मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्युनंतर मृत्युपत्र नोंदणीबाबत

 • मृत्युपत्राचा लखोटा डिपॉझिट करणे म्हणजे काय?
   

  एखादया व्यक्तीला स्वत:चे मृत्युपत्र नोंदणी करण्याऐवजी गोपनीय स्वरुपात शासकीय कार्यालयात � ेवण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती सदर मृत्युपत्र बंद लखोटयात � ेवून तो लखोटा जिल्हा निबंधक यांचे कार्यालयात डिपॉझिट करु शकते व कालांतराने इच्छेनुसार तो लखोटा परत घेऊ शकते. मृत्युपत्रकर्त्याने स्वत:च्या हयातीत लखोटा परत न घेतल्यास, त्याचे मृत्युनंतर तसा अर्ज आल्यास तो लखोटा उघडण्यात येतो व मृत्युपत्राची संबंधित पुस्तकामध्ये नक्कल केली जाते. याबाबतच्या सविस्तर तरतुदी नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 42 ते 46 मध्ये आहेत.
 • मृत्युपत्राचा लखोटा कोण व कोणाकडे डिपॉझिट करु शकतो?
   

  मृत्युपत्राचा लखोटा मृत्युपत्रकर्ता स्वतः किंवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांचेकडे डिपॉझिट करु शकतो.
 • मृत्युपत्राचा लखोटा डिपॉझिट करण्यासा ी फी किती असते ?
   

  मृत्युपत्राचा लखोटा डिपॉझिट करण्यासा ी रुपये 100/- इतकी फी आहे.
 • डिपॉझिट केलेला मृत्युपत्राचा लखोटा परत घेण्याची कार्यपध्द्ती व फी सांगा.
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 44 नुसार,

  • मृत्युपत्रकर्ता यांना असा डिपॉझिट केलेला लखोटा परत घेण्याची इच्छा असल्यास, ते स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत जिल्हा निबंधक यांचेकडे अर्ज करु शकतात.
  • असा अर्ज करणारी व्यक्ती ही मृत्युपत्रकर्ता किंवा त्याचा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याची जिल्हा निबंधक यांची खात्री झाल्यास ते असा लखोटा न उघडता अर्जदारास परत करतात.
  • यासा ी रुपये 100/- इतकी फी आकारली जाते.

 • मृत्युपत्राचा लखोटा केव्हा उघडता येतो ? सदर लखोटा उघडण्याची व उघडल्यानंतरची कार्यपध्द्त सांगा.
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 45 नुसार,

  • डिपॉझिट केलेला लखोटा उघडण्यासा ी मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्युनंतर कोणीही व्यक्ती अर्ज करु शकते यासा ी रु. 100/- इतकी फी आकारली जाते.
  • मृत्युपत्रकर्त्याचे निधन झाल्याबाबत जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी स्वत: खात्री करुन घेतात.
  • खात्री झाल्यास ते अशा अर्जदाराच्या उपस्थितीत लखोटा उघडतात.
  • लखोटा उघडल्यांनतर मृत्युपत्राची पुस्तक क्रमांक 3 मध्ये नक्कल केली जाते.
  • ते मृत्युपत्र पुन्हा सिलंबद लखोटयात ेवुन अभिलेखात जमा केले जाते.
  • पुस्तक्र क्रमांक 3 च्या नकलेची प्रमाणित प्रत अर्जदारांना दिली जाते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]