मृत्युपत्राची नोंदणी

 • मृत्युपत्रकर्त्याला स्वतःच्या हयातीत मृत्युपत्र नोंदणीसा� ी केव्हा सादर करता येते ?
   

  मृत्युपत्रकर्त्याने मृत्युपत्रावर सही केल्यानंतर त्याला नोंदणीसा� ी केव्हाही सादर करता येते. त्यासा� ी सहीपासून 4 महिन्यांची कालमर्यादा लागू होत नाही.
 • मृत्युपत्र कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसा� ी सादर करता येते ?
   

  मृत्युपत्रकर्ता ज्या दुय्यम निबंधकाचे कार्यक्षेत्रात वास्तव्य करीत असेल किंवा ज्या कार्यक्षेत्रात त्याने मृत्युपत्रावर सही केली असेल किंवा त्यास जे दुय्यम निबंधक कार्यालय सोयीस्कर असेल अशा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्र नोंदणीस सादर करता येते.
 • मृत्युपत्र नोंदणीसा ी किती नोंदणी फी देय आहे ?
   

  मृत्युपत्र नोंदणीसा ी रुपये 100/- इतकी नोंदणी फी देय आहे.
 • मृत्युपत्राचे दस्तावर मुद्रांक शुल्क दयावे लागते काय ?
   

  मृत्युपत्राचे दस्तावर काहीही मुद्रांक शुल्क दयावे लागत नाही.
 • मृत्युपत्रकर्त्याने स्वतः नोंदणीसा� ी सादर केलेल्या मृत्युपत्राच्या नोंदणीची कार्यपध्दत साधारण काय असते?
   

  मृत्युपत्रकर्त्याने स्वतः नोंदणीसा� ी सादर केलेल्या मृत्युपत्राच्या नोंदणीची कार्यपध्दत इतर सर्वसाधारण दस्तांप्रमाणेच असते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]