दस्त नोंदणी करण्याचे फायदे

 • दस्ताची नोंदणी का करावी ? त्याचे फायदे काय आहेत?
   

  दस्त नोंदणी केल्यास खालील फायदे होतात-

  1. नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 49 नुसार, संबंधित दस्त त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा (Legal evidence) म्हणून स्विकारला जातो.
  2. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम,1882 नुसार, विक्रीखत (Sale Deed), गहाणखत (Mortgage Deed ), भाडेपटटा (Lease Deed) व बक्षीसपत्र (Gift Deed) हे दस्त नोंदणी केले तरच त्यानुसार मिळकतीचे हस्तांतरण होते.
  3. नोंदणी केल्यास त्या दस्ताचे आधारे हस्तांतरित होणारे हक्क प्रस्थापित होतात.
  4. नोंदणी केल्यास त्या दस्तातील पक्षकार, दस्तामध्ये नमूद अटी व शर्ती/ व्यवहारास बांधील राहतात.
  5. नोंदणी केल्यास त्या दस्तामध्ये नमूद व्यवहाराची पूर्तता करणेकरिता सक्षम न्यायालयात दाद मागता येते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]