दस्त नोंदणीसा ी वेळेचे आरक्षण

 • दुय्यम निबंधक कार्यालयांची नावे, पत्ते व कामकाजाच्या वेळा को े पाहता येतील ?
   

  राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांची नावे, पत्ते व कामकाजाच्या वेळा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisation या सदराखाली Offices या िकाणी उपलब्ध आहेत. (सविस्तर मा॑हितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग-1 विभागाची सर्वसाधारण माहिती)
 • दस्त नोंदणीसा ी वेळेचे आरक्षण कशा पध्दतीने करता येते ?
   

  • दस्त नोंदणीसा ी वेळेचे आरक्षण www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली उपलब्ध असलेल्या ई-स्टेप इन (e-Step in) प्रणालीद्वारे घरबसल्या करता येते.
  • तसेच ज्या कार्यालयात दस्त नोंदणी करावयाचा आहे, त्या कार्यालयात समक्ष जाऊन देखील वेळेचे आरक्षण करता येते.
  • त्याशिवाय वेळ आरक्षित करुन उपस्थित असलेल्या पक्षकारांचे दस्त नोंदणीस स्विकारल्यानंतर शिल्लक राहिलेल्या वेळेत किंवा वेळ आरक्षित करून अनुपस्थित राहिलेल्या पक्षकारांचे आरक्षित वेळेत ऐनवेळी येणा-या पक्षकारांचे दस्त नोंदणीस स्विकारता येऊ शकतील.

 • ‘ई-स्टेप इन’ बाबत सविस्तर माहिती सांगा.
   

  ‘ई-स्टेप इन’ बाबत सविस्तर माहितीसा ी कृपया पहा - याच पुस्तकातील भाग 6 - ई-सर्व्हिसेस

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]