दस्त नोंदणी प्रकरणी ओळख (Identification)

 • दस्त नोंदणी प्रक्रियेत ओळख पटविणे (Identification) म्हणजे काय ?
   

  नोंदणी अधिका-याने त्यांच्यासमोर कबुलीजबाब देणारे पक्षकार ही तीच व्यक्ती असल्याची खातरजमा करणे आवश्यक असते. त्याकरिता कबुलीजबाब देणा-या पक्षकारांना वैयक्तिकरित्या ओळखत असलेल्या व्यक्तीने तशी ओळख नोंदणी अधिका-यासमोर दिल्यास त्याला ओळख पटविणे (Identification) असे म्हणतात.
 • दस्त निष्पादनाचा कबुलीजबाब देणा-या पक्षकाराची ओळख पडताळणी (Indentity Verification) विषयी नियमात काय तरतुदी आहेत ?
   

  दस्त निष्पादनाचा कबुलीजबाब देणा-या पक्षकाराची ओळख खालील इसम पटवू शकतात.

  1. दस्त निष्पादित केल्याचा कबुलीजबाब देणा-या पक्षकारांस दुय्यम निबंधक वैयक्तिकरित्या ओळखत  असल्यास वेगळया ओळखदाराची आवश्यकता नसते.
  2. दस्त निष्पादित केल्याचा कबुलीजबाब देणा-या पक्षकारास दुय्यम निबंधक वैयक्तिकरित्या ओळखत नसल्यास,

  अ) अशा पक्षकारांना ओळखत असलेल्या ओळखदारास, दुय्यम निबंधक ओळखत असल्यास तसा एक ओळखदार पुरेसा असतो.
  ब) अशा पक्षकारांना ओळखत असलेल्या ओळखदारासही दुय्यम निबंधक ओळखत नसल्यास दोन ओळखदार आवश्यक असतात.

  परंतु ओळखदार इसमांकडे स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक असते. तसेच तो सरसकट ओळख पटविण्याचे काम करीत असता कामा नये.
  या संदर्भातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाची परिपत्रके दि.6/6/2007, दि.9/6/2007 व दि. 05/09/2013 नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहेत.
   

 • ओळख पडताळणी (Identity Verification) संबंधीच्या तरतुदी को े नमूद आहेत ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 35 तसेच महाराष्ट्र नोंदणी नियम,1961 चे नियम 48 मध्ये ओळख पडताळणी संबंधीच्या तरतुदी आहेत.
  तसेच ओळख पडताळणी संबंधीच्या प्रशासकीय सूचनांबाबत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाची परिपत्रके दि.6/6/2007, दि.9/6/2007 व दि.5/9/2013 नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.
  gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहेत.

 • ओळख (Identification) देण्यासा ी ओळखदार म्हणून वकील आवश्यक आहेत का ?
   

 • दस्ताचा कबुलीजबाब देणा-या पक्षकारांकडे आणि त्याची ओळख पटविणा-या ओळखदाराकडे (Indentifier) कोणता ओळख (Identity) पुरावा आवश्यक असतो ?
   

  दस्ताचा कबुलीजबाब देणा-या पक्षकारांकडे किंवा त्याची ओळख पटविणा-या ओळखदाराकडे छायाचित्र असलेला पुढीलपैकी एक ओळख पुरावा आवश्यक असतो -

  1. आधार कार्ड,
  2. आयकर विभागाकडील पॅन कार्ड,
  3. वाहन चालविण्याचा परवाना,
  4. निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र,
  5. पासपोर्ट,
  6. ज्यावर छायाचित्र आहे असे बँकेचे /किसान पास बुक / पोस्टाचे पास बुक,
  7. केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम /स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी त्यांच्या कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र,
  8. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेले ओळखपत्र,
  9. ज्येष् नागरिकाचे ओळखपत्र,
  10. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत दिलेले ओळखपत्र,
  11. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला,
  12. स्वातंत्र्यसैनिकाचे ओळखपत्र,
  13. झोपडपट्टीधारकांचे ओळखपत्र/ फोटोपास,
  14. बार कौन्सिल यांनी वकिलांना दिलेले ओळखपत्र

   

 • ओळखदाराची जबाबदारी काय असते ?
   

  दस्त निष्पादनाबाबत कबुलीजबाब देणा-या पक्षकारांना वैयक्तिकरित्या ओळखत असेल तरच नोंदणी अधिका-यास तसे निवेदन देणे ही ओळखदाराची कायदेशीर जबाबदारी असते.

  • बनावट पक्षकाराची ओळख पटविणे हा कारावासास पात्र गुन्हा असून, अशा प्रकरणात ओळख पटविणा-या व्यक्तीस 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]