शोध (search) घेण्याची कार्यपध्दत

 • मिळकतीशी संबंधित नोंदणी झालेल्या दस्तऐवजांची पाहणी (Inspection) /शोध (search) घेण्याची कार्यपध्द्ती काय आहे ?
   

  मिळकतनिहाय किंवा पक्षकारनिहाय शोध घेण्यासा ी दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेखांची प्रत्यक्ष पहाणी करता येते. त्या पाहणीकरिता -

  1. संबंधित दुय्यम निबंधकांकडे अर्ज करावा. त्या अर्जामध्ये -

   अ. मिळकतनिहाय शोध घ्यावयाचा असल्यास मिळकतीचे गाव व मिळकत क्रमांक नमूद करावा किंवा पक्षकारनिहाय शोध घ्यावयाचा असल्यास त्या व्यक्तीचे नाव नमूद करावे. तसेच,
   ब. कोणत्या कालावधीतील दस्तांचा शोध घ्यावयाचा आहे तो कालावधी नमूद करावा.
  2. अनुज्ञेय शोध फी भरावी.
  3. त्यानंतर दुय्यम निबंधक संबंधित मिळकतीच्या व संबंधित कालावधीच्या दस्तांच्या सूची पाहणीसा ी उपलब्ध करुन देतील.


  याशिवाय मिळकतनिहाय दस्तांच्या सूचींचा शोध घेण्याकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online services या सदराखाली e- Search या िकाणी उपलब्ध असलेल्या ' ई-सर्च ' प्रणालीचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासंदर्भात सविस्तर माहितीसा ी कृपया पहा या पुस्तकातील भाग 6 - ई -सर्व्हिसेस

 • दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची प्रत्यक्ष पाहणी (Inspection) / शोध (search ) घेण्यासा ी कोणत्या नमुन्यात अर्ज करावा लागतो ?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची प्रत्यक्ष पाहणी (Inspection) / शोध (search ) घेण्यासा ीच्या अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Forms या िकाणी उपलब्ध आहे.
 • मिळकतनिहाय दस्तांचा शोध घेण्यासा ी कोणती विशेष दक्षता घ्यावी ?
   

  आपणास ज्या मिळकतीसंदर्भात नोंदणी झालेल्या दस्तांचा शोध घ्यावयाचा असेल, त्या मिळकतीचा सध्याचा क्रमांक, शोधाच्या संपूर्ण कालावधीमध्ये बदललेला नाही याची खात्री करावी. जर काही कालावधीपूर्वी वेगळा क्रमांक असल्यास, पूर्वीच्या कालावधीसा ी जुन्या मिळकत क्रमांकनिहाय शोध घ्यावा व नंतरच्या कालावधीसा ी नवीन क्रमांकानुसार शोध घ्यावा.
  उदा- आपणास ' ब ' या गावातील गट नंबर 15 या मिळकतीच्या सन 2002 ते 2014 या कालावधीतील दस्तांचा शोध अपेक्षित आहे. ' ब ' हे गाव सन 2006 पर्यंत ' अ ' या गावाचा भाग होते व आपल्या मिळकतीचा त्यावेळी गट नंबर 530 होता तर,

  1. सन 2002 ते 2006 या कालावधीतील ' अ ' या गावातील गट नंबर 530 या मिळकती संदर्भात नोंदणी झालेल्या दस्तांचा शोध घ्या. (सूचीची पहाणी करा) व
  2. सन 2007 ते 2014 या कालावधीतील ' ब ' गावातील गट नंबर 15 या मिळकतीसंदर्भात नोंदणी झालेल्या दस्तांचा शोध घ्या. (सूचीची पहाणी करा)

 • ई-सर्च (e-Search) बद्दल माहिती सांगा.
   

  एखाद्या मिळकतीसंदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्तांच्या सूचींची पाहणी करण्यासा ी दुय्यम निबंधक कार्यालयात न येता, इंटरनेटद्वारे घरबसल्या पाहणी करता येते. या सुविधेस ई-सर्च सुविधा असे म्हणतात. ही सुविधा नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Online services या सदराखाली e- Search या िकाणी उपलब्ध आहे. सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 6 : ई-सर्व्हिसेस
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]