इक्विटेबल मॉर्गेज

  • इक्विटेबल मॉर्गेज (Equitable Mortgage) म्हणजे नेमके काय ?
     

    मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 मध्ये गहाण व्यवहारासंबंधी (Mortgage) तरतुदी आहेत. यातील खंड (एफ) मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार कर्ज घेणार व्यक्ती संबंधित मिळकतीचे हक्कलेख कर्ज देणा-याकडे निक्षेपित (जमा) करुन (By way of Depositing of Title Deeds) कर्जाची रक्कम प्रतिभूतीत (Secure) करु शकते. ही कार्यवाही केवळ राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे रवून दिलेल्या शहरांमध्ये करता येते. या पध्दतीला इक्विटेबल मार्गेज किंवा Mortgage by way of depositing of title deeds असे संबोधले जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]