शोध फी

 • दुय्यम निबंधक कार्यालयात दस्ताची /सूचीची पाहणी (Inspection) / शोध (Search) सा ी किती फी असते ?
   

  नोंदणी फी तक्त्याचे अनुच्छेद 10 नुसार शोध /पाहणी फी चे दर पुढीलप्रमाणे आहेत.
  अ.क्र. तपशील शोध फी चे दर
  1 मिळकतीचा तपशील माहीत आहे, तथापि दस्त क्रमांक माहीत नाही किंवा निश्चित वर्ष माहीत नाही एका मिळकतीच्या दस्तांचा शोध घेण्यासा ी पहिल्या 12 वर्षासा ी किमान रु.300/- व त्यांनतर प्रति वर्ष रु. 25/- या दराने.
  2 मिळकतीचा तपशील माहीत नाही, दस्त क्रमांक माहीत नाही किंवा निश्चित वर्ष माहीत नाही मात्र एखाद्या पक्षकाराचे नाव माहीत आहे. एका पक्षकाराच्या दस्तांचा शोध घेण्यासा ी पहिल्या 12 वर्षासा ी किमान रु.300/- व त्यांनतर प्रति वर्ष रु. 25/- या दराने.
  3 निश्चित दस्त क्रमांक व वर्ष माहीत असल्यास प्रति दस्त रु. 25/-.

 • शोध (Search) फी कशी भरावी ?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयातील अभिलेख पाहणी / शोधासा ीची फी शासनाच्या GRAS (Government Receipt and Accounting System ) प्रणालीद्वारे भरावी लागते. मात्र सदर फी रु. 300/- पेक्षा कमी असेल तर रोखीने भरता येईल. (GRAS प्रणालीबाबत सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 5 -ई-पेमेंट.) तसेच जेथे सामाईक कार्यक्षेत्र (Concurrent Jurisdiction) आहे, त्या सामाईक कार्यक्षेत्रातील कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात शोध फी भरल्यास, त्या कार्यक्षेत्रातील इतर सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या त्याच मिळकतीच्या त्याच कालावधीतील दस्तांचा शोध स्वतंत्र फी न भरता घेता येतो.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]