नोंदणी करणे ऐच्छिक/वैकल्पिक (Optional) असलेले दस्त

 • नोंदणी कायदयानुसार कोणत्या दस्ताची नोंदणी करणे ऐच्छिक/वैकल्पिक (Optional) आहे ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 18 मध्ये नोंदणीस वैकल्पिक (Optional) असलेले दस्त अंतर्भूत केलेले आहेत. ते साधारणपणे पुढीलप्रमाणे-

  1. जे दस्त नोंदणी अधिनियम,1908 च्या कलम 17 मध्ये समाविष्ट नाहीत, म्हणजेच नोंदणी करणे अनिवार्य नाहीत.
  2. मृत्युपत्र (Will)
  3. नोटीस ऑफ लिस पेंडन्स (Notice of lis pendence)
  4. एक वर्षापेक्षा कमी कालावधी असलेले स्थावर मिळकतीचे भाडेपट्टे इ.
 • हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटणीपत्र नोंदणी करणे अनिवार्य आहे का ?
   

  हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीची मिळकत वाटप होऊन कुटुंबातील सहधारकाला प्राप्त होणे हे हस्तांतरण या संज्ञेखाली येत नसल्याने अशा वाटणीपत्राची नोंदणी अनिवार्य नाही.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]