दुय्यम निबंधकांनी दस्त नोंदणी नाकारल्यास

 • दस्ताची नोंदणी नाकारताना दुय्यम निबंधक यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे ?
   

  दुय्यम निबंधक यांना दस्ताची नोंदणी नाकारावयाची असेल तर त्यांनी नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 71 नुसार-

  1. दस्त नोंदणी नाकारण्याची कारणे नमूद करून लेखी आदेश पारित करणे
  2. सदर आदेशातील कारणे नोंदणी पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद करणे
  3. दस्त नोंदणीस नाकारला ' अशा आशयाचे पृष् ांकन/शेरा दस्तावर नमूद करून दस्त संबंधित पक्षकारास परत करणे.
  4. पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या नोंदीच्या प्रतीसा ी दस्तातील निष्पादक किंवा दावेदार

  पक्षकाराने अर्ज केल्यास त्याची प्रत विनाशुल्क व विनाविलंब त्यांना पुरविणे आवश्यक आहे.

 • दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीस नाकारल्यास त्यांचे आदेशाविरुध्द कोणाकडे व किती दिवसात अपील करता येते ?
   

  दुय्यम निबंधक यांनी दिलेल्या नोंदणी नाकारण्याच्या आदेशाविरुध्द संबंधित पक्षकारास जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांचेकडे अपील दाखल करता येते. असे अपील दुय्यम निबंधक यांनी दिलेल्या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांत दाखल करता येते.
 • दस्त नोंदणीस नाकारल्याच्या आदेशाविरुध्दच्या अपीलासा ी किती फी आकारली जाते?
   

  दस्त नोंदणीस नाकारल्याच्या आदेशाविरुध्दच्या अपीलासा ी फी नसते. मात्र अशा अपील अर्जावर रुपये 5/- चे न्यायालयीन मुद्रांक (कोर्ट फी लेबल) चिकटविणे आवश्यक आहे.
 • जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी अपीलामध्ये, दस्त नोंदणी करण्याचा आदेश देण्यास नकार दिला तर त्याविरुध्द कोणत्या प्राधिकरणाकडे दाद मागता येते ?
   

  जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी अपीलामध्ये दस्त नोंदणी करण्याचा आदेश देण्यास नकार दिला तर पक्षकारांना कलम 77 अन्वये जिल्हा दिवाणी न्यायालयात जिल्हा निबंधक यांच्या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत दावा दाखल करता येतो.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]