दस्त नोंदणी प्रक्रियेतील प्रमुख टप्पे

 • नोंदणी कार्यालयात गेल्यावर दस्त नोंदणी प्रक्रियेतील प्रमुख टप्पे कोणकोणते आहेत?
   

  दस्त नोंदणी करण्यावर कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल तर तो दस्त नोंदणीस स्विकारला जातो. अशा दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेतील सर्वसाधारपण टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

  1. टोकन रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते व टोकन दिले जाते.
  2. दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी केली जाते.
  3. अगोदर पब्लिक डाटा एंट्री केली असल्यास, 11 अंकी सांकेतांकाचे आधारे दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणकावर डाटा उपलब्ध करुन घेतला जातो अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयात इनपुट फॉर्मच्या आधारे डाटा एंट्री केली जाते.
  4. यथोचित मुद्रां॑कित केलेला ( देय मुद्रांक शुल्क भरलेला) व नोंदणीस पात्र दस्त नोंदणीस सादर करुन घेतला जातो.
  5. आवश्यक ती नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रदान केल्यांनतर त्याची पावती दिली जाते.
  6. दस्त निष्पादक पक्षकारांकडून अथवा त्यांचे मुखत्यारपत्रधारकाकडून त्यांचे निष्पादनाचा कबुलीजबाब दिला जातो.
  7. दस्तात नमूद मोबदला दुय्यम निबंधक यांच्यासमोर देण्यात येत असल्यास, त्याबाबतची नोंद दस्तावर घेतली जाते.
  8. कबुलीजबाब देणा-या पक्षकारास ओळखत असलेल्या ओळखदारांकडून ओळख पडताळणी केली जाते.
  9. दुय्यम निबंधक दस्तावर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र देतात.
  10. दुय्यम निबंधक मूळ दस्त स्कॅन करुन, मूळ दस्त व त्यासोबत थंबनेल प्रींट, सूची 2 व दस्ताची प्रत (स्कॅन्ड इमेज) असलेली सीडी पक्षकारास देतात.
 • दस्त नोंदणीची प्रक्रिया किती वेळात पूर्ण होते ?
   

  सर्वसाधारणपणे दस्त नोंदणीस स्वीकृत केल्यापासून 30 मिनिटांच्या आत दस्त नोंदणी पूर्ण करुन व स्कॅनिंग करुन मूळ दस्त पक्षकारांना परत दिला जातो. तथापि दस्तातील पानांची संख्या 50 पेक्षा जास्त असल्यास, वाढीव प्रत्येक 50 पानांच्या पेजींगसा ी साधारण 10 मिनिटे इतका अतिरिक्त वेळ लागतो.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]