सादरीकरण (Presentation)

 • दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणीसा ी कोण सादर (Present) करु शकतो ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 32 नुसार, निष्पादक (सहया करणा-या) पक्षकारांपैकी कोणताही एक पक्षकार किंवा दस्तातील दावेदार (लाभार्थी) पक्षकार दस्त नोंदणीसा ी दुय्यम निबंधकांकडे सादर करु शकतो.
  तसेच अशा पक्षकारांचा विशेष कुलमुखत्यारपत्रधारक (Special Power of Attorney) दस्त नोंदणीसा ी सादर करु शकतो. यासा ी सविस्तर माहितीसा ी पहा - याच पुस्तकातील दस्त नोंदणी या भागातील दस्त नोंदणीसा ी वापरल्या जाणा-या मुखत्यारपत्राविषयी ( Power of Attorney )हा उपविषय

 • दस्त नोंदणीसा ी सादर (Present) करण्यासा ी किती कालमर्यादा आहे ?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 23 नुसार मृत्युपत्र वगळून इतर दस्त निष्पादित /सही झाल्याच्या तारखेपासून 4 महिन्यांच्या आत नोंदणीस सादर करता येतात. एका दस्तावर अनेक पक्षकारांनी वेगवेगळया वेळी सहया केल्या असतील तर पहिल्यांदा झालेल्या सहीपासून सदर कालमर्यादा लागू होते.
 • दस्त नोंदणीस सादर (Present) करण्याच्या चार महिन्यांच्या कालमर्यादेमध्ये कोणत्या परिस्थितीत व किती मुदतवाढ मिळू शकते ?
   

  तातडीची निकड किंवा टाळता न येणारी परिस्थिती निर्माण झाल्याने (उदा- गंभीर आजारपण, दंगल/ नैसर्गिक आपत्ती) निष्पादन / सही झाल्यापासून 4 महिन्यांच्या आत दस्त नोंदणीस सादर करणे शक्य न झाल्यास असा दस्त कलम 25 नुसार, त्यापुढील 4 महिन्यांत नोंदणीस सादर करता येतो. तथापि अशा विलंबाने सादर होणा-या दस्ताच्या नोंदणीबाबत जिल्हा निबंधक तथा जिल्हाधकारी हे प्रकरणपरत्वे आदेश पारित करतात.
 • कलम 23 नुसार दस्त सादर (Present) करण्याची कालमर्यादा संपल्यानंतर दस्त नोंदणीसा ी सादर करावयाचा झाल्यास किती दंड आकारला जातो ?
   

  महाराष्ट्र नोंदणी नियम, 1961 चे नियम 27 मध्ये त्याबाबत सविस्तर तरतूद आहे. त्यानुसार कलम 23 मध्ये विहित केलेल्या 4 महिन्यांनंतर दस्त नोंदणीसा ी सादर केल्यास -

  • विलंबाच्या पहिल्या महिन्याच्या कालावधीसा ी दंड - नोंदणी फी च्या 2.5 पट,
  • विलंबाच्या दुस-या महिन्याच्या कालावधीसा ी दंड - नोंदणी फी च्या 5 पट,
  • विलंबाच्या तिस-या महिन्याच्या कालावधीसा ी दंड - नोंदणी फी च्या 7.5 पट
  • विलंबाच्या चौथ्या महिन्याच्या कालावधीसा ी दंड - नोंदणी फी च्या 10 पट इतका आहे.

  उपरोक्त प्रमाणे दंडाची आकारणी करताना त्या दंडाच्या रकमेतून मूळ नोंदणी फी ची वजावट केली जाते.

 • दस्त नोंदणीस सादर करण्यास झालेला विलंब माफ करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
   

  नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 25 नुसार, विहित दंड भरला असल्यास सदर विलंब माफ करण्याचे अधिकार संबंधित जिल्हयाचे जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांना आहेत.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]