कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney)

 • कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney) म्हणजे काय ?
   

  • सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती जी कामे करण्यास स्वतः सक्षम आहे अशी कामे त्याच्या नावाने व त्याच्या वतीने करण्याचे अधिकार दुस-या व्यक्तीस प्रदान करते, अशा अधिकार प्रदान करण्याच्या दस्तास कुलमुखत्यारपत्र असे म्हणतात.
  • यास मुखत्यारपत्र, मुखत्यारनामा, वटमुखत्यार, आम मुखत्यारपत्र इ. नावानेही संबोधले जाते.
  • यामध्ये जी व्यक्ती स्वतःचे अधिकार प्रदान करते तिला मूळ व्यक्ती (Principal) असे संबोधले जाते. तर ज्या व्यक्तीला अधिकार प्रदान केले जातात तिला मुखत्यारपत्रधारक (Attorney Holder) असे संबोधले जाते.
  • यामध्ये वकीलास दिलेल्या वकीलपत्राचा समावेश होत नाही.
 • दस्त नोंदणी संदर्भात साधारणतः कोणत्या प्रकारच्या कुलमुखत्यारपत्रांचा वापर केला जातो?
   

  दस्त नोंदणी संदर्भात साधारणतः पुढील दोन प्रकारच्या कुलमुखत्यारपत्रांचा वापर केला जातो.
  1. सर्वसाधारण कुलमुखत्यारपत्र (General Power of Attorney )
  अ. स्थावर मिळकत विक्रीचे अधिकार प्रदान करणारे कुलमुखत्यारपत्र
  ब. स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या अधिकाराव्यतिरिक्त इतर अधिकार प्रदान करणारे
  कुलमुखत्यारपत्र
  2. विशेष कुलमुखत्यारपत्र (Special Power of Attorney ) ज्यामध्ये दस्त नोंदणीसा ी सादर करणे किंवा दस्त निष्पादित करणा-या व्यक्तीच्या वतीने कबुलीजबाब देण्याचा अधिकार दिलेला
  असतो.

 • कुलमुखत्यारपत्राच्या आधारे दस्त निष्पादित केला असल्यास असा दस्त नोंदणी करणेसा ी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?
   

  कुलमुखत्यारपत्राच्या आधारे दस्त निष्पादित केला असल्यास दस्त नोंदणीसा ी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात.
  1. कुलमुखत्यारपत्राची मूळ प्रत
  2. कुलमुखत्यारपत्राची सत्य प्रत
  3. कुलमुखत्यारपत्र रदद न झाल्याबाबत तसेच कुलमुखत्यारपत्र देणारी व्यक्ती मयत झाली नसल्याबाबतचे घोषणापत्र
  घोषणापत्राचा सर्वसाधारण नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Forms या िकाणी उपलब्ध आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]