डाटा एंट्री चार्जेस

 • डाटा एंट्री चार्जेस (Data Entry Charges) म्हणजे काय ?
   

  दस्त नोंदणी करण्यासा ी संगणकामध्ये भराव्या लागणा-या माहितीची डाटा एंट्री, दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यासा ी आकारण्यात येणारे शुल्क म्हणजे डाटा एंट्री चार्जेस होय. मात्र पक्षकारांनी पब्लिक डाटा एंट्री प्रणालीमधून डाटा एंट्री करुन आणल्यास डाटा एंट्री चार्जेस आकारले जात नाहीत. (Public Data Entry बाबत अधिक माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 6 - ई-सर्व्हिसेस)

 • डाटा एंट्री चार्जेस किती असतात ?
   

  पक्षकारांनी पब्लिक डाटा एंट्री प्रणालीमधून डाटा एंट्री करुन न आणल्यास डाटा एंट्री चार्जेस प्रति दस्त रुपये 20/- इतके असतात.
 • पक्षकारांनी पब्लिक डाटा एंट्री प्रणालीमधून डाटा एंट्री करुन न आणल्यास डाटा एंट्री चार्जेस को े व कसे भरावे लागतात ?
   

  पक्षकारांनी पब्लिक डाटा एंट्री प्रणालीमधून डाटा एंट्री करुन न आणल्यास डाटा एंट्री चार्जेस दस्त नोंदणी करतांना दुय्यम निबंधकांकडे रोखीने भरावे लागतात.
 • पब्लिक डाटा एंट्री (Public Data Entry) म्हणजे काय ?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयात संगणकीकृत पध्दतीने दस्त नोंदणी केली जाते. त्याकरीता दस्ताशी संबंधित तपशीलाची डाटा एंट्री संगणकामध्ये करावी लागते. हे काम दस्त नोंदणीसा ी कार्यालयात आल्यानंतर करावयाचे झाल्यास, त्यामध्ये पक्षकारांचा वेळ जातो. शिवाय काही वेळा माहितीची अचूकता साध्य होत नाही. याकरीता नागरिकांना स्वत:च्या दस्तऐवजाची माहिती संगणकावर ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या भरण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली PDE for Registration या िकाणी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यास पब्लिक डाटा एंट्री असे म्हणतात. (Public Data Entry बाबत अधिक माहितीसा ी पहा- याच पुस्तकातील भाग 6 - ई-सर्व्हिसेस)
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]