मृत्युपत्र

 • मृत्युपत्र म्हणजे काय ?
   

  एखादया व्यक्तीने त्याच्या स्वकष्टार्जित स्थावर वा जंगम मिळकती वा एकत्र कुटंबाच्या वडिलोपार्जित मिळकतीतील त्याचा अविभक्त हिस्सा त्याचे मृत्युनंतर कोणास मिळावा / कोणास देण्यात यावा किंवा त्या मिळकतीची विल्हेवाट कशा रितीने लावण्यात यावी यासा ी तयार केलेला लेख म्हणजे मृत्युपत्र असे सर्वसाधारण म्हणता येईल. मृत्युपत्राला इच्छापत्र (will) असेही म्हटले जाते.
 • मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य ( Compulsory) आहे काय ?
   

  नाही. मृत्युपत्राची नोंदणी करणे वैकल्पिक (Optional) आहे.
 • मृत्युपत्राचा दस्त हा नोंदणी करणेस वैकल्पिक ( Optional) असून देखील नागरिक त्याची नोंदणी का करतात ?
   

  मृत्युपत्र नोंदणी केल्याने मृत्युपत्रकर्त्याचे मुत्युनंतर त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये मिळकतीबाबत वाद होण्याची शक्यता कमी होते. तसेच मिळकतीची व्यवस्था सुकर रितीने होण्यास मदत होते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]