दस्त नोंदणीकरीता गृहभेट (Visit Outside Office)

 • दस्त नोंदणीकरिता गृहभेट (Visit Outside Office ) देण्याबाबत काय तरतुदी आहेत ? व त्याची प्रक्रिया काय आहे?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 31 नुसार, विशेष कारण असल्यास (उदा- गंभीररित्या आजारी असलेल्या पक्षकाराचा दस्त तातडीने नोंदणी करणे आवश्यक असल्यास) दस्त निष्पादक पक्षकार यांनी गृहभेटीचा अर्ज केल्यावर, त्यात नमूद गृहभेटीच्या कारणाबाबत दुय्यम निबंधक यांचे समाधान झाल्यास ते गृहभेट देऊन दस्त नोंदणीस स्विकारु शकतात किंवा कबुलीजबाब नोंदवू शकतात. गृहभेट प्रक्रियेचे व्हिडीओ शूटींग केले जाते. सदरील व्हिडीओ शूटींग करण्याची संपूर्ण व्यवस्था अर्जदारानेच स्वखर्चाने करावयाची असून, शूटींग झाल्यांनतर त्याची एक सीडी दुय्यम निबंधक कार्यालयात तात्काळ देणे आवश्यक आहे.
 • गृहभेटीसा ी (Visit Outside Office) अर्ज कोणी करावा? सोबत कोणती कागदपत्रे जोडावीत ?
   

  जो पक्षकार विशिष्ट कारणामुळे (उदा- गंभीररित्या आजारी) नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीस सादर करण्यास किंवा कबुलीजबाब देण्यास येऊ शकत नाही, त्या पक्षकारानेच दुय्यम निबंधक कार्यालयाचे नावाने गृहभेटीसा ी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासोबत कारणाचे पृष् यर्थ योग्य पुरावा (जसे की, गंभीर आजारासा ी वैद्यकीय प्रमाणपत्र) जोडणे आवश्यक आहे.
 • गृहभेटीसा ी किती फी आकारली जाते ?
   

  गृहभेटीचे िकाण ज्या क्षेत्रात येत असेल, त्यानुसार पुढीलप्रमाणे गृहभेट फी आकारली जाते-
  अ.क्र. क्षेत्र/ िकाण गृहभेट फी रुपये
  1 महानगरपालिका क्षेत्रासा ी 300/-
  2 उर्वरीत क्षेत्रासा ी 200/-

 • दुय्यम निबंधकांस कोणत्या िकाणी गृहभेट देता येते ?
   

  दुय्यम निबंधकांस कोणत्या िकाणी गृहभेट देता येते ?दुय्यम निबंधकांस त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही िकाणी गृहभेट देता येते. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर गृहभेट देता येत नाही.
 • गृहभेटीच्या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करण्याची कारणे काय आहेत ?
   

  गृहभेट ही दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर होत असल्याने काही वेळा गृहभेट झालीच नाही किंवा गृहभेटीच्यावेळी दुय्यम निबंधक स्वतः उपस्थित नव्हते, अशा प्रकारचे आक्षेप येऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये, जरी रितसर गृहभेट झालेली असली तरी विनाकारण संशयास्पद स्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून, गृहभेटीच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटींग करण्यात येते. त्यामुळे संबंधित पक्षकारांचे देखील हित संरक्षित होते. याबाबतीत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे दि.12/6/2013 रोजीचे परिपत्रक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]