दस्त नोंदणीनंतरची कार्यवाही

 • दस्ताची नोंदणी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / पुरावा नेमका काय असतो ?
   

  दस्त नोंदणी पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणजे नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 60 नुसार दस्तावर दिलेले ' दस्त नोंदविला ' अशा मजकुराचे व संबंधित दुय्यम निबंधक यांनी दिनांक नमूद करुन स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र व त्याशेजारी उमटविलेली गोल मुद्रा (Seal). नोंदणी अधिनियमातील सर्व तरतुदींची पूर्तता झाल्याने दस्त नोंदविण्यात आलेला आहे असा या प्रमाणपत्राचा अर्थ असतो.
 • दस्ताचे स्कॅनिंग म्हणजे नेमके काय ?
   

  नोंदविलेल्या दस्ताची प्रतिलिपी (copy) तयार करण्यासा ी नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 16 अ नुसार, विहीत करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया म्हणजे स्कॅनिंग होय. नोंदणी झालेल्या दस्तांची प्रतिलिपी (copy) दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित पुस्तकामध्ये ेवून जतन करावी लागते. प्रतिलिपी (copy) करण्यासा ी पूर्वी हस्तलिखित, छाया॑चित्रण, फोटोकॉपी अशा पध्दती होत्या. सन 2002 पासून संगणकीकृत नोंदणी प्रणालीचा वापर सुरू करण्यात आल्यानंतर दस्तांचे स्कॅनिंग करून, ती Scanned Image दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अभिलेखात प्रतिलिपी (copy) म्हणून ेवली जाते.
 • दस्ताचे स्कॅनिंगसा ी साधारण किती वेळ लागतो ?
   

  नोंदणी झालेला दस्त हा किती पानांचा आहे यावर स्कॅनिंग करणेस लागणारा वेळ अवलंबून आहे. सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात हाय स्पीड स्कॅनर उपलब्ध असल्याने स्कॅनिंग ताबडतोब पूर्ण करुन दिले जाते.
 • दस्त नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दस्त नोंदणीस सादर करणा-या व्यक्तीस दुय्यम निबंधक कार्यालयातून कोणती कागदपत्रे मिळतात ?
   

  दस्त नोंदणी पूर्ण झालेनंतर दस्त नोंदणीस सादर करणा-या व्यक्तीस दुय्यम निबंधक कार्यालयातून- 1. मूळ दस्त, 2. थंबनेल प्रिंट, 3. दस्ताची Scanned Image असलेली सीडी व 4. सूची 2 (INDEX-II) ची प्रत ही सर्व कागदपत्रे विनामूल्य दिली जातात.
 • थंबनेल प्रिंट म्हणजे काय ? ती कशासा ी दिली जाते ?
   

  मूळ दस्ताचे स्कॅनिंग योग्य पध्दतीने झाले आहे का, त्यातील एखादे पान स्कॅन करायचे राहीले आहे का किंवा अर्धवट स्कॅन झाले आहे का, या बाबींची खात्री पक्षकारांस मूळ दस्त परत देण्यापूर्वीच करणे गरजेचे असते. त्याकरिता स्कॅनिंग झाल्यानंतर त्या स्कॅन्ड इमेजवरुन एका पानावर दस्ताची चार पाने या प्रमाणात प्रिंट काढली जाते, तिला थंबनेल प्रिंट असे म्हणतात. दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी व संबंधित पक्षकार या दोघांनीही सदर थंबनेल प्रिंटचा मूळ दस्ताशी ताळमेळ घेऊन स्कॅनिंग योग्य रितीने झाले असल्याची खातरजमा करणे आवश्यक असते.
 • दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणीनंतर मिळालेली सीडी संगणकावर उघडण्यासा ी त्या संगणकावर कोणते सॉफटवेअर आवश्यक असते?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणीनंतर मिळालेली सीडी संगणकावर उघडण्यासा ी PDF Reader/ Adobe Acrobat हे सॉफटवेअर असणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]