नोंदणी झालेल्या दस्ताची प्रमाणित नक्कल (Certified Copy )

 • नोंदणी झालेल्या दस्ताची प्रमाणित नक्कल (Certified Copy ) कोणाला घेता येते ?
   

  1. स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्त उदा. खरेदीखत, भाडेपट्टा, लीव्ह अँन्ड लायसन्स इ. दस्त पुस्तक क्रमांक 1 मध्ये नोंदविण्यात येतात. अशा पुस्तक 1 मध्ये नोंदविलेल्या दस्ताची प्रमाणित नक्कल कोणत्याही व्यक्तीस अर्ज करुन नक्कल फी भरुन घेता येते.
  2. विक्रीचे अधिकार नसलेले मुखत्यारपत्र (Power of Attorney) व दत्तकपत्र (Adoption Deed) इत्यादी दस्त संकीर्ण म्हणून ेवलेल्या पुस्तक 4 मध्ये नोंदविण्यात येतात. अशा पुस्तक 4 मध्ये नोंदलेल्या दस्ताची प्रमाणित नक्कल दस्त ज्याने सही केलेला आहे त्यास किंवा दस्तातील दावेदार (लाभार्थी) यांनाच अर्ज करुन नक्कल फी भरुन घेता येते.

 • नोंदणी झालेल्या दस्ताच्या प्रमाणित नकलेसा ी किती फी असते ?
   

  नोंदणी झालेल्या दस्ताच्या प्रमाणित नकलेसा ी पुढीलप्रमाणे फी असते -
  अ) प्रमाणित नक्कल फोटोकॉपी पध्दतीने तयार केल्यास किंवा संगणकीकृत अ॑भिलेखावरुन तयार केल्यास प्रति पान रुपये 5/-
  ब) प्रमाणित नक्कल अन्य प्रकारे तयार केल्यास ( उदा-
  नचित्रपट्टी (फोटो फिल्म निगेटीव्ह ) वरुन तयार केल्यास किंवा हस्तलिखीत प्रतीवरून तयार केल्यास) - प्रति पान रुपये 20/-
  या फी शिवाय दस्ताच्या प्रत्येक प्रमाणित नकलेस रुपये 20/- चा न्यायालयीन मुद्रांक (कोर्ट फी लेबल) अर्जदाराने पुरविणे आवश्यक आहे.

 • नोंदणी झालेल्या मृत्युपत्राच्या दस्ताची प्रमाणित नक्कल (Certified Copy) कोणाला घेता येते ?
   

  मृत्युपत्र हे नोंदणी पुस्तक क्रमांक 3 मध्ये नोंदविण्यात येते. अशा पुस्तकात नोंदलेल्या मृत्युपत्राची प्रमाणित नक्कल ही, अ) मृत्युपत्रकर्त्यास स्वतःला अर्ज करुन नक्कल फी भरुन किंवा त्याने प्रमाणित नक्कल प्राप्त करुन घेण्याचे अधिकार दिलेल्या व्यक्तीस घेता येते. ब) मृत्युपत्रकर्ता यांचे मृत्यूनंतर मृत्युपत्रकर्ता मयत असल्याचे प्रमाणपत्र दुय्यम निबंधकाना सादर केल्यास कोणत्याही व्यक्तीस अर्ज करुन नक्कल फी भरुन घेता येते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]