सूची व त्यांचे प्रकार

 • सूची (Index) म्हणजे काय ?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्तासंदर्भातील महत्वाच्या बाबी (जशा की दस्ताचा प्रकार, दस्त क्रमांक, मोबदला, बाजारभाव, मिळकतीचा तपशील, पक्षकाराचे नाव व पत्ता, निष्पादन दिनांक, नोंदणी दिनांक, भरलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी इत्यादी ) दर्शविणारा गोषवारा म्हणजे दस्ताची सूची होय. या सूची नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 55 नुसार तयार करण्यात येतात.
 • नोंदणी झालेल्या दस्ताची सूची कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्ताच्या प्रकारानुसार सूची 1, सूची 2, सूची 3 किंवा सूची 4 अशा सूची तयार करण्यात येतात.

  • स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्ताच्या बाबतीत (उदा. खरेदीखत, भाडेपट्टा, लिव्ह अँन्ड लायसन्स इ.) सूची 1 व 2 तयार केल्या जातात. सूची 1 दस्तातील पक्षकाराच्या पहिल्या नावाच्या आद्याक्षरानुसार तयार केल्या जातात. तर सूची 2 दस्तातील मिळकत ज्या गावातील आहेत त्या गावानुसार तयार केली जाते.
  • मृत्यूपत्राचे बाबतीत सूची 3 तयार केली जाते .
  • संकीर्ण स्वरूपाच्या इतर दस्ताच्या बाबतीत ( उदा. जंगम मालमत्तेचे दस्त इ.) सूची 4 तयार केली जाते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]