नोटीस ऑफ इंटिमेशन

 • इक्विटेबल मॉर्गेज संदर्भात फायलिंग ऑफ नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय ? त्याबाबतची कायदेशीर तरतूद काय आहे ?
   

  मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 (एफ) मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत.
  त्यानुसार कर्जदाराने कर्ज घेण्यासा ी त्यांचेकडील हक्कलेख (Title Deeds) बँकेच्या ताब्यात देणे व बँकेने किंवा कर्जदाराने त्याबाबतचे टिपण तयार करणे पुरेसे असते. दोन्ही पक्षकारांनी मिळून करारनामा तयार करुन त्यावर सही करणे बंधनकारक नसते. तरी देखील काही प्रकरणामध्ये उभयपक्षांमध्ये लोन अग्रीमेंट किंवा तत्सम नावाचा करार निष्पादित होतो. मात्र त्या कराराची नोंदणी करण्याची पध्द्त नव्हती.
  डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीच्या कर्जव्यवहारांची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अभिलेखावर यावी, त्याद्वारे संबंधित पक्षकाराचे हित संरक्षित व्हावे तसेच त्या मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीसंदर्भात झालेल्या कर्जव्यवहारांची माहिती इतरांनाही व्हावी या उददेशाने नोंदणी अधिनियम,1908 मध्ये दि. 01/04/2013 पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.

  1. डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने होणा-या कर्जव्यवहारांसा ी जर बँक/वित्तीय संस्था आणि कर्ज घेणार यांचेदरम्यान Agreement किंवा अशा कोणत्याही नावाचा करारनामा निष्पादित करण्यात आला तर तो करार दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य (Compulsory) करण्यांत आले आहे. त्यासा ी कलम 17 मध्ये सुधारणा करण्यांत आली आहे.
  2. मात्र जर अशा कर्जव्यवहारामध्ये उभय पक्षांमध्ये असा कोणताही करारनामा निष्पादित करण्यात आलेला नसेल तर त्या कर्ज प्रकरणातील कर्ज घेणा-याने उक्त कर्जव्यवहाराबाबची माहिती नमूद असलेली नोटीस दुय्यम निबंधक कार्यालयात फायलिंगसा ी सादर केली पाहिजे, अशी तरतूद नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 89 ब मध्ये करण्यात आली आहे.

 • नोटीस ऑफ इंटिमेशन कधी व को े फायलिंगसा ी सादर करावयाची आहे ?
   

  नोटीस ऑफ इंटिमेशन कर्ज दिनांकापासून (टायटल डीड डिपॉझिट केल्याच्या दिनांकापासून ) 30 दिवसांच्या आत संबंधित नोटीसीतील स्थावर मिळकत ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येत असेल त्या दुय्यम निबंधक यांचेकडे फायलिंगसा ी सादर करावयाची आहे.

 • नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याबाबतची कार्यपध्दती कोणत्या नियमाद्वारे विहित करण्यात आलेली आहे ?
   

  महाराष्ट्र दस्तऐवजाच्या सत्य प्रती आणि नोटीसा दाखल करणे नियम, 2013 अन्वये, नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. सदर नियम नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Rules या िकाणी उपलब्ध आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]