दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये बनावटीकरण केल्यास

 • दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या बाबी शिक्षापात्र गुन्हा रतात ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 82 नुसार खालील कृत्ये शिक्षापात्र गुन्हा रतात.

  • दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये, कोणतेही खोटे निवेदन करणे(False Statement)
  • दस्त नोंदणीसा ी खोटया/बनावट कागदपत्रांचा वापर करणे(False Document)
  • कबुलीजबाबासा ी खोटया/तोतया व्यक्तीने दुय्यम निबंधकासमोर उपस्थित राहून खोटया नावाने कबुलीजबाब देणे( Impersonation)
  • त्याचप्रमाणे खोटया/तोतया व्यक्तीची खरी व्यक्ती म्हणून ओळख पटविणे(False Indentification)
  • वरील कृती करणेस प्रोत्साहन/चिथावणी देणे. (Abettment)

  यासंदर्भातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक दिनांक 30/11/2013 नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circular या िकाणी उपलब्ध आहे.

 • एखादया व्यक्तीने नाोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 82 अन्वये गैरकृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यास फौजदारी कारवाई सुरु करण्यास सक्षम प्राधिकारी कोण आहे ?
   

  एखादया व्यक्तीने नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 82 अन्वये गैरकृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यास संबंधित दुय्यम निबंधक स्वत:हून किंवा जिल्हा निबंधक/नोंदणी महानिरीक्षक यांच्या मान्यतेने त्याचेविरुध्द फाैजदारी कारवाई सुरु करु शकतात.
 • नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 82 अन्वये शिक्षापात्र करणारे गैरकृत्य केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते ?
   

  नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 82 नुसार केलेल्या गैरकृत्याबाबत अपराध सिध्दीनंतर सात वर्षांपर्यंत वाढविता येईल, असा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]