दुय्यम निबंधकाचे दस्त नोंदणी विषयक कार्यक्षेत्राबाबत (Jurisdiction)

 • नोंदणी पोटतुकडी (Sub-District) म्हणजे काय?
   

  नोंदणी पोटतुकडी (Sub-District) म्हणजे दुय्यम निबंधकाचे कार्यक्षेत्र (Jurisdiction) होय. नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 5 नुसार साधारणपणे काही महसुली गावांचा समावेश करुन निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रास नोंदणी पोटतुकडी असे म्हणतात.
 • नोंदणी पोटतुकडीच्या सीमा निश्चित करण्याचे किंवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
   

  नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 5 नुसार, नोंदणी पोटतुकडीच्या सीमा निश्चित करण्याचे किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. राज्य शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिध्द करुन, नवीन नोंदणी पोटतुकडी निर्माण करु शकते किंवा त्यांच्या सीमांमध्ये फेरबदल करु शकते.
 • सध्या अस्तित्वात असलेल्या नोंदणी पोटतुकडयांच्या व कार्यक्षेत्रासंबधीच्या अधिसूचना को े उपलब्ध होऊ शकतील ?
   

  सध्या अ॑स्तित्वात असलेल्या नोंदणी पोटतुकडयांच्या कार्यक्षेत्रासंबधीच्या अधिसूचना - 1. संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये व 2. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Notifications या िकाणी उपलब्ध आहेत.
 • स्थावर मिळकतीवर परिणाम करणारे दस्त कोणत्या कार्यालयात नोंदवावे लागतात?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 28 नुसार, नोंदणी करावयाच्या दस्तात नमूद असलेल्या मिळकतीचा काही किंवा पूर्ण भाग हा ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होत असेल, त्या दुय्यम निबंधक कार्यालयात उक्त दस्त नोंदणी करणे आवश्यक आहे. सामाईक कार्यक्षेत्राचे (Concurrent Jurisdiction) बाबतीत असे दस्त त्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतात.
 • स्थावर मिळकतीवर परिणाम न करणारे दस्त कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतात ?
   

  स्थावर मिळकतीवर परिणाम न करणारे दस्त त्यातील पक्षकार ज्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करीत असतील किंवा ज्या दुय्यम निबंधकाच्या कार्यक्षेत्रात दस्त निष्पादित करण्यांत आला असेल किंवा पक्षकारांना जे दुय्यम निबंधक कार्यालय सोयीस्कर असेल, अशा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतात.
 • सामाईक कार्यक्षेत्रे (Concurrent Jurisdiction) म्हणजे काय ?
   

  ज्या नोंदणी पोटतुकडीमध्ये (कार्यक्षेत्र) एकापेक्षा जास्त नोंदणी कार्यालये (दुय्यम निबंधक कार्यालये) कार्यरत असतील अशा कार्यक्षेत्रास सामाईक कार्यक्षेत्र (Concurrent Jurisdiction) म्हणतात.
 • सामाईक कार्यक्षेत्रांची (Concurrent Jurisdiction) व त्यामधील दुय्यम निबंधक कार्यालयांची यादी को े पाहता येईल?
   

  सामाईक कार्यक्षेत्रांची (Concurrent Jurisdiction) व त्यामधील दुय्यम निबंधक कार्यालयांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisations या सदराखाली Offices या िकाणी उपलब्ध आहे.
 • दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक यांच्यामध्ये कोणता फरक आहे? त्यांच्या दस्त नोंदणी विषयक अधिकारात व कर्तव्यात काय फरक असतो ?
   

  सामाईक कार्यक्षेत्राचे (Concurrent Jurisdiction) बाबतीत मूळ दुय्यम निबंधकाचे बरोबरीने नियुक्त करण्यात आलेल्या इतर दुय्यम निबंधक यांना सह दुय्यम निबंधक असे संबोधले जाते. दुय्यम निबंधक आणि सह दुय्यम निबंधक यांच्या दस्त नोंदणी विषयक अधिकार व कर्तव्ये यामध्ये कोणताही फरक नसतो.
 • एखाद्या दस्तात एकापेक्षा जास्त कार्यक्षेत्रात मोडणा-या स्थावर मिळकती असतील तर तो दस्त कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतो?
   

  त्या दस्तातील मिळकतीपैकी कोणतीही एक मिळकत, ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात समाविष्ट होत आहे, अशा दुय्यम निबंधक कार्यालयात अशा प्रकारचा दस्त नोंदविता येतो.
 • एकाच नोंदणी तुकडीतील (जिल्हयातील) वेगवेगळया नोंदणी पोटतुकडीतील मिळकतींचा (properties within multiple sub districts of same Registration District ) समावेश असलेला दस्त नोंदल्यास, दुय्यम निबंधक यांनी कोणती कार्यवाही करणे आवश्यक आहे?
   

  एकाच नोंदणी तुकडीतील (जिल्हयातील) वेगवेगळया नोंदणी पोटतुकडीतील मिळकतींचा (properties within multiple sub districts of same Registration District ) समावेश असलेला दस्त नोंदणी केल्यानंतर, तो दुय्यम निबंधक दस्तामध्ये समाविष्ट असणा-या इतर मिळकती संदर्भात, त्या मिळकती ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत अशा दुय्यम निबंधकांना, त्याबाबत मेमो (दस्ताचा सूचीसदृष्य गोषवारा) पा वतो. ते दुय्यम निबंधक आपल्याकडील अभिलेखामध्ये त्या मेमोची नोंद घेतात. उदा – पुणे (ग्रामीण) जिल्हयातील “भोर” व “वेल्हा” या दोन नोंदणी पोटतुकडीतील मिळकतींचा समावेश असलेल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक वेल्हा यांच्याकडे करण्यांत आली तर दुय्यम निबधक, वेल्हा, भोर कार्यक्षेत्रातील मिळकतीसंबंधीचा मेमो दुय्यम निबंधक, भोर यांच्याकडे पा वितात. दुय्यम निबंधक, भोर आपल्याकडील अभिलेखात त्या मेमोची नोंद घेतात.
 • वेगवेगळया जिल्हयातील मिळकतींचा (properties within multiple Registration districts) समावेश असलेला दस्त नोंदल्यास, दुय्यम निबंधक यांनी कोणती कार्यवाही करणे आवश्यक आहे?
   

  वेगवेगळया जिल्हयातील मिळकतींचा (properties within multiple Registration districts) समावेश असलेला दस्त नोंदणी केल्यानंतर, तो दुय्यम निबंधक दस्तामध्ये समाविष्ट असणा-या इतर मिळकती संदर्भात, त्या मिळकती ज्या जिल्हा निबंधक यांचे कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत, अशा जिल्हा निबंधकांना, त्या दस्ताची प्रत व मेमो (दस्ताचा सूचीसदृष्य गोषवारा) पा वतो. असा जिल्हा निबंधक, आपल्याकडील अभिलेखामध्ये त्या प्रतीची नोंद घेतात व प्राप्त झालेल्या मेमो ची प्रत त्याचे जिल्हयातील ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात अशा मिळकती असतील, त्या दुय्यम निबंधकास पा वतात. असे दुय्यम निबंधक आपल्याकडील अभिलेखात सदरील मेमोची नोंद घेतात. ( उदा – पुणे जिल्हयातील सासवड कार्यक्षेत्रातील व ाणे जिल्हयातील जव्हार कार्यक्षेत्रातील मिळकतींचा समावेश असलेल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक, सासवड यांच्याकडे करण्यांत आला तर, दुय्यम निबंधक, सासवड हे ाणे येथील जिल्हा निबंधकांकडे दस्ताची प्रत व मेमो पा वतात. ाणे येथील जिल्हा निबंधक अशी प्राप्त झालेली दस्ताची प्रत त्यांच्या अभिलेखात नोंदवितात व मेमोची प्रत त्यांच्या जिल्हयातील, दुय्यम निबंधक, जव्हार यांचेकडे पा वतात. दुय्यम निबंधक, जव्हार सदरील मेमोची नोंद आपल्याकडील अभिलेखात घेतात. )
 • अनेक कार्यक्षेत्रातील मिळकतीचा समावेश असलेला दस्त नोंदणी करताना यासा ी जादा फी किती असते ?
   

  अनेक कार्यक्षेत्रातील मिळकतीचा समावेश असलेला दस्त, नोंदणी करताना नोंदणी फी व्यतिरीक्त प्रत्येक कार्यक्षेत्राप्रमाणे रु. 5/- इतकी मेमो फी आकारली जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]