आवश्यक शुल्के/फी

 • नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंगसा ी कोणकोणते शुल्क/फी भरावी लागते ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंगसा ी खालीलप्रमाणे शुल्क/फी भरावी लागते -

  • मुद्रांक शुल्क (Stamp Duty)
  • फायलिंग फी ( Filing Fee)
  • दस्त हाताळणी शुल्क (Document Handling Charges)
 • डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने झालेल्या कर्जव्यवहारासा ी (इक्विटेबल मार्गेज) दाखल करण्यात येत असलेल्या नोटीस ऑफ इंटिमेशनच्या नोटीशीस किती मुद्रांक शुल्क आवश्यक आहे ?
   

  महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुसची 1 चे अनुच्छेद 6(1) (Article 6(1) of Shedule 1) नुसार अशा प्रकरणांमध्ये पुढीलप्रमाणे मुद्रांक शुल्क देय आहे.
  अ.क्र कर्जाची रक्कम देय मुद्रांक शुल्क
  1 गहाणाद्वारे स्विकारलेली /स्विकारण्यात येणारी रक्कम रु. 5 लाखापेक्षा जास्त नसल्यास प्रति रु. 1000/- या रकमेवर रु. 1/- इतके मुद्रांक शुल्क. तथा॑पि कमीत कमी रु. 100/-
  2 गहाणाद्वारे स्विकारलेली /स्विकारण्यात येणारी रक्कम रु. 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास प्रति रु.1000/- या रकमेवर रु. 2/- तथापि जास्तीत जास्त रू.10 लाख

  तथापि याच कर्ज व्यवहाराचे अनुषंगाने निष्पादित करण्यात आलेल्या टिपण/चि ीवर (Memorandum ) या प्रमाणे मुद्रांक शुल्क लावलेले असल्यास त्या प्रकरणातील नोटीसीवर रुपये 100/- इतके मुदांक शुल्क देय आहे.
 • नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासा ी फायलिंग फी किती आहे ? ती कशी भरावी ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासा ी फायलिंग फी रुपये 1000/- इतकी आहे. ती शासनाच्या GRAS प्रणालीद्वारे ऑनलाईन भरावी लागते. सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 6- ई-पेमेंट
 • नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासा ी दस्त हाताळणी शुल्क किती आहे ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासा ी दस्त हाताळणी शुल्क प्रति नोटीस रुपये 300/- इतके आहे. ते दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने भरावे लागते.
 • दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस ऑफ इंटिमेशन फाईलिंगसा ी सादर करण्याची कालमर्यादा किती आहे ?
   

  गहाणाच्या व्यवहाराच्या दिनांकापासून (टायटल डीड डिपॉझिट केल्याच्या दिनांकापासून ) 30 दिवसांच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात त्याबाबतची नोटीस ऑफ इंटिमेशन फाईलिंगसा ी सादर करणे बंधनकारक आहे.
 • नोटीस ऑफ इंटिमेशन दुय्यम निबंधक कार्यालयात फाईलिंगसा ी सादर करणेस विलंब झाल्यास मुदतवाढ देण्याचे अधिकार कोणास आहेत ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन दुय्यम निबंधक कार्यालयात फाईलिंगसा ी सादर करणेस विलंब झाल्यास मुदतवाढ देण्याची तरतूद नोंदणी अधिनियम, 1908 मध्ये नाही.
 • फाईल केलेल्या नोटीस ऑफ इंटिमेशन संदर्भातील सूची 2 (Index 2)ची प्रमाणित नक्कल कोणाला मिळू शकते ?
   

  अर्ज करुन नक्कल फी भरणा-या कोणत्याही व्यक्तीस फाईल केलेल्या नोटीस ऑफ इंटिमेशन संदर्भातील सूची 2 (Index 2) ची प्रमाणित नक्कल मिळू शकते.
 • फाईल केलेल्या नोटीस ऑफ इंटिमेशन संदर्भातील सूची 2 (Index 2) कोणाला पाहता येतात / शोध कोणाला घेता येतो ?
   

  अर्ज करुन सर्च फी भरणा-या कोणत्याही व्यक्तीस फाईल केलेल्या नोटीस ऑफ इंटिमेशन संदर्भातील सूची .2 (Index 2) ची पाहणी करता येते. सविस्तर माहितीसा ी पहा, याच भागातील ' नोंदणी झालेल्या दस्तांच्या सूचींची (Index ) पाहणी (Inspection) / शोध ( Search)'
 • पक्षकारांना नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंगसा ी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता ऑनलॉईन फाईल करता येईल का ?
   

  होय. पक्षकारांना नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करणेसा ी दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष न जाता, संबंधित बँकेच्या शाखेतूनच ऑनलाईन पध्दतीने फाईल करता येते. या सुविधेस ई-फायलिंग म्हणतात. या संदर्भात सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 6 : ई-सर्व्हिसेस
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]