नोंदणी करणे अनिवार्य (Compulsory) असलेले दस्त

 • नोंदणी कायदयानुसार कोणत्या दस्तांची नोंदणी करणे अनिवार्य (Compulsory) आहेत?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 17 मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असलेले दस्त प्रकार अंतर्भूत केलेले आहेत. त्यातील प्रमुख दस्त प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

  1. ज्या दस्ताद्वारे लिहून देणार व लिहून घेणार यांचे हक्क, हितसंबध व अधिकार निर्माण, घोषित, हस्तांतरित किंवा संपुष्टात येणार आहेत व ज्या दस्तातील स्थावर मिळकतीचे मूल्य रुपये 100/-व त्यापेक्षा अधिक आहे असे दस्त. उदा :-जमिनीचे खरेदीखत, सदनिकेचे विक्री करार इ.
  2. स्थावर मिळकतीचे दानपत्र (बक्षीसपत्र)
  3. स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाशी संबंधित अधिकार प्रदान करणारे कुलमुखत्यारपत्र इ. ( याशिवाय भाडेकरू नियंत्रण कायदा,1999 चे कलम 55 नुसार संमती नि परवानगी (Leave and License) च्या दस्ताची नोंदणी करणे अनिवार्य आहे. )

 • नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या दस्ताची नोंदणी न केल्यास काय नुकसान होऊ शकते ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 17 मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या दस्तांची यादी नमूद केली आहे. या प्रकारचे दस्त नोंदणी केले नाहीत तर- • अशा दस्ताच्या आधारे हस्तांतरित होणारे हक्क प्रस्थापित ( सिध्द् ) होत नाहीत. • नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 49 नुसार, ते दस्त त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा म्हणून स्विकारले जात नाहीत. • मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, 1882 नुसार विक्रीखत, गहाणखत, भाडेपट्टा व बक्षीसपत्र हे दस्त नोंदणी केले नसतील तर त्यानुसार मिळकतीचे हस्तांतरण होत नाही. • अशा दस्तातील पक्षकार, दस्तामध्ये नमूद अटी व शर्ती/ व्यवहाराची पूर्तता करणेस टाळाटाळ करण्याची शक्यता असते. • अशा दस्तामध्ये नमूद उर्वरित व्यवहाराची पूर्तता करण्याकरिता सक्षम न्यायालयात दाद मागण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. • असा दस्त शासकीय अभिलेखाचा भाग होत नाही. त्यामुळे भविष्यात मूळ पक्षकारांच्या वारसांमध्ये वाद निर्माण झाल्यास अथवा अन्य कारणांसा ी गरज निर्माण झाल्यास त्या दस्ताच्या सत्यतेबाबत सरकारी पुरावा उपलब्ध होत नाही. • शिवाय इतर जनतेला त्या दस्ताबाबत म्हणजेच त्या दस्तातील व्यवहाराबाबत माहिती मिळण्याचा मार्ग शिल्लक रहात नाही, याचा गैरफायदा घेऊन त्या मिळकतीची पुन्हा विक्री होण्याची शक्यता शिल्लक राहते व त्यापध्दतीने मूळ खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]