पाहणी/शोध ( Inspection & search)

 • दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची व सूचींची पाहणी/शोध (Inspection & Search) म्हणजे काय ?
   

  एखादया मिळकतीसदंर्भात पूर्वी कोणत्या दस्ताची नोंदणी पूर्ण झाली आहे याची दुय्यम निबंधक कार्यालयातील अभिलेखांची पाहणी करून माहिती घेणे याला पाहणी/शोध (Inspection & Search) घेणे असे संबोधले जाते. हा शोध (Search) पुढील मार्गाने घेता येतो.
  अ. मिळकतीसंदर्भात नोंदणी झालेल्या दस्ताचा अनुक्रमांक/ वर्ष माहित असल्यास त्या विशिष्ट दस्त / त्या दस्ताच्या सूची 2 ची पाहणी करणे (दस्तनिहाय) किंवा
  ब. मिळकतीसंदर्भात नोंदणी झालेल्या दस्ताचा अनुक्रमांक/ वर्ष माहित नसल्यास १.त्या विशिष्ट मिळकतीसंबधी नोंदणी झालेल्या सर्व दस्तांच्या / त्या दस्तांच्या सूची क्र. 2 ची पाहणी करणे ( मिळकतनिहाय) किंवा
  २.विशिष्ट व्यक्ती पक्षकार असलेल्या सर्व दस्तांची / त्या दस्तांच्या सूची क्र.1 ची पाहणी करणे (नावनिहाय)

 • नोंदणी झालेल्या दस्तऐवजांची पाहणी (Inspection) /शोध (search) कोणाला घेता येतो ?
   

  अ. दस्तांच्या पाहणी / शोधासा ी विहित केलेली फी प्रदान करणा-या कोणत्याही व्यक्तीस दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या पुस्तक क्रमांक 1 मधील दस्तांचा (उदा. खरेदीखते, बक्षीसपत्रे, भाडेपट्टे इ.) व त्या दस्तांच्या सूची 1 व 2 ची पाहणी करता येते.
  ब. पुस्तक क्रमांक 2 मध्ये दस्त नोंदणीस नाकारल्याची कारणे नमूद असतात. त्याची पाहणी करता येत नाही.
  क. पुस्तक क्रमांक 3 मध्ये नोंदणी करण्यात आलेले मृत्युपत्र व पुस्तक क्र. 4 मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या ( उदा- जंगम मिळकतीची खरेदीखते इ.) दस्ताची पाहणी केवळ दुय्यम
  निबंधक यांनाच करता येते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]