खंड (एच) नुसार अनिवार्य करण्यात आलेली आहे.
 • स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराचे कुलमुखत्यारपत्र नोंदणी केलेले नसेल तर ?
   

  • दिनांक 01/04/2013 पूर्वी निष्पादित झालेले असे कुलमुखत्यारपत्र हे नोंदणी केले नसेल तरी ते त्याआधारे दस्त नोंदणीसा ी ग्राहय धरले जाते. मात्र मुखत्यारपत्र निष्पादित होते समयी देय असलेले मुद्रांक शुल्क भरलेले असणे आवश्यक आहे. तसेच ते योग्य प्राधिकृत व्यक्तीपुढे (जसे की नोटरी ) निष्पादित करुन त्यांच्याकडून तसे साक्षांकित केलेले असणे आवश्यक आहे.
  • दिनांक 01/04/2013 रोजी किंवा त्यानंतर भारतात निष्पादित झालेले असे कुलमुखत्यारपत्र हे नोंदणी केलेले नसेल तर त्याआधारे निष्पादित दस्ताच्या नोंदणीसा ी ग्राहय धरले जात नाही.
 • सर्वसाधारण कुलमुखत्यारपत्राच्या आधारे दस्त नोंदणी करताना कोणते घोषणापत्र दस्तासोबत जोडावे लागते ?
   

  कुलमुखत्यारपत्र लिहून देणारी व्यक्ती मयत झाल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव कुलमुखत्यारपत्र रदद झालेले नाही / कुलमुखत्यारपत्र देणा-याने ते रदद केलेले नाही याची पडताळणी करुनच कुलमुखत्यारपत्राचा वापर करणे कुलमुखत्यारपत्रधारकावर बंधनकारक असते. तशी पडताळणी त्याने केल्यानंतर, त्या आशयाचे घोषणापत्र त्याने दस्तासोबत जोडणे आवश्यक असते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]