नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याची सर्वसाधारण कार्यपध्दत

 • नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याची सर्वसाधारण कार्यपध्दत काय असते ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासा ी सर्वसाधारण कार्यपध्दत खालीलप्रमाणे आहे.
  1. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली उपलब्ध असलेल्या PDE for Filing प्रणालीचा वापर करुन विहित नमुन्यातील नोटीस तयार करावी.
  2. सदर नोटीसवर योग्य मुद्रांक शुल्क भरावे.
  3. त्यावर नोटीसकर्त्याने (कर्ज घेणा-याने) स्वत:चा फोटो लावून सही करुन अंग याचा सा उमटवावा.
  4. संबंधित बँकेकडून सदरच्या नोटीसीमधील पक्षकाराचा फोटो सांक्षांकित करुन घ्यावा.
  5. फायलिंग फी रुपये 1000/- ई-पेमेंटद्वारे शासन जमा करावी.
  6. कर्ज घेणा-या व्यक्तीने संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष हजर राहून नोटीस सादर करावी. त्याबरोबर पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
  1) नोटीसकर्ता (कर्ज घेणा-या) व्यक्तीचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
  2) मुद्रांक शुल्क अन्य दस्तावर भरले असल्यास त्या दस्ताची सत्यप्रत.
  3) फायलिंग फी व मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा
  7. दुय्यम निबंधक यांनी नोटीस व कागदपत्राची छाननी करुन नोटीस फायलिंगसा ी स्विकारल्यास, रुपये 300/- दस्त हाताळणी शुल्क रोखीने दुय्यम निबंधकांकडे जमा करावे आणि दुय्यम निबंधकांकडून त्या रकमेची पावती आणि नोटीसीची पोचपावती घ्यावी.

 • फायलिंग करावयाच्या इक्विटेबल मॉर्गेज संदर्भातील नोटीस ऑफ इंटिमेशनमध्ये कोणत्या बाबी नमूद असणे आवश्यक आहे ?
   

  इक्विटेबल मॉर्गेज संदर्भात नोटीशीमध्ये -

  • कर्ज घेणा-याचे नाव व पत्ता-
  • कर्ज देणा-याचे ( बँक /वित्तीय संस्था) नाव व पत्ता-
  • कर्जव्यवहाराचा दिनांक -
  • कर्जाची रक्कम -
  • व्याजाचा दर -
  • निक्षेपित (Deposit) केलेल्या दस्तांची यादी -
  • त्या दस्तातील स्थावर मिळकतीचा तपशील -

  इत्यादी बाबी नमूद असणे आवश्यक आहे.
  नोटीसीचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Draft Notices या िकाणी उपलब्ध आहे.

 • नोटीस आफ इंटिमेशन कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात फाईल करावी लागते ?
   

  बँकेकडे डिपॉझिट केलेल्या टायटल डीडमधील मिळकत ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट आहे त्या दुय्यम निबंधक कार्यालयात सदर नोटीस फाईल करावी लागते.
 • एखादया कर्जव्यवहारामध्ये एकापेक्षा अधिक दुय्यम निबंधक यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकती समाविष्ट असतील तर कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस देणे आवश्यक आहे ?
   

  • एखादया कर्ज व्यवहारामध्ये एकापेक्षा अधिक दुय्यम निबंधक यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकती समाविष्ट असतील तर अशा प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात अशी स्वतंत्र नोटीस देणे आवश्यक आहे.
  • मूळ नोटीसीवर योग्य मुद्रांक शुल्क दिल्यानंतर इतर प्रत्येक नोटीसीला रुपये 100/- इतके मुद्रांक शुल्क देय आहे.
  • अशा प्रत्येक नोटीसीकरीता रुपये 1000/- इतकी फायलिंग फी व रुपये 300/- इतकी दस्त हाताळणी शुल्क त्या त्या दुय्यम निबंधक कार्यालयात भरणे आवश्यक आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]