सूचीच्या प्रमाणित नकला (Certified Copy of Index)

 • नोंदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल (Certified Copy ) कोणाला घेता येते ?
   

  1. सूची 1 व सूची 2 ची प्रमाणित नक्कल कोणत्याही व्यक्तीस अर्ज करुन व फी भरुन घेता येते.
  2. मृत्युपत्राच्या सूची 3 ची प्रमाणित नक्कल -
   अ) मृत्युपत्रकर्त्यास किंवा त्याचे प्रतिनिधी यांनाच अर्ज करुन फी भरुन घेता येते.
   ब) मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर कोणत्याही व्यक्तीस अर्ज करुन नक्कल फी भरुन घेता येते.
  3. दस्ताच्या सूची 4 ची प्रमाणित नक्कल तो दस्त ज्याने सही केलेला आहे त्यास किंवा दस्तातील दावेदार (लाभार्थी ) यांनाच अर्ज करुन नक्कल फी भरुन घेता येते.
 • नोंदणी झालेल्या दस्ताच्या सूचीच्या प्रमाणित नकलेसा ी किती फी असते ?
   

  नोंदणी झालेल्या दस्ताच्या सूचीच्या प्रमाणित नकलेसा ी रू. 5/- प्रति नक्कल इतकी फी आहे. या फी शिवाय प्रत्येक नकलेस रू. 20/- चा न्यायालयीन मुद्रांक ( कोर्ट फी लेबल ) अर्जदाराने पुरविणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]